भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी मालिकेला सुरुवात होण्यासाठी अवघे काही दिवस उरले आहेत. कांगारू संघाने बंगळुरूमध्ये कॅम्प लावून सराव केला आहे. आता खऱ्या लढतीची पाळी आहे. ९ फेब्रुवारीला कसोटी सामना सुरू होण्याआधी अनेक ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी या मालिकेबद्दल आपले मनोगत व्यक्त केले आहे. ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टीव्ह स्मिथ, डेव्हिड वॉर्नरसह इतर खेळाडूंनी सांगितले की, भारतात मालिका जिंकणे अॅशेसपेक्षा मोठे असेल.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

क्रिकेट ऑस्ट्रेलियाने एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये वेगवेगळ्या खेळाडूंनी त्यांचे अनुभव शेअर केले आहेत. कांगारू संघाचा कर्णधार पॅट कमिन्स म्हणाला की, ऑस्ट्रेलियासाठी येथे मालिका जिंकणे खूप कठीण आहे आणि आम्ही जिंकलो तर ते ऐतिहासिक असेल. डेव्हिड वॉर्नर म्हणाला की, हे खूप महत्त्वाचे आहे, आम्हाला जगातील सर्वात कठीण आणि सर्वोत्तम फिरकीपटूंविरुद्ध खेळण्याची संधी मिळेल.

ऑस्ट्रेलियाचा फिरकीपटू नॅथन लायन म्हणाला की, हा मोठा आणि आव्हानात्मक दौरा असेल, पण मला वाटते की मी माझ्या संघासाठी आणखी चांगली कामगिरी करू शकेन. या मालिकेतही तेच करण्याचा प्रयत्न करेन. वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क म्हणाला की, एकीकडे ऍशेसचा इतिहास आहे, जिथे आपण जिंकत आहोत. पण दुसरीकडे भारत आहे, जिथे आपल्याला मालिका जिंकून बराच काळ लोटला आहे.

विशेष म्हणजे, ऑस्ट्रेलियाने भारतात शेवटची कसोटी मालिका २००४-०५ मध्ये जिंकली होती, तेव्हा भारताला १-२ ने मालिका गमवावी लागली होती. जर शेवटच्या कसोटी मालिकेबद्दल बोलायचे तर, ऑस्ट्रेलियाने २०१४-१५ मध्येच मालिका जिंकली होती. तेव्हापासून बॉर्डर-गावसकर ट्रॉफी तीन वेळा आयोजित केली गेली आहे आणि तिन्ही वेळा भारत जिंकला आहे.

हेही वाचा – IND vs AUS: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील Border-Gavaskar Trophy कोण जिंकणार? महेला जयवर्धनेने केली मोठी भविष्यवाणी

भारत दौऱ्यासाठी ऑस्ट्रेलियाचा कसोटी संघ:

पॅट कमिन्स (कर्णधार), अॅश्टन आगर, स्कॉट बोलँड, अॅलेक्स कॅरी, कॅमेरॉन ग्रीन, पीटर हँड्सकॉम्ब, जोश हेझलवूड, ट्रॅव्हिस हेड, उस्मान ख्वाजा, मार्नस लाबुशेन, नॅथन लायन, लान्स मॉरिस, टॉड मर्फी, मॅथ्यू रेनशॉ, स्टीव्ह स्मिथ (उपकर्णधार) मिचेल स्टार्क, मिचेल स्वीपसन आणि डेव्हिड वॉर्नर

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: David warner pat cummins steve smith says why winning test series is important in india watch video vbm