Steve Smith Century BBL: ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाचा अनुभवी फलंदाज स्टीव्ह स्मिथने एक असा विक्रम केला आहे जो मोडणे विराट कोहलीसाठी जवळपास अशक्य आहे. स्मिथ सध्या ऑस्ट्रेलियाच्या टी२० बिग बॅश लीगमध्ये खेळत आहे. सिडनी सिक्सर्सकडून खेळणाऱ्या स्मिथने अॅडलेड स्ट्रायकर्सविरुद्ध ५६ चेंडूत चौकार आणि षटकारांची बरसात करत शतक झळकावले. स्मिथच्या धडाकेबाज शतकाच्या जोरावर सिडनी सिक्सर्सने डोंगराळ धावसंख्या उभारली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अॅडलेड स्ट्रायकर्सचा कर्णधार ट्रॅव्हिस हेडने नाणेफेक जिंकून सिडनी सिक्सर्सला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. सिडनी सिक्सर्ससाठी जोश फिलिप आणि स्टीव्ह स्मिथ सलामीला उतरले. जोश फिलिप काही विशेष करू शकला नाही आणि सामन्याच्या पहिल्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर १ धाव काढून तंबूत परतला. यानंतर स्मिथला कुर्टिस पॅटरसनची साथ मिळाली. या दोन्ही फलंदाजांनी दुसऱ्या विकेटसाठी १४९ धावांची भागीदारी करत संघाला मोठ्या धावसंख्येकडे नेले.

स्टीव्ह स्मिथने ५६ चेंडूत शतक झळकावले

पॅटरसन ३३ चेंडूत ४३ धावा करून बाद झाला. यानंतर स्मिथने ५६ चेंडूंत ५ चौकार आणि ७ षटकारांच्या मदतीने १०१ धावांची खेळी केली. स्मिथचे टी२० कारकिर्दीतील हे पहिले शतक आहे. याशिवाय सिडनी सिक्सर्सच्या कोणत्याही फलंदाजाचे बीबीएलमधील हे पहिले शतक आहे. विराट कोहली स्मिथचा हा विक्रम मोडू शकत नाही कारण भारतीय क्रिकेट बोर्ड आपल्या खेळाडूंना परदेशी लीगमध्ये खेळू देत नाही. अशा परिस्थितीत हा विक्रम मोडणे कोहलीसाठी जवळपास अशक्य आहे.

हेही वाचा: ICC Test Ranking: काय चेष्टा लावलीय! ऑस्ट्रेलियाने दोन तासात खाली खेचलं, भारतीय संघ अव्वलवरून दुसऱ्या स्थानावर, नेमकं काय घडलं? वाचा…

स्टीव्ह स्मिथला मिळाली नशिबाची साथ

ऑस्ट्रेलियाच्या बिग बॅश लीगमध्ये खेळताना स्टीव्ह स्मिथने जोरदार फटकेबाजी केली. त्याने अतिशय दमदार गोलंदाजी करत संघाला मोठी धावसंख्या तर उभारून दिलीच पण त्यासोबतच त्याने दमदार शतकही ठोकले. ५६ चेंडूत १०१ धावांची खेळी करत त्याने सामनावीराचा किताबही मिळवला. पण त्याच्या शतकात नशीबाची तगडी साथ लाभली. सिडनी सिक्सर्स विरुद्ध अॅडलेड स्ट्रायकर्स यांच्य सामन्यातील सिडनीचा डावाचे दुसरे षटक सुरू होते. स्टीव्ह स्मिथ २ चेंडूत २ धावांवर खेळत होता, मात्र त्यावेळी गोलंदाजाने चेंडू टाकला त्याने त्या चेंडूवर फटका न मारता केवळ बॅटने प्लेट केला आणि एक धाव काढली. चेंडू वेगाने आल्यामुळे बॅटला लागून स्टंपच्या दिशेने गेला. चेंडू स्टंपला लागणार याची स्मिथला जाणीव झाली होती पण आधीच तो धाव काढण्यासाठी पुढे धावला होता. त्यामुळे चेंडू अडवण्याआधीच स्टंपला लागला. पण एवढे होऊनही स्टंपवरील बेल्स खाली पडल्या नाहीत यालाच खरे नशीब आणि स्मिथला नशीबवान म्हणता येईल.

सिडनी सिक्सर्सने ५ विकेट्सच्या मोबदल्यात २०३ धावा केल्या

स्मिथच्या धडाकेबाज शतकामुळे सिडनी सिक्सर्सने ५ विकेट्स गमावून २०३ धावा केल्या. अशा स्थितीत हेडच्या नेतृत्वाखालील संघासमोर २०४ धावांचे लक्ष्य आहे. ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्मिथ सध्या जबरदस्त लयीत आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध नुकत्याच संपलेल्या कसोटी मालिकेत त्याने शानदार शतक झळकावले. त्याने ब्रॅडमन यांचा कसोटी सामन्यातील २९ शतकांचा विक्रमही मागे टाकला.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bbl2023 steve smiths luck was on top as the ball hits to stumps still bails didnt call off he remained notout check viral video avw