वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग २०२२ मध्ये भारतासाठी एक नवीन स्विंग गोलंदाज म्हणून उदयास आला आहे. युवा डावखुरा वेगवान गोलंदाजाने भारताच्या टी२० संघात आपले स्थान काही कालावधीतच पक्के केले. तसेच तो एकदिवसीय सामन्यातही अशीच कामगिरी करणार अशी सर्वांना खात्री आहे. जसप्रीत बुमराहच्या अनुपस्थितीत अर्शदीपने जूनमध्ये पदार्पण केले होते. तेव्हापासून तो कर्णधार रोहित शर्माचा आवडता गोलंदाज बनला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नव्या चेंडूवर आणि डेथ ओव्हर्समध्ये प्रभावी गोलंदाजी करत त्याने मोठी जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली आहे. त्याने २३ सामन्यात ३३ बळी घेतले आहेत. मात्र, ऑस्ट्रेलियाचा माजी वेगवान गोलंदाज ब्रेट लीने अर्शदीपला काही महत्त्वाचा सल्ला दिला आहे, ज्यामुळे तो चांगला होण्यास मदत होईल आणि ट्रॅकवरून घसरणे टाळता येईल. “ब्रेट लीने अर्शदीपला आणि अगदी भारताचे प्रशिक्षक राहुल द्रविड आणि कर्णधार रोहित शर्मा यांना दिलेली पहिली सूचना ही होती की या तरुण गोलंदाजाला अतिविचार आणि टीकेपासून दूर ठेवा. अर्शदीप सिंग वेगवेगळ्या मतांचा बळी ठरल्याने त्याच्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो,” असे ब्रेट लीचे मत आहे.

ब्रेट ली जगातील सर्वात धोकादायक वेगवान गोलंदाजांपैकी एक आहे. त्याच्या यूट्यूब चॅनेलवर तो बोलताना म्हणाला, “बर्‍याच वेळा संघांना या तरुण आणि ब्रेकआउट स्टार्सचे काय करावे हे समजत नाही. संघात तरुण खेळाडू सामील झाल्यावर आम्ही हे यापूर्वी पाहिले आहे की हॉटेलमधील खेळाडू, टीव्ही समालोचक यांच्याकडून ते सल्ला घेतात आणि ती चांगली गोष्ट आहे. प्रत्येक माणसाचा हेतू चांगला असतो पण अनेक वेळा जास्त सल्ला हानीकारक ठरू शकतो. त्यामुळे मला वाटते की अर्शदीप सिंगला राहुल द्रविड आणि रोहित शर्मा यांनी त्याला समजवून सांगितले पाहिजे, हे ओव्हरडोस रोखण्याची त्यांची जबाबदारी आहे.”

हेही वाचा :   FIFA World Cup 2022: “मला विश्वास आहे की…”, ब्राझीलच्या प्रशिक्षकांचे नेमारच्या दुखापतीवर केले मोठे विधान

जास्त कसरत न करताही शानदार गोलंदाजी करू शकतो

ऑस्ट्रेलियाचा माजी वेगवान गोलंदाज ब्रेट लीने जसप्रीत बुमराह आणि दीपक चहरसारख्या गोलंदाजांचे उदाहरण दिले. दोन्ही खेळाडूंना जिम आणि वर्कआऊटमुळे दुखापतीचा सामना करावा लागल्याचे त्यांनी सांगितले. तसेच अर्शदीप सिंगने ते टाळावे असेही ते म्हणाले. ब्रेट लीचा असा विश्वास आहे की अर्शदीप सिंग जास्त कसरत न करताही चमकदार गोलंदाजी करू शकतो. तो एक उत्कृष्ट गोलंदाज आहे. ऑस्ट्रेलियाचा माजी वेगवान गोलंदाज म्हणाला की, एक वेगवान गोलंदाज असल्याने लोक अर्शदीप सिंगला जिममध्ये जाण्याचा सल्ला देतील, परंतु मला विश्वास आहे की तो जिममध्ये न जाताही चांगले करेल, त्याने ते टाळले पाहिजे.

भारताचा हा २३ वर्षीय वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग बहुतेक वेळा १३०च्या वेगाने गोलंदाजी करतो आणि कधीकधी १४५च्या आकड्याला स्पर्श करतो. अर्शदीपने वेगाला प्राधान्य देऊ नये, अशी लीची इच्छा आहे. ब्रेट ली ला वाटते की अर्शदीपने योग्य गतीने गोलंदाजी करावी, ज्यामुळे त्याला लाईन आणि लेंथवर लक्ष केंद्रित करता येईल.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Brett lees special advice to arshdeep singh know what the former australian fast bowler had to say avw