Dewald Brevis selected in South Africa T20 and ODI squad: एकदिवसीय विश्वचषकापूर्वी दक्षिण आफ्रिकेच्या संघाला ऑस्ट्रेलियाविरुद्ध पाच एकदिवसीय आणि तीन टी-२० सामन्यांची मालिका खेळायची आहे. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेने वनडे आणि टी-२० मालिकेसाठी संघ जाहीर केला आहे. मुंबई इंडियन्सकडून खेळणारा स्टार खेळाडू डेवाल्ड ब्रेविसला दक्षिण आफ्रिकेच्या संघात संधी मिळाली आहे. हा खेळाडू उत्कृष्ट फलंदाजीसाठी जगभर प्रसिद्ध आहे. तो आयपीएल स्पर्धेत मुंबई इंडियन्सचे प्रतिनिधित्व करतो.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मुंबई इंडियन्सच्या खेळाडूला मिळाली संधी –

आयपीएल २०२२ च्या मेगा लिलावात मुंबई इंडियन्सने डेवाल्ड ब्रेविसला ३ कोटी रुपयांना विकत घेतले. ब्रेविसने अंडर-१९ वर्ल्ड कपमध्ये दक्षिण आफ्रिकेसाठी चांगली कामगिरी केली होती. त्याने या स्पर्धेत दोन शतकांच्या जोरावर ५०६ धावा केल्या. त्याची तुलना दिग्गज एबी डिव्हिलियर्सशी केली जाते. या कारणास्तव त्याला मुंबई इंडियन्सकडून मोठी रक्कम मिळाली. यानंतर त्याने आयपीएल २०२२ च्या ७ सामन्यात १६१ धावा केल्या होत्या. आपल्या सिक्स मारण्याच्या कौशल्याने सर्वांना प्रभावित करण्यात तो यशस्वी ठरला.

हा खेळाडू बनला कर्णधार –

डेवाल्ड ब्रेविसला प्रथमच दक्षिण आफ्रिकेच्या वनडे आणि टी-२० संघात स्थान मिळाले आहे. तो गेल्या काही काळापासून उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे. त्याने गेल्या वर्षी टी-२० लीग आणि सीएसए टी-२० मध्ये खूप धावा केल्या आहेत. ब्रेविस व्यतिरिक्त डोनोव्हन फरेरा, जेराल्ड कोएत्झी आणि मॅथ्यू ब्रेत्झके यांनाही टी-२० संघात स्थान मिळाले आहे. त्याचबरोबर एकदिवसीय विश्वचषक डोळ्यासमोर ठेवून टेंबा बावुमाला वनडे संघाचा कर्णधार बनवण्यात आले आहे.

आतापर्यंत तीन मालिका खेळल्या आहेत –

यंदाच्या वर्षात दक्षिण आफ्रिकेच्या संघाने एकदिवसीय सामन्यांच्या तीन मालिका खेळल्या आहेत, त्यापैकी दोन जिंकल्या आहेत आणि एक अनिर्णित राहिली. दक्षिण आफ्रिकेने इंग्लंडविरुद्ध २-१आणि नेदरलँड्सविरुद्ध २-० असा विजय मिळवला. त्याचबरोबर वेस्ट इंडिजविरुद्धची मालिका १-१ अशी बरोबरीत सुटली होती. एकदिवसीय विश्वचषकासाठी दक्षिण आफ्रिकेसाठी ही मालिका खूप महत्त्वाची आहे.

हेही वाचा – IND vs WI: मालिका गमावल्याने माजी खेळाडूने भारताच्या बॅटिंग ऑर्डरवर उपस्थित केला सवाल; विचारले, संजूला पाचव्या क्रमांकावर का पाठवले?

दक्षिण आफ्रिका टी-२० संघ:

एडन मार्कराम (कर्णधार), टेम्बा बावुमा, मॅथ्यू ब्रेट्झके, डेवाल्ड ब्रेविस, जेराल्ड कोएत्झी, डोनोव्हन फरेरा, ब्योर्न फोर्टुइन, रीझा हेंड्रिक्स, मार्को जॅन्सन, सिसांडा मगला, केशव महाराज, लुंगी एनगिडी, तबरेझ शम्सी,ट्रिस्टन स्टब्स, लिजाड विल्यम्स आणि रॅसी व्हॅन डर ड्युसेन.

दक्षिण आफ्रिका एकदिवसीय संघ:

टेम्बा बावुमा (कर्णधार), डेवाल्ड ब्रेविस, गेराल्ड कोएत्झी, क्विंटन डी कॉक, ब्योर्न फोर्टुइन, रीझा हेंड्रिक्स, मार्को जॅन्सेन, हेन्रिक क्लासेन, सिसांडा मॅगाला, केशव महाराज, एडन मार्कराम, डेव्हिड मिलर, लुंगी एनगिडी, अॅनरिक नॉर्टजे, ब्रीज, तबरेझ शम्सी, वॅन पारनेल, कागिसो रबाडा, ट्रिस्टन स्टब्स आणि रॅसी व्हॅन डर डुसेन.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dewald brewis was selected in the sa squad for the odi and t20i series against aust vbm