India (IND) vs Australia (AUS) 3rd ODI Live Cricket Score Updates: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील वनडे मालिका ऑस्ट्रेलियाने २-० च्या फरकाने जिंकली आहे. दरम्यान या मालिकेतील तिसरा आणि अखेरचा सामना सिडनीमध्ये आज खेळवला जात आहे. या सामन्याची नाणेफेक कांगारू संघाने जिंकली आहे. तर भारताने वनडेमध्ये सलग १८ वेळा नाणेफेक गमावली आहे.
विराट कोहलीचं अर्धशतक
विराट कोहलीने ५६ चेंडूत ४ चौकारांसह ७५वं अर्धशतक झळकावलं आहे. यासह रोहित शर्मा आणि विराट कोहलीने शतकी भागीदारी रचली आहे.
रोहित शर्माचं अर्धशतक
रोहित शर्माने ऑस्ट्रेलियाविरूद्ध दुसऱ्या वनडेमध्ये अर्धशतकी खेळी केली. रोहितने सिडनीमध्ये ६३ चेंडूत ७ चौकार आणि एका षटकारासह ५० धावा पूर्ण केल्या. तर रोहित-विराटची भागीदारी ५८ धावांवर पोहोचली आहे. यासह भारताने २१ षटकांत १ बाद १३४ धावा केल्या आहेत. तर भारताला विजयासाठी १०३ धावांची गरज आहे.
रोहित-विराटची शानदार फटकेबाजी
विराट कोहलीने मैदानावर येताच पहिल्या चेंडूवर एक धाव घेतली आणि मैदानात चाहत्यांनी एकच जल्लोष करत त्याचं कौतुक केलं. त्यानंतर दोघांनी मिळून चौकार-षटकारांची आतिषबाजी सुरू केली आहे. यासह भारताने १६ षटकांत १०० धावांचा पल्ला पार केला आहे. तर रोहित-विराट सध्या ३३ धावांची भागीदारी करत खेळत आहेत.
रोहित-गिलची चांगली सुरूवात
रोहित शर्माने शुबमन गिलसह चांगली सुरूवात केली आणि संघाच्या धावसंख्येचा पाया रचला आहे. दोघांनी मिळून १० षटकांत ६८ धावा केल्या. दरम्यान ११व्या षटकात हेझलवुडने गिलला झेलबाद केलं.
ऑस्ट्रेलिया ऑल आऊट
ऑस्ट्रेलियाचा संघ प्रथम फलंदाजी करताना २३६ धावा करत सर्वबाद झाला आहे. ऑस्ट्रेलियाकडून मिचेल मार्शने ४१ धावांची, हेडने २९ धावा, शॉर्टने ३० धावांची खेळी केली. यानंतर मॅट रेनशॉने ५६ धावांची खेळी करत संघाचा डाव सावरला, यानंतर कॅरीने २४ तर कॉनोली २३ धावा करत बाद झाला. नॅथन एलिसने १६ धावांची खेळी केली. भारताकडून या सामन्यात सर्व गोलंदाजांनी विकेट्समध्ये हातभार लावला. ऑस्ट्रेलिया संघ एका वेळेला ३ बाद १८३ धावांवर खेळत असताना भारताच्या गोलंदाजीसमोर २३६ वर सर्वबाद झाला. गोलं हर्षित राणाने सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या. तर सुंदरने २ विकेट्स आणि सिराज, प्रसिध, कुलदीप, अक्षर यांनी प्रत्येक १-१ विकेट मिळवली. यासह भारताला विजयासाठी २३७ धावांचं आव्हान मिळालं आहे.
हर्षित राणाचे एका षटकात दोन विकेट
हर्षित राणाने ४७व्या षटकात कुपर कॉनोलीला विराट कोहलीकरवी झेलबाद केलं. तर चौथ्या चेंडूवर हेझलवुडला क्लीन बोल्ड करत ४ विकेट्स घेतल्या.
प्रसिधच्या खात्यात एक विकेट
४४व्या षटकात प्रसिध कृष्णाच्या गोलंदाजीवर खणखणीत फटका खेळण्याच्या प्रयत्नात रोहित शर्माकरवी झेलबाद झाला.
