WPL 2023 1st Match MIW vs GGW: महिला प्रीमियर लीग २०२३ या स्पर्धेला आज पासून सुरुवात होणार आहे. या स्पर्धेतील पहिला सामना गुजरात जायंट्स आणि मुंबई इंडियन्स संघात खेळला जाणार आहे. या सामन्याला रात्री आठला सुरुवात होणार आहे. तत्पुर्वी गुजरात जायंट्सला मोठा धक्का बसला आहे. वेस्ट इंडिजची स्टार अष्टपैलू डिआंड्रा डॉटिन या स्पर्धेतून बाहेर झाली आहे. डॉटिन अजूनही दुखापतीतून सावरत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

जायंट्सने ऑस्ट्रेलियन अष्टपैलू खेळाडू किम गर्थला बदली म्हणून निवडले आहे. म्हणजे बसल्या बसल्या गर्थने लॉटरी जिंकली. जायंट्सने ५० लाख रुपयांच्या मूळ किमतीची बोली लावून लिलावात डॉटिनला ६० लाख रुपयांना विकत घेतले होते.

गर्थ गेल्या महिन्यात अनसोल्ड राहिली होती –

विशेष म्हणजे गेल्या महिन्यात महिला आयपीएलचा लिलाव पार पडला होता. या लिलावात गर्थ अनसोल्ड राहिली होती. लिलावाच्या वेळी ती दक्षिण आफ्रिकेत टी-२० विश्वचषक जिंकणाऱ्या ऑस्ट्रेलिया संघासोबत होती. गर्थने विश्वचषकापूर्वी केवळ दोन सराव सामने खेळले, ज्यात तिचा माजी संघ आयर्लंडविरुद्धचा एक सामना होता. ती नुकतीच ऑस्ट्रेलियाला गेली होती.

त्याने डब्ल्यूबीबीएल मध्ये मेलबर्न स्टार्ससोबत तीन वर्षांचा करारही केला आहे. ती जायंट्स संघात सामील झाली आहे. जायंट्सचा पहिला डब्ल्यूपीएल सामना शनिवारी रात्री नवी मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियमवर मुंबई इंडियन्सविरुद्ध होणार आहे. ऑस्ट्रेलियाची बेथ मुनी या संघाचे नेतृत्व करणार आहे. ५३ चेंडूत नाबाद ७४ धावा करणारी मूनी विश्वचषक फायनलमध्ये सामनावीर ठरली होती.

धमाकेदार सोहळ्यासह स्पर्धेला होणार सुरुवात –

महिला प्रीमियर लीग (WPL 2023) ची सुरुवात ४ मार्चपासून मुंबईत सुरू होत आहे. बीसीसीआयने हा कार्यक्रम भव्यदिव्य करण्यासाठी कोणतीही कसर सोडली नाही. डीवाय पाटील स्टेडियमवर होणाऱ्या उद्घाटन सोहळ्याला बॉलिवूड सुपरस्टार कियारा अडवाणी आणि क्रिती सॅनन उपस्थित राहणार आहेत. यासोबतच सुप्रसिद्ध गायक एपी ढिल्लन हे डब्ल्यूपीएल २०२३ गाणे सादर करणार आहे.

हेही वाचा – Umesh Yadav Tweet: ‘…. म्हणून उमेश यादवने पंतप्रधान मोदींचे मानले आभार’; जाणून घ्या काय आहे कारण

गुजरात जायंट्स स्क्वॉड: बेथ मुनी (कर्णधार), स्नेह राणा, अॅश्ले गार्डनर, सोफिया डंकले, अॅनाबेल सदरलँड, हरलीन देओल, किम गर्थ, सबिनेनी मेघना, जॉर्जिया वेरेहम, मानसी जोशी, दयालन हेमलता, मोनिका पटेल, तनुजा कंवर, सुषमा वर्मा गाला, अश्विनी कुमारी, पारुनिका सिसोदिया, शबमन शकील.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Deandra dottin out of the wpl 2023 and gujarat giants have picked kim garth as their replacement vbm