WPL 2023 MI vs UPW: महिला प्रीमियर लीगच्या एलिमिनेटर सामन्यात ‘या’ झेलवरून झाला गोंधळ, पाहा VIDEO

MI vs UPW Eliminator Match: ही घटना मुंबई इंडियन्सच्या डावातील ९व्या षटकाची आहे. दीप्ती शर्माच्या पहिल्याच चेंडूवर मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात हेली मॅथ्यूजने चेंडू हवेत उडवला. अंजलीने स्क्वेअर लेगवर अप्रतिम झेल घेतला.

WPL 2023 MI vs UPW Eliminator Match
अंजली सरवाणी (फोटो-लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

WPL 2023 MI vs UPW Match: महिला प्रीमियर लीग २०२३ चा एलिमिनेटर सामना शुक्रवारी रात्री मुंबई इंडियन्स आणि यूपी वॉरियर्स यांच्यात खेळला गेला. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील एमआयने हा सामना ७२ धावांच्या मोठ्या फरकाने जिंकून अंतिम फेरीत प्रवेश केला. या सामन्यादरम्यान यूपीच्या अंजली सरवानीने असा झेल पकडला, ज्यावरून वाद सुरू झाला आहे.

तुमची नोंदणीशिवाय वाचनाची मर्यादा संपली आहे.
वाचन सुरू ठेवण्यासाठी कृपया नोंदणी करा अथवा साइन इन करा.
Skip
तुमची नोंदणीशिवाय वाचनाची मर्यादा संपली आहे.
वाचन सुरू ठेवण्यासाठी कृपया नोंदणी करा अथवा साइन इन करा.
7 व्या लेखांपैकी हा 3 वा लेख आहे ज्यापूर्वी तुम्हाला नोंदणी करावी लागेल
आमच्या विनामूल्य लेखांमध्ये अमर्यादित प्रवेशासाठी, कृपया साइटवर लॉग इन करा
Skip

या झेलबद्दल सर्वजण अंजलीचे कौतुक करत होते, मात्र तिसऱ्या पंचाने यावर निर्णय देताच यूपीच्या खेळाडूंसह समालोचन करणाऱ्या हर्षा भोगलेलाही आश्चर्याचा धक्का बसला. कारण हेली मॅथ्यूजला नाबाद घोषित केल्यामुळे तिसऱ्या पंचांच्या निर्णयावर फक्त मुंबई कॅम्प आनंदी होता.

ही घटना मुंबई इंडियन्सच्या डावातील ९व्या षटकातील आहे. दीप्ती शर्माच्या पहिल्याच चेंडूवर मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात हेली मॅथ्यूजने चेंडू हवेत उडवला. स्क्वेअर लेगच्या दिशेला उभी असलेली अंजलीने डायव्ह मारत शानदार झेल घेतला. अंजलीचा हा प्रयत्न पाहून यूपी कॅम्पमध्ये आनंदाची लाट उसळली, मात्र मॅथ्यूजला कॅचवर शंका आल्याने ती खेळपटीवरच उभी राहिली.

मैदानावरील पंचांनी यासाठी तत्काळ तिसऱ्या पंचाची मदत घेतली. थर्ड अंपायरनेही कॅचकडे अनेक कोनातून पाहिले, शेवटी त्यांना कळले की कॅच दरम्यान चेंडू जमिनीवर आदळला होता, त्यामुळे त्याने हीलीला नाबाद घोषित केले. थर्ड अंपायरच्या या निर्णयावर भाष्य करताना हर्षा भोगले आश्चर्यचकित दिसले. ते म्हणाले, ‘मला वाटते की आपण याबद्दल बोलले पाहिजे. कारण झेलच्या वेळी बॉलच्या खाली बोटे दिसत होती.’

हेही वाचा – IPL 2023: लखनऊ सुपर जायंट्सला मोठा धक्का! संघातील ‘हा’ मॅचविनर गोलंदाज IPL मध्ये खेळणार नाही?

या सामन्याबद्दल बोलायचे, तर मुंबई इंडियन्सने एलिमिनेटरमध्ये प्रथम फलंदाजी करताना २० षटकात ४ गडी गमावून १८२ धावा केल्या होत्या. एमआयसाठी नॅट सायव्हर-ब्रंटने ३८ चेंडूत नाबाद ७२ धावा केल्या. एमआयच्या या धावसंख्येसमोर यूपी वॉरियर्सचा संघ १७.४ षटकांत ११० धावांत सर्वबाद झाला. यादरम्यान इस्सी वोंगने डब्ल्यूपीएलची पहिली हॅटट्रिकही घेतली.

एलिमिनेटर सामन्यात मुंबई इंडियन्सने यूपी वॉरियर्सविरुद्ध मोठा विजय मिळवला. त्यांनी हा सामना ७२ धावांनी जिंकून अंतिम फेरीत धडक मारली. तेथे ते गुणतालिकेत अव्वल स्थानावर असलेल्या दिल्ली कॅपिटल्सशी मुकाबला करतील. हा सामना २६ मार्च रोजी मुंबईतील ब्रेबॉर्न स्टेडियमवर होणार आहे. गुणतालिकेत अव्वल दोन संघच अंतिम फेरीत आमनेसामने येतील. मुंबई दुसऱ्या क्रमांकावर आहे. यूपीने तिसरे स्थान मिळवून एलिमिनेटरमध्ये प्रवेश केला होता, परंतु पुढे प्रगती करता आली नाही.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 25-03-2023 at 10:35 IST
Next Story
IPL 2023: लखनऊ सुपर जायंट्सला मोठा धक्का! संघातील ‘हा’ मॅचविनर गोलंदाज IPL मध्ये खेळणार नाही?
Exit mobile version