कुलदीपच्या फिरकीची जादू
कुलदीप यादवने 39व्या षटकात मिचेल स्टार्कला क्लीन बोल्ड करत ऑस्ट्रेलियाला धक्का दिला. यासह कुलदीपला सामन्यातील पहिली विकेट मिळाली. यासह 40 षटकांत ऑस्ट्रेलियाने 7 बाद 203 धावा केल्या.
हर्षित राणाच्या खात्यात विकेट
38व्या षटकात हर्षित राणाने मिचेल ओवेनला रोहित शर्मा करवी स्लिपमध्ये झेलबाद केलं. रोहितनेही परफेक्ट झेल टिपत त्याच्या प्लॅननुसार विकेट घेतली.
वॉशिंग्टन सुंदरच्या खात्यात दुसरी विकेट
सुंदरने 37व्या षटकात मॅट रेनशॉला पायचीत करत भारताला दिलासा देणारी विकेट मिळवून दिली. रेनशॉ 56 धावांची खेळी केली.
श्रेयस अय्यरला दुखापत
हर्षित राणाच्या ३५व्या षटकात एलेक्स कॅरी मोठा फटका खेळायला गेला आणि चेंडू हवेत उंच उडाला. श्रेयस मागच्या बाजूला धावत जात त्याने कमालीचा झेल टिपला. पण चेंडू पकडत असताना श्रेयस डाव्या बाजूवर पडल्याने त्याला दुखापत झाली आहे. तो मैदानावर वेदनेने कळवळताना दिसला. परिणामी त्याला मैदानाबाहेर जावं लागलं आहे. एलेक्स कॅरी आणि रेनशॉ यांची भागीदारी तोडण्यात हर्षितला यश आलं. यासह ३४ षटकांत ऑस्ट्रेलियाने ४ बाद १८५ धावा केल्या आहेत.
तिसरी विकेट सुंदरच्या खात्यात
२३व्या षटकात सुंदरने टाकलेल्या चेंडूवर मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात थेट विराटच्या हातात त्याने झेल दिला आणि किंग कोहलीने कमालीचा कॅच पकडला. २३व्या षटकापासून ४२ चेंडू होऊन गेले, पण ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी एकही चौकार-षटकार लगावलेला नाही.
अक्षर पटेलची फिरकी
१६व्या षटकातील पहिल्याच चेंडूवर अक्षर पटेलचा चेंडू ऑफ स्टंपवर आदळला आणि मिचेल मार्श त्रिफळाचीत होत माघारी परतला. याह १६ षटकांत ऑस्ट्रेलियाने २ बाद ९२ धावा केल्या आहेत.
भारताच्या खात्यात पहिली विकेट
हर्षित राणा, प्रसिध कृष्णाच्या गोलंदाजीवर शानदार फटकेबाजी केल्यानंतर मोहम्मद सिराजने १०व्या षटकात ट्रॅव्हिस हेडला झेलबाद करत संघाला ब्रेकथ्रू मिळवून दिला. यासह ऑस्ट्रेलियाने १० षटकांत १ बाद ६३ धावा केल्या आहेत.
सामन्याला सुरूवात
मोहम्मद सिराजने मेडन षटक टाकत सामन्याला सुरूवात केली. तर हर्षित राणा दुसरा गोलंदाज आहे. यासह ५ षटकांता ऑस्ट्रेलियाने बिनबाद २६ धावा केल्या आहेत.
भारताची प्लेईंग इलेव्हन
रोहित शर्मा, शुबमन गिल (कर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर, अक्षर पटेल, केएल राहुल (यष्टीरक्षक), वॉशिंग्टन सुंदर, हर्षित राणा, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा
ऑस्ट्रेलियाची प्लेईंग इलेव्हन
मिचेल मार्श (कर्णधार), ट्रॅव्हिस हेड, मॅथ्यू शॉर्ट, मॅट रेनशॉ, अॅलेक्स केरी (यष्टीरक्षक), कूपर कॉनोली, मिचेल ओवेन, नाथन एलिस, मिचेल स्टार्क, अॅडम झाम्पा, जोश हेझलवुड
नाणेफेक
अखेरच्या वनडे सामन्याची नाणेफेकही ऑस्ट्रेलियाने जिंकली आहे आणि प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. यासह भारतीय संघ गोलंदाजीने सामन्याला सुरूवात करेल. दरम्यान भारताच्या प्लेईंग इलेव्हनमध्ये मोठे बदल करण्यात आले आहेत.
