scorecardresearch

Premium

IND vs WI: मालिका गमावल्याने माजी खेळाडूने भारताच्या बॅटिंग ऑर्डरवर उपस्थित केला सवाल; विचारले, संजूला पाचव्या क्रमांकावर का पाठवले?

Akash Chopra’s reaction to Sanju Samson: भारत आणि वेस्ट इंडिज संघांतील पाच सामन्यांची टी-२० मालिका रविवारी पार पडली. या मालिकेत संजू सॅमसन काही विशेष करू शकला नाही. पाच सामन्यांच्या तीन डावात त्याला केवळ ३२ धावा करता आल्या.

Akash Chopra's reaction to India's batting order
संजू सॅमसन (फोटो-ट्विटर)

Akash Chopra’s reaction to India’s batting order: टीम इंडियाला वेस्ट इंडिज विरुद्धच्या पाचव्या आणि शेवटच्या टी-२० सामन्यात ८ गडी राखून पराभव स्वीकारावा लागला. हा सामना गमावल्यानंतर भारतीय संघाने कॅरेबियन संघाकडून मालिका २-३ अशी गमावली. या पराभवानंतर टीम इंडियाच्या फलंदाजीवर आणि रणनीतीवर प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. माजी भारतीय क्रिकेटपटू आणि आता प्रसिद्ध समालोचक आकाश चोप्राने यष्टीरक्षक-फलंदाज संजू सॅमसनला सतत पाचव्या क्रमांकावर पाठवण्यावर प्रश्न उपस्थित केले आहेत. वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेसाठी संजूचा सहाव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी संघात समावेश करण्यात आला होता.

टीम इंडियात प्रदीर्घ कालावधीनंतर स्थान मिळालेल्या संजूला वेस्ट इंडिजविरुद्धच्या पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेत विशेष काही करता आले नाही. पाचव्या आणि शेवटच्या टी-२० सामन्यात तो १३ धावा करून बाद झाला. संजूला पाच सामन्यांच्या तीन डावात केवळ ३२ धावा करता आल्या. खराब कामगिरीमुळे संजूवर बरीच टीका होत आहे. मात्र, छोट्या खेळीनंतरही संजूने टी-२० क्रिकेटमध्ये मोठी कारनामा आपल्या नावावर केला. त्याने टी-२० मध्ये ६००० धावांचा टप्पा पार केला.

After the series win against Australia K.L. Rahul's big statement Said Choosing playing XI will be headache for Rohit-Dravid
IND vs AUS: ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिका विजयानंतर के.एल. राहुलचे सूचक विधान; म्हणाला, “प्लेईंग-११ निवडणे रोहित-द्रविडसाठी…”
Indian cricket team
विश्लेषण : कसोटी, एकदिवसीय, ट्वेन्टी-२०… क्रिकेटच्या तीनही प्रकारांत भारतीय संघ अव्वल कसा ठरला?
IND vs AUS 1st ODI: Team India becomes No.1 in ICC ranking after beat Australia by five wickets Shubman-Rituraj excellent batting
IND vs AUS 1st ODI: टीम इंडिया बनली नंबर १! भारताची ऑस्ट्रेलियावर पाच विकेट्सने मात, शुबमन-ऋतुराज चमकले
Bhai nind me khel rahe ho kya Indian fans got angry after seeing KL Rahul's poor wicketkeeping created class through memes
KL Rahul: “भाई नींद में खेलता…”, के.एल. राहुलची खराब विकेटकीपिंग पाहून भारतीय चाहते संतापले; सोशल मीडियावर झाला ट्रोल

वेस्ट इंडिजविरुद्धच्या पराभवानंतर आकाश चोप्रा त्याच्या यूट्यूब चॅनलवर म्हणाला, “तिलक वर्मा आऊट झाला आणि भारताने पुन्हा एकदा त्यांच्या फलंदाजीमध्ये बदल केला. यावेळी तुम्ही संजू सॅमसनला पाचव्या क्रमांकावर फलंदाजी करण्यास सांगितले आणि हार्दिक पांड्या स्वतः सहाव्या क्रमांकावर आला. त्याने (सॅमसन) एक-दोन चांगले शॉट्स खेळले आणि मग तो बाद झाला.”

हेही वाचा – Rishabh Pant: केएल राहुल आणि श्रेयस अय्यर आशिया कपमध्ये खेळणार? ऋषभ पंतने शेअर केला फलंदाजी करतानाचा VIDEO

संजूला पाचव्या क्रमांकावर का पाठवले?

आकाश चोप्रा पुढे म्हणाला, “तुम्ही सहाव्या क्रमांकासाठी ऑडिशन देत असताना तुम्ही त्याला पाचव्या क्रमांकावर का पाठवत आहात? हे समजून घेण्याचा मी प्रयत्न करत आहे. त्याने खूप संधी गमावल्या आहेत? संजू सॅमसनचे काय? हा एक मोठा प्रश्न आहे. संजू सॅमसन जेव्हा त्याचे शॉट्स खेळतो, तेव्हा तो खूप चांगला खेळाडू दिसतो आणि तुम्हाला असे वाटते की त्याला सर्व सामने खेळवले जावे आणि त्याला भरपूर संधी द्याव्यात, परंतु जेव्हा तुम्ही त्याला ५ किंवा ६ क्रमांकावर खेळवता आणि तो धावा करत नाही, तेव्हा मग तो संधी गमावत असल्याची चर्चा रंगते.”

हेही वाचा – IND vs WI : सूर्यकुमार यादव आणि संजू सॅमसनसाठी आखली होती खास योजना, सामन्यानंतर रोमारियो शेफर्डने केला खुलासा

संजूने भारतासाठी आतापर्यंत केवळ २२ टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. केरळचा क्रिकेटपटू अलीकडच्या वर्षांत आयपीएलमधील राजस्थान रॉयल्सचा सर्वात मोठा सुपरस्टार म्हणून उदयास आला आहे. वेस्ट इंडिजविरुद्धच्या पाचव्या टी-२० सामन्याबद्दल बोलायचे झाले तर, ब्रँडन किंग (नाबाद ८५) आणि निकोलस पूरन (४७) यांच्यातील दुस-या विकेटसाठीच्या शतकी भागीदारीच्या जोरावर वेस्ट इंडिजने भारताचा ८ विकेट्सने पराभव केला.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व क्रीडा, वर्ल्डकप २०२३ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Akash chopra questioned sanju samsons decision to bat at number five in ind vs wi t20 series vbm

First published on: 14-08-2023 at 20:49 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×