Nitin Menon Picked Umpires in Ashes: भारत-पाकिस्ताननंतर क्रिकेटमध्ये दुसरा सर्वात मोठा प्रतिस्पर्धी मानला तर तो इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाचा आहे. इंग्लंड-ऑस्ट्रेलिया यांच्यातील सामने अनेकदा चुरशीचे होतात आणि अ‍ॅशेसला काय म्हणावे. या वर्षी म्हणजेच २०२३ मध्ये जून महिन्यात रोमांचक अ‍ॅशेस मालिका होणार आहे. इंग्लंड या वेळी या ऐतिहासिक मालिकेचे यजमानपद भूषवत आहे. पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात चुरशीची स्पर्धा होऊ शकते. त्याच वेळी, भारताचे पंच नितीन मेनन देखील अ‍ॅशेसमध्ये अंपायरिंग करताना दिसू शकतात.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

बीसीसीआयच्या भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या सदस्याने सांगितले की, “नितीन अ‍ॅशेस मालिकेत अंपायरच्या भूमिकेत दिसणार आहे, ज्यामध्ये तो लीड्समध्ये खेळल्या जाणार्‍या मालिकेतील तिसऱ्या आणि चौथ्या कसोटी सामन्यात अंपायरिंग करेल. ६ ते १० जुलै आणि मँचेस्टर १९ ते २३ जुलैपर्यंत. मैदानी अंपायर्सच्या भूमिकेत दिसणार आहे. यानंतर नितीन लंडनमधील ओव्हल मैदानावर २७ ते ३१ जुलै दरम्यान खेळल्या जाणाऱ्या मालिकेतील ५व्या कसोटी सामन्यात टीव्ही अंपायर्सची भूमिका बजावणार आहे.”

हेही वाचा: World Cup 2023: मोठी बातमी! IPLमुळे न्यूझीलंडचे खूप मोठे नुकसान, २०२३च्या वर्ल्डकपमधून केन विल्यमसन होणार बाहेर

अ‍ॅशेस अंपायरिंग हे नितीन मेननचे स्वप्न होते

पीटीआयशी बोलताना भारतीय पंच नितीन मेनन म्हणाले की, “अ‍ॅशेसमध्ये अ‍ॅशेसमध्ये काम करणे हे त्याचे स्वप्न होते. ही मालिका इंग्लंड असो की ऑस्ट्रेलियात खेळली जाते, त्यादरम्यान एक मस्त वातावरण पाहायला मिळते.” नितीन सध्या आयपीएल २०२३ मध्ये अंपायरिंग करत आहे. याआधी तो भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात झालेल्या बॉर्डर गावसकर ट्रॉफीमध्येही अंपायरिंग करताना दिसला होता. तथापि, ३९ वर्षीय नितीन मेननने आपल्या कारकिर्दीत आतापर्यंत ४२ एकदिवसीय, ४० टी२० आणि १८ कसोटी सामन्यांमध्ये अंपायरिंग केले आहे.

विराट कोहलीसोबत घेतला पंगा

मैदानावर फलंदाजी करताना किंवा क्षेत्ररक्षण करताना विराट कोहली अनेकदा आक्रमक फॉर्ममध्ये दिसतो. विशेषत: जेव्हा त्याचे एखाद्या खेळाडूशी भांडण होते किंवा पंच चुकीच्या पद्धतीने त्याला आऊट देतात. विराटला अनेकवेळा वादग्रस्तपणे मैदानावर बाद करणाऱ्या नितीन मेननचे नशीब उघडले आहे. आता त्यांना एका विशेष मालिकेत अंपायर म्हणून समाविष्ट करण्यात आले आहे. यंदाच्या बॉर्डर गावसकर ट्रॉफीमध्ये ते खराब अंपायरिंगमुळे बदनाम झाले होते.

हेही वाचा: Ashwin Mankading Dhawan: लाईन क्रॉस करशील तर…! शिखर धवनला अश्विनचा मांकडिंग इशारा, कॅमेरा मात्र बटलरवर; Video व्हायरल

भारतात यंदाच्या बॉर्डर गावसकर ट्रॉफीमध्ये नितीन कुप्रसिद्ध झाला होता. त्याला चाहत्यांनी प्रचंड ट्रोल केले होते. खरे तर त्यांनी या मालिकेत विराट कोहलीला चुकीच्या पद्धतीने बाद केले. यानंतर चाहते संतापले होते आणि त्यांच्यावर जोरदार टीका करत होते. नितीन यांनी अलीकडेच १५ मार्च रोजी अफगाणिस्तान आणि आयर्लंडविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यात अंपायर म्हणून काम केले होते.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ashes 2023 indian umpire nitin menon gets big responsibility will officiate in historic ashes series avw