Harmanpreet Kaur Outstanding Catch Video : महिला प्रीमियर लीगमध्ये एकाहून एक रंगतदार सामने होत आहेत. आज नवी मुंबईच्या डी वाय पाटील स्टेडियमध्ये या लीगचा १५ सामना खेळवण्यात आला. मुंबई इंडियन्स आणि यूपी वॉरियर्स मैदानात आमने-सामने उतरले होते. यूपीन नाणेफेक जिंकून प्रथम फलंजदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर यूपी वॉरियर्सच्या गोलंदाजांनी चमकदार कामगिरी करुन मुंबईचा आख्खा संघ १२७ धावांवर गारद केला. त्यामुळे यूपीला विजयासाठी १२८ धावांचं लक्ष्य गाठण्याचं आव्हान होतं. पॉवर प्लेमध्ये खराब सुरुवात झाल्यानंतर यूपीच्या ग्रेस हॅरिसने २८ चेंडूत ३९ धावांची खेळी साकारली. तसंच शेवटच्या षटकात ५ धावांची आवश्यकता असताना सोफीने षटकार ठोकून यूपी वॉरियर्सला विजयी सलामी दिली. पण पॉवर प्लेमध्ये हरमनप्रीत कौरने एका हातात झेल पकडून देविका वैद्यला स्वस्तात माघारी पाठवलं.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हरमनप्रीत कौरच्या अप्रतिम झेलचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.मुंबई वॉरियर्सने १२८ धावांचं आव्हान दिल्यानंतर यूपीची सलामीवीर फलंदाज देविका वैद्य मैदानात उतरली होती. पण हेली मॅथ्यूजच्या गोलंदाजीवर देविकाने स्लिपमध्ये फटका मारला. मात्र, स्लिपमध्ये चेंडूकडे टक लावून बसलेल्या हरमनप्रीतने एका हातात देविकाचा जबरदस्त झेल पकडला, फलंदाजीत चौफेर फटकेबाजी करणाऱ्या हरमनप्रीतने क्षेत्ररक्षणातही चमकदार कामगिरी केल्यानं संघाच्या खेळाडूंनी तसंच प्रेक्षकांनी तिच्यावर स्तुतीसुमने उधळली. हरमनप्रीतच्या झेलचा व्हिडीओ वुमन्स प्रीमियर लीगने ट्वीटर हॅंडलवर शेअर केला आहे.

नक्की वाचा – MI-W vs UPW-W : सोफीने षटकार ठोकून यूपी वॉरियर्सच्या विजयाचा झेंडा फडकवला, WPL मध्ये मुंबईचा पहिला पराभव

इथे पाहा व्हिडीओ

दरम्यान, यूपीची खराब सुरुवात झाल्यानंतरही ताहिला मेक्ग्राने चौफेर फटकेबाजी केली. ताहिलाने २५ चेंडूत ३८ धावा कुटल्या. पण अमेलिया केरच्या गोलंदाजीवर ताहिला बाद झाल्याने यूपीला मोठा धक्का बसला. मात्र, कठीण परिस्थितीत ग्रेस हॅरिसने २८ चेंडूत ३९ धावांची खेळी साकारली. पण केरच्या गोलंदाजीवर हॅरिसचा झंझावात थांबला. मात्र, यूपीची अष्टपैलू खेळाडू सोफी एक्लेस्टोनने शेवटच्या षटकात यूपीला ५ धावांची गरज असताना षटकार ठोकला. सोफीने षटकार ठोकून यूपी वॉरियर्सला विजयी सलामी दिली. त्यामुळे मुंबई इंडियन्सचा या लीगमध्ये पहिला पराभव झाला.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Harmanpreet kaur takes jaw dropping catch of devika vaidya harmanpreet takes brilliant catch viral video mi women vs up warriors women nss