Hardik Pandya Mahieka Sharma Video: हार्दिक पंड्या सध्या दुखापतीमुळे क्रिकेटच्या मैदानापासून दूर आहे. पण त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे तो चर्चेत आहेत. हार्दिक पंड्या गेल्या काही दिवसांपासून त्याची नवी गर्लफ्रेंड माहिका शर्माबरोबरचे फोटो चाहत्यांबरोबर शेअर करत आहे. हे दोघे एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चांवर आता शिक्कामोर्तब झालेला असताना हार्दिकने दोघांचा नवा व्हीडिओ शेअर केला आहे.

हार्दिक आणि माहिका आता रिलेशनशिपमध्ये असल्याचं हार्दिकच्या या नव्या व्हीडिओमधून अगदी पक्क झालं आहे. हार्दिक पांड्याने स्वतः इन्स्टाग्रामवर अनेक फोटो आणि व्हिडिओ पोस्ट केले आहेत, ज्यामध्ये तो आणि माहिका शर्मा एकत्र दिसत आहेत. आता तर या शेअर केलेल्या व्हीडिओमध्ये माहिका शर्मा हार्दिक पंड्याला किस करताना दिसत आहे.

हार्दिक पंड्याची इन्स्टाग्रामवरील एक नवीन पोस्ट सध्या चांगलीच व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये तो त्याची कार धुताना दिसत आहे. हार्दिक एका कपड्याने त्याची कार स्वच्छ करतो आहे. तर माहिका शर्माच्या हातात पाण्याचा पाईप असून ती कार पाण्याने स्वच्छ करण्यासाठी थांबलेली आहे. तितक्यात हार्दिक पुढे जातो आणि माहिका त्याला गालावर किस करते.

हार्दिक आणि माहिकाच्या या व्हीडिओने सध्या सर्वांचं लक्ष वेधलं आहे. यानंतर हार्दिक पुन्हा गाडी धुण्यासाठी सुरूवात करतो. डिटर्जंट आणि साबणने त्याने स्वच्छ केल्यानंतर, तो महिका शर्माला इशारा करत गाडीवर पाणी टाकण्यास सांगतो. असा हा संपूर्ण व्हीडिओ आहे.

हा फक्त हार्दिक पंड्याच्या इन्स्टाग्राम पोस्टमधील एक व्हिडिओ आहे. त्याने याबरोबर इतर अनेक फोटो आणि व्हिडिओ देखील शेअर केले आहेत. एका फोटोमध्ये हार्दिक आणि माहिका पाण्यात असतानाचा रोमँटिक फोटोही आहे. एक व्हिडिओ त्यांच्या रोड ट्रिपचा आहे. एकंदरीत, शेअर केलेले सर्व व्हिडिओ आणि फोटो एकाच वेळी नसून वेगवेगळ्या दिवसांचे असून दोघेही या फोटोंमध्ये एकत्र दिसत आहेत.

हार्दिक पंड्या आगामी दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या वनडे मालिकेतून संघात पुनरागमनासाठी सज्ज आहे. हार्दिक पंड्या भारतीय संघाचा महत्त्वाचा अष्टपैलू खेळाडू असून त्याने आपल्या कामगिरीने संघाच्या विजयामध्ये मोठी भूमिका निभावली होती. आशिया चषक स्पर्धेत खेळताना हार्दिक पंड्याला दुखापत झाली होती आणि त्यानंतर तो अंतिम सामन्यातही खेळताना दिसला नाही.