भारतीय संघाचे माजी दिग्गज कर्णधार सुनील गावसकर यांनी अहमदाबाद कसोटी सामना सुरू असताना भारतीय गोलंदाजांची चूक दाखवून दिली आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर गुरुवारी (९ मार्च) रोजी हा मालिकेतील चौथा आणि शेवटचा सामना सुरू झाला. पहिल्या दिवशी ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करत संघाला चांगली सुरुवात मिळवून दिली. सुनील गावसकर यांच्या मते भारतीय गोलंदाजांनी पहिल्या दिवसाच्या शेवटच्या तासांमध्ये अपेक्षित कामगिरी केली नाही. तसेच त्यांनी रोहित शर्माच्या कॅप्टन्सीवर टीका केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

चौथ्या कसोटीचा पहिला दिवस संपला असून पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत ऑस्ट्रेलियाने ४ गडी गमावून २५५ धावा केल्या आहेत. चौथ्या कसोटीत भारतीय संघाचे गोलंदाज चांगली कामगिरी करू शकले नाहीत, त्यामुळे कांगारू संघाने यजमानांवर सुरुवातीपासूनच दडपण ठेवले. पहिल्या दिवशी भारतीय गोलंदाजांना नव्या चेंडूवर चांगली कामगिरी करता आली नाही, याविषयी माजी फलंदाज सुनील गावसकरही नाराज होते. त्याच्या मते, खेळाडूंनी रोहित शर्माला त्याच्या संघाकडून अपेक्षित अशी गोलंदाजी केली नाही.

सुनील गावसकर यांनी स्टार स्पोर्ट्सला सांगितले की, “ड्रेसिंग रूममध्ये खेळाडूंमध्ये संवाद झाला असावा. मला वाटते की हे संभाषण झाले असावे कारण संघाने शेवटच्या तासात केलेल्या प्रयत्नांमुळे खूप निराश झाले असावे. दुसऱ्या नव्या चेंडूनंतर संघाने भरपूर धावा लुटल्या आणि ऑस्ट्रेलियाला वर्चस्व गाजवू दिले. नवीन चेंडूवर गोलंदाजांना अधिक मेहनत घेता आली असती पण तसे झाले नाही.”

हेही वाचा: IND vs AUS 4th Test: उस्मान, कॅमरून ठरले हिट! भारताविरुद्ध खेळताना संपवला शतकांचा दुष्काळ, ऑस्ट्रेलियाची मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल

स्टार स्पोर्ट्सवर बोलताना गावसकर म्हणाले की, “यावर चर्चा झाली पाहिजे. भारतीय संघ नवीन चेंडू घेतल्यानंतर शेवटच्या एका तासातील प्रदर्शनावर नाराज असेल. या एका तासात ज्या पद्धतीने धावा खर्च केल्या गेल्या, चौकार गेले, हे पाहून असे वाटले की, ऑस्ट्रेलियन फलंदाज पूर्णपणे मोकळेपणाने खेळत होते.”

गावसकर पुढे म्हणाले, “पहिल्या दिवशी खूप वातावरण गरम होते, यावर कोणताही प्रश्न उपस्थित होऊ शकत नाही. वेगवान गोलंदाजांना येथे खूप त्रास झाला असेल. पण तुमच्याकडे नवीन चेंडू आहे आणि तुम्ही भारतासाठी खेळत आहात हे तुम्ही समजून घेतले पाहिजे. माझ्या मते, पहिल्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर जेव्हा संघ ड्रेसिंग रूममध्ये पोहोचला असेल, तेव्हा ते आपापसात बोलले असावेत की आता दुसऱ्या दिवशी विकेट्स काढायच्या दृष्टीकोनातून मैदानात उतरले पाहिजे.”

हेही वाचा: IND vs AUS 4th Test: इशान किशनची एक चेष्टा अन् रोहित शर्माने उचलला हात, ड्रिंक्सब्रेक मध्ये घडली घटना, Video व्हायरल

कॅमेरून ग्रीनचे शानदार शतक

उस्मान ख्वाजानंतर आता कॅमेरून ग्रीननेही भारतीय गोलंदाजांवर हल्लाबोल केला असून शानदार शतक ठोकले आहे. ग्रीनने जडेजाच्या चेंडूवर चौकार मारून शतक पूर्ण केले. त्याचे कसोटी कारकिर्दीतील हे पहिले शतक होते. सध्या ग्रीन १४७ चेंडूत १०० आणि ख्वाजा १५३ धावा करून खेळपट्टीवर आहे. आतापर्यंत दोघांमध्ये पाचव्या विकेटसाठी १८० हून अधिक धावांची भागीदारी झाली आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ind vs aus 4th test after all what did rohit sharma want to do on day 1 gavaskar spoke harshly about the captaincy avw