IND vs AUS Virat Kohli Embarrassing Record in Sydney Test : टीम इंडियाचा स्टार फलंदाज विराट कोहलीसाठी २०२४ हे वर्ष खूप वाईट होते. वर्षभर तो आपल्या खराब फॉर्मशी झुंजत राहिला. २०२५ मध्ये विराट चांगली सुरुवात करेल अशी चाहत्यांना आशा होती, पण जुन्या कमकुवतपणामुळे नवीन वर्षातही त्याने विकेट गमावली. सिडनीमध्ये खेळल्या जात असलेल्या शेवटच्या कसोटीत विराट ऑफ स्टंपच्या बाहेर जाणाऱ्या चेंडूवर आऊट झाला आणि यासोबतच त्याने एक लज्जास्पद विक्रमही नोंदवला. विराटची ही खेळी त्याच्या कसोटी कारकिर्दीतील एकही चौकार नसलेली सर्वात मोठी खेळी ठरली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सिडनी कसोटीