ICC Men’s Test Team of The Year 2022: आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने सर्वोत्तम पुरुष कसोटी संघ जाहीर केला आहे. आयसीसीने जाहीर केलेल्या २०२२ च्या सर्वोत्तम पुरुष कसोटी संघात ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेटपटूंनी वर्चस्व राखले आहे. कांगारू संघाच्या सर्वाधिक चार खेळाडूंना आयसीसीच्या वर्षातील सर्वोत्तम कसोटी संघात स्थान मिळाले आहे. भारताकडून कसोटी संघात फक्त ऋषभ पंतचा समावेश करण्यात आला आहे. इंटरनॅशनल क्रिकेट कौन्सिलच्या सर्वोत्कृष्ट पुरुष संघात कोणत्या देशाच्या किती खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ICCने पुरुषांचा ‘टेस्ट टीम ऑफ द इयर’ जाहीर केला आहे. या यादीत २०२२ कॅलेंडर वर्षात उत्कृष्ट बॅट, बॉल आणि अष्टपैलू म्हणून पुनरागमन करणाऱ्या ११ खेळाडूंना स्थान देण्यात आले आहे. तसेच या यादीत भारताचा यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत हा एकमेव भारतीय खेळाडू आहे. या यादीत इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सलाही स्थान मिळाले आहे.

या खेळाडूंना स्थान मिळाले

आयसीसीच्या वर्षातील सर्वोत्कृष्ट कसोटी संघावर नजर टाकली तर त्यात ऑस्ट्रेलियाच्या सर्वाधिक चार खेळाडूंचा समावेश आहे. त्याचबरोबर तीन इंग्लिश क्रिकेटपटू संघात स्थान मिळवण्यात यशस्वी ठरले. याशिवाय भारत, वेस्ट इंडिज, पाकिस्तान आणि दक्षिण आफ्रिकेतील प्रत्येकी एका खेळाडूची वर्षातील सर्वोत्तम कसोटी संघात निवड करण्यात आली आहे. भारताकडून या संघात फक्त ऋषभ पंतचा समावेश आहे.

ऋषभ पंतने कसोटीवर वर्चस्व गाजवले

गेल्या वर्षी ऋषभ पंतने कसोटी क्रिकेटमध्ये आगपाखड केली होती. २०२२ मध्ये त्याने कसोटी सामन्यांच्या १२ डावांमध्ये ६१.८१ च्या सरासरीने ६८० धावा केल्या. यादरम्यान त्याचा स्ट्राईक रेट ९०.९० होता. गेल्या वर्षी कसोटीत पंतच्या बॅटमधून दोन शतके आणि चार अर्धशतके झळकली होती. २०२२ मध्ये तो कसोटी सामन्यात २१ षटकार मारण्यात यशस्वी ठरला होता. एवढेच नाही तर त्याने यष्टिरक्षणात चपळता दाखवली आणि ६ स्टंपिंग करण्याबरोबरच २३ झेल घेतले.

हेही वाचा: ICC Women’s ODI Team: ICC २०२२ सर्वोत्कृष्ट टी२० महिला संघ जाहीर! कर्णधारसह ‘या’ दोन भारतीय खेळाडूंनी कमावले मानाचे स्थान

वर्षातील सर्वोत्तम कसोटी संघ

उस्मान ख्वाजा (ऑस्ट्रेलिया), क्रेग ब्रॅथवेट (वेस्ट इंडिज), मार्नस लॅबुशेन (ऑस्ट्रेलिया), बाबर आझम (पाकिस्तान), जॉनी बेअरस्टो (इंग्लंड), बेन स्टोक्स (इंग्लंड), ऋषभ पंत (भारत), पॅट कमिन्स (ऑस्ट्रेलिया), कागिसो रबाडा (दक्षिण आफ्रिका), नॅथन लियॉन (ऑस्ट्रेलिया), जेम्स अँडरसन (इंग्लंड).

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Icc awards 2022 despite the accident pant continues to dominate gaba icc test team of the year announced avw