Babar Azam Buys Sabyasachi Sherwani: पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम भारतात आपल्या वेळेचा पुरेपूर वापर करत आहे. आयसीसी विश्वचषकात पाकिस्तान फार जादुई खेळीचं प्रदर्शन करू शकला नसला तरीही खेळाडू भारतात वास्तव्याची मजा घेत आहेत असं म्हणायला हरकत नाही. भारतात येताच पाकिस्तानी संघ आणि बिर्याणीची मेजवानी याची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा झाली होती. हैदराबादमध्ये असताना पाकिस्तानच्या खेळाडूंनी मनसोक्तपणे बिर्याणी खाण्याचा आनंद लुटला होता. आणि आता बाबर आझमने मायदेशी परतण्याआधी भारतात एक मोठी खरेदी केली आहे. आयसीसी विश्वचषक २०२३ नंतर बाबर आझम लग्न करणार आहे. त्यामुळे हा लग्नाचा बस्ता बांधण्याची सुरुवात त्याने भारतातूनच केली आहे.
बाबरने प्रसिद्ध सब्यसाची स्टोअरला भेट दिल्याचे वृत्त क्रिकट्रक्टरने दिले आहे. प्राप्त माहितीनुसार बाबर आझमने स्वतःच्या लग्नासाठी स्टार डिझायनर सब्यसाची मधून तब्बल ७ लाख रुपयांची शेरवानी खरेदी केली आहे. तर बाबरने एका नामांकित दुकानातून काही दागिनेही घेतले. विशेष म्हणजे जर तुम्ही भारतीय चलन व पाकिस्तानी चलनाची तुलना केली तर भारताचा एक रुपया हा पाकिस्तानात साडे तीन रुपये इतका मौल्यवान आहे. यानुसार ७ लाखाची शेरवानी म्हणजेच साधारण २३ लाख ४३ हजाराहून अधिक किमतीची खरेदी बाबरने केली आहे.
हे ही वाचा<<“पाकिस्तानी खेळाडूंना रूममध्ये कठोर.. “, BCCI ला दोष देत पाक टीम डिरेक्टरचं मोठं विधान, म्हणाले, “मानसिक..”
दुसरीकडे, पाकिस्तानच्या विश्वचषक मोहिमेबाबत सांगायचे झाल्यास बाबरचा संघ या स्पर्धेदरम्यान सपशेल फसलेला दिसत आहे. स्वतः बाबरने मोजक्या धावा केल्याने त्याची फलंदाजी व संघाची एकूणच कामगिरी पाहता कर्णधार पद सुद्धा सध्या वादात आहे. पाकिस्तान आज न्यूझीलंड विरुद्ध करा वा मरा या स्थितीत खेळत असताना उपांत्य फेरी गाठण्यासाठी बाबर आझमच्या संघाला प्रचंड कष्ट समोर असल्याचे दिसत आहे.