Ashwin starting batting practice went viral: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन सामन्यांच्या वनडे मालिकेला २२ सप्टेंबरपासून मोहालीच्या मैदानावर सुरुवात झाली. टीम इंडियाने पहिला सामना ५ विकेट्सने जिंकून मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. जवळपास २१ महिन्यांनंतर एकदिवसीय संघात पुनरागमन करणारा अनुभवी ऑफ-स्पिनर रविचंद्रन अश्विनने एक विकेट घेतली. या सामन्यानंतर रविचंद्रन अश्विनचा एक व्हिडीओ समोर आला आहे, ज्यामध्ये तो रात्री उशिरा नेटमध्ये फलंदाजीचा सराव करताना दिसत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

रविचंद्रन अश्विन अनेकदा मैदानावर काहीतरी वेगळे करण्यासाठी ओळखला जातो. आता ही त्याने असेच काहीसे केले आहे. सामना संपताच त्याने पॅड घातले आणि थेट मैदानाच्या मधल्या खेळपट्टीवर सरावासाठी गेला. यावेळी त्यांच्यासोबत प्रशिक्षक राहुल द्रविड देखील होते, ज्यांनी क्षेत्ररक्षकाची भूमिका बजावली. अश्विनचे ​​हे पाऊल पाहून त्यावेळी उपस्थित ब्रॉडकास्टिंग टीममधील माजी खेळाडू अभिषेक नायर आणि मार्क वॉ यांना आश्चर्य वाटले, पण त्यांनीही त्याचे कौतुक केले.

एकदिवसीय विश्वचषक २०२३ सुरू होण्यास फारसा वेळ उरलेला नाही, त्यामुळे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे मालिकेत अश्विनच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मोहाली येथे खेळल्या गेलेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात त्याने १० षटकात ४७ धावा देत मार्नस लाबुशेनच्या रूपात एक विकेट घेतली.

हेही वाचा – आयसीसीने T20 World Cup स्पर्धेची ठिकाणं केली जाहीर, १० मैदानांवर खेळवले जाणार ५५ सामने

जर अक्षर तंदुरुस्त नसेल तर अश्विनला विश्वचषकासाठी मिळू शकते संधी –

आशिया चषक २०२३ मध्ये बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात अक्षर पटेलला दुखापत झाली होती. त्यामुळे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या या मालिकेतील पहिल्या दोन वनडेमध्ये त्याचा समावेश करण्यात आला नाही. जर अक्षर विश्वचषकासाठी तंदुरुस्त नसेल, तर अश्विनकडे त्याचा पर्याय म्हणून पाहिले जात आहे. खालच्या फळीतील फलंदाज म्हणूनही अश्विन संघासाठी खूप उपयुक्त ठरू शकतो. विश्वचषकासाठी जाहीर केलेला संघ २८ सप्टेंबरपर्यंत कोणत्याही परवानगीशिवाय बदलता येईल.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: As soon as the first odi against australia ended the video of r ashwin starting batting practice went viral vbm