Border Gavaskar Trophy, Sarfaraz Khan: भारतीय संघ न्यूझीलंडविरुद्ध ३ टी२० सामन्यांची मालिका खेळत आहे. आज या मालिकेतील पहिला सामना रांचीमध्ये होणार आहे. त्याचबरोबर न्यूझीलंड मालिकेनंतर टीम इंडिया ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४ कसोटी सामन्यांची बॉर्डर गावसकर ट्रॉफी खेळणार आहे. या मालिकेतील पहिला कसोटी सामना ९ फेब्रुवारीपासून नागपुरात खेळवला जाणार आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलपूर्वी बॉर्डर गावसकर ट्रॉफी ही भारतासाठी शेवटची मालिका असेल. भारतीय संघ ही मालिका जिंकून जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत धडक मारणार आहे. यानंतर जुलैमध्ये जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचा अंतिम सामना खेळवला जाईल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वास्तविक, बांगलादेशविरुद्धच्या कसोटीत सरफराजला संधी मिळणार असल्याची चर्चा होती. पण तिथे तो बाजूला झाला. तो ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी संघाच्या घोषणेची वाट पाहत होता. पण तिथेही या खेळाडूने निराशा केली. मात्र, या खेळाडूबाबत अनेक दिग्गजांनी बीसीसीआयवर टीकाही केली. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये सरफराजची सरासरी ८० च्या पुढे गेली आहे. त्याने विराट आणि सचिनसारख्या दिग्गजांना मागे सोडले आहे. त्याचवेळी आता चेतन शर्मा यांच्या अध्यक्षतेखालील समितीचे नवे सदस्य श्रीधरन शरथ यांनी याप्रकरणी मौन सोडले आहे.

हेही वाचा: IND W vs NZ W T20: छोट्या लेकींचा मोठा विजय! न्यूझीलंडवर आठ विकेट्सने मात; अंडर-१९ वर्ल्डकपच्या फायनलमध्ये थाटात प्रवेश

सर्फराज खानला जागा का मिळाली नाही?

आता श्रीधरन शरथने सरफराज खानवर मोठे वक्तव्य केले आहे. वास्तविक, श्रीधरन शरथ हा बीसीसीआयच्या निवड समितीच्या पाच सदस्यांपैकी एक आहे. तो म्हणाला की सरफराज खान नक्कीच आमच्या रडारवर आहे, पण सर्वोत्तम संघ निवडणे आमच्यासाठी प्राधान्य आहे. संघ निवडीदरम्यान समतोल राखला पाहिजे, याला आमचे प्राधान्य आहे. विशेष म्हणजे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या बॉर्डर-गावसकर मालिकेसाठी सरफराज खानची निवड न करण्यावर अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले होते, मात्र आता श्रीधरन शरथ यांनी यावर मौन सोडले आहे.

रवींद्र जडेजा परतला

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या बॉर्डर-गावस्कर मालिकेसाठी रवींद्र जडेजाचे भारतीय संघात पुनरागमन झाले आहे. भारतीय अष्टपैलू खेळाडू तब्बल ४ महिन्यांनंतर टीम इंडियाच्या जर्सीत दिसणार आहे. मात्र, सर्फराज खानला या संघात स्थान मिळाले नाही. तर सरफराज खानने देशांतर्गत क्रिकेटमध्ये खूप धावा केल्या. वास्तविक, ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या बॉर्डर-गावसकर मालिकेसाठी सरफराज खानची संघात निवड होऊ शकते, असे मानले जात होते, परंतु निवडकर्त्यांनी विश्वास दाखवला नाही. यानंतर संघ निवडीवर अनेक प्रश्न निर्माण झाले.

हेही वाचा: Border Gavaskar Trophy: ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेपूर्वी गांगुलीचा कोहलीला महत्वाचा सल्ला; म्हणाला, ‘त्याला कसोटी क्रिकेटमध्ये…’

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलचे समीकरण काय आहे?

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलमध्ये ऑस्ट्रेलिया खेळणार हे जवळपास निश्चित झालं आहे. दुसरीकडे भारतीय संघ बॉर्डर गावसकर ट्रॉफी जिंकण्यात यशस्वी ठरला तर अंतिम फेरीतील आपले स्थान निश्चित करेल. अशा प्रकारे टीम इंडियासाठी बॉर्डर गावसकर ट्रॉफी खूप महत्त्वाची आहे. वास्तविक, टीम इंडिया वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत पोहोचण्याचा प्रबळ दावेदार आहे, पण दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंका यांसारख्या संघांकडून कडवी स्पर्धा आहे. मात्र, भारतीय संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध मायदेशात कसोटी मालिका खेळणार असून, त्यामुळे रोहित शर्माचा संघ प्रबळ दावेदार मानला जात आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Consolation was given to sarfaraz khan again the new member of the board disclosed why didnt he get the chance avw
First published on: 27-01-2023 at 18:24 IST