ईएसपीएन क्रिकइन्फोनुसार अजय रात्रा, अमय खुरासिया आणि एस शरथ हे भारताच्या वरिष्ठ पुरुष निवड समितीच्या पॅनेलमध्ये मुलाखत घेतलेल्या माजी खेळाडूंपैकी आहेत. बीसीसीआय नियुक्त क्रिकेट सल्लागार समितीने (CAC) चेतन शर्मा आणि हरविंदर सिंग यांच्यासह वरील खेळाडूंची मुलाखत घेतली. निवडलेल्या उमेदवारांनी पॅनेलसमोर सादरीकरण केले, जे या आठवड्यात त्यांच्या शिफारशी बोर्डाकडे सादर करणार आहेत. रिंगणात असलेले अन्य उमेदवार पूर्व विभागातून आलेले भारताचे माजी सलामीवीर एसएस दास आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

दक्षिण विभागातून आलेल्या सुनील जोशीची जागा घेण्यासाठी प्रबळ दावेदार म्हणून शरथ जो तामिळनाडूचा माजी फलंदाज उदयास आला आहे त्याच्याकडे पहिले जाते. सुनील जोशी यांनी पुन्हा अर्ज न करण्याचा निर्णय घेतला आहे. जर शरथला ही संधी मिळाली तर त्याची उन्नती होईल. तो सध्या ज्युनियर पुरुष संघाच्या पॅनेलचा अध्यक्ष आहे, त्याच्या समितीनेच गेल्या वर्षी भारताच्या अंडर-१९ विश्वचषक विजेत्या संघाची निवड केली होती.

पूर्व विभागातून आलेला दास त्याचा माजी सहकारी देबासिस मोहंती याच्या जागी येण्याची शक्यता आहे, ज्यांच्यासोबत तो भारत आणि ओडिशाकडून खेळला. दास यांनी २००० ते २००२ दरम्यान २३ कसोटी आणि चार एकदिवसीय सामन्यांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले आणि १८० प्रथम श्रेणी क्रिकेट सामनेही खेळले. बीसीसीआयने नवीन निवड पॅनेलसाठी अर्ज मागवल्याशिवाय पूर्व विभागातून नवीन निवडकर्त्याची गरज निर्माण झाली नसती. मोहंती यांनी विविध क्रिकेट समित्यांमध्ये त्यांचा कमाल-निर्धारित संचयी पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला होता. तो कनिष्ठ आणि वरिष्ठ अशा दोन्ही पॅनेलचा भाग होता.

हेही वाचा: IND vs SL 1st T20: हार्दिक ब्रिगेडने केले लंकादहन! टीम इंडियाचा श्रीलंकेवर दोन धावांनी विजय, मालिकेत १-० ने आघाडी

अशाच प्रकारे, माजी भारतीय वेगवान गोलंदाज अबे कुरुविलाने जास्तीत जास्त पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केल्यानंतर चेतन शर्माच्या नेतृत्वाखालील निवड पॅनेलची संख्या चार सदस्यांवर आणल्यामुळे बोर्डाला पश्चिम विभागातून नवीन निवडकर्ता नियुक्त करावा लागला असता. कुरुविला बीसीसीआयचे महाव्यवस्थापक (क्रिकेट विकास) बनले आणि बोर्डाने त्यांच्या बदलीसाठी नावही दिले नाही.

सोमवारी असे दिसून आले की चेतन शर्मा हे अध्यक्षपदी कायम राहू शकतात कारण ते बीसीसीआय च्या आढावा बैठकीचा भाग होते ज्यात भारताच्या आयसीसी टी२० विश्वचषक २०२२ च्या कामगिरीबद्दल आणि या वर्षाच्या अखेरीस होणाऱ्या ५० षटकांच्या विश्वचषकासाठी रोडमॅपवर चर्चा झाली. या बैठकीला भारताचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड, कर्णधार रोहित शर्मा, एनसीए प्रमुख व्हीव्हीएस लक्ष्मण आणि बोर्डाचे उच्चपदस्थ अधिकारी उपस्थित होते.

विद्यमान पॅनेलला रणजी करंडक स्पर्धेच्या चौथ्या फेरीदरम्यान विविध ठिकाणी अहवाल देण्यास सांगण्यात आले नाही. श्रीलंकेविरुद्धच्या पांढऱ्या चेंडूंच्या मालिकेसाठी संघ निवडण्यासाठी आणि २७-३० डिसेंबर दरम्यान तिसऱ्या फेरीतील रणजी सामन्यांचा मागोवा घेण्यासाठी २०२२ अखेरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. निवड समितीसाठी मुलाखती घेणार्‍या सीएसीमध्ये माजी खेळाडू अशोक मल्होत्रा, जतीन परांजपे आणि सुलक्षणा नाईक यांचा समावेश आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bcci selection committee bccis preparations for the selection committee are complete cac interviews applicants chetan sharma again avw