India vs Pakistan Live Streaming Details: आशिया चषक २०२५ स्पर्धेतील सुपर ४ फेरीतील सामन्यांना सुरुवात झाली आहे. सुपर ४ फेरीतील पहिला सामना श्रीलंका आणि बांगलादेश या दोन्ही संघांमध्ये पार पडला. तर दुसऱ्या सामन्यात कट्टर प्रतिस्पर्धी भारत – पाकिस्तान संघ आमनेसामने येणार आहेत. हे दोन्ही संघ या स्पर्धेत दुसऱ्यांदा आमनेसामने येणार आहेत. याआधी झालेल्या साखळी फेरीतील सामन्यात भारताने पाकिस्तानचा एकतर्फी पराभव केला होता. या सामन्यात हस्तांदोलन न करण्यावरून चांगलाच वाद पेटला होता. आता दोन्ही संघ पुन्हा एकदा भिडणार आहेत. दरम्यान हा सामना केव्हा, कुठे आणि किती वाजता सुरू होणार? जाणून घ्या.

केव्हा आणि कुठे रंगणार भारत – पाकिस्तान सामन्याचा थरार?

याआधी ओमानविरुद्ध झालेला सामना अबुधाबीच्या मैदानावर रंगला होता. मात्र, सुपर ४ चा सामना दुबईतील दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर रंगणार आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार रात्री ८ वाजता सुरू होईल. तर नाणेफेक ७:३० वाजता होईल. याआधी झालेला साखळी फेरीतील सामना देखील याच मैदानावर पार पडला होता. या सामन्यात भारतीय फलंदाज आणि गोलंदाजांनीही दमदार कामगिरी केली होती. आता भारतीय संघ हा सामना जिंकून सुपर ४ फेरीत दमदार सुरूवात करण्याच्या प्रयत्नात असणार आहे.

भारत- पाकिस्तान सामना कुठे पाहता येणार?

भारत आणि पाकिस्तान यांच्यात होणाऱ्या सामन्याचा थरार तुम्ही सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवर लाईव्ह पाहू शकता. या सामन्याचे लाईव्ह प्रक्षेपण तुम्ही सोनी स्पोर्ट्स १,२,३ आणि ५ वर पाहू शकता. जर तुम्हाला हा सामना मोबाईलवर पाहायचा असेल, तर तुम्ही सोनी लिव आणि फॅनकोड अॅपवर लाईव्ह पाहू शकता. पण यासाठी तुमच्याकडे सब्स्क्रिप्शन असणं गरजेचं आहे. यासह हा सामना तुम्ही डीडी स्पोर्ट्सवर लाईव्ह पाहू शकता.

या स्पर्धेसाठी असे आहेत दोन्ही संघ:

भारतीय संघ: सूर्यकुमार यादव (कर्णधार), शुबमन गिल, अभिषेक शर्मा, तिलक वर्मा,संजू सॅमसन,हार्दिक पंड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, जितेश शर्मा, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग, वरुण चक्रवर्ती, कुलदीप यादव, हर्षित राणा, रिंकू सिंग.

पाकिस्तान: सलमान अली आगा (कर्णधार), अबरार अहमद, फहीम अशरफ, फखर जमान, हरिस रौफ, हसन अली, हुसेन तलत, खुशदिल शाह,साहिबजादा फरहान, सईम अयूब, शाहीन आफ्रिदी, सुफियान मुकीम, मोहम्मद वसीम जूनिअर, हसन नवाज, सलमान मिर्झा, मोहम्मद हरिस (यष्टीरक्षक), मोहम्मद नवाज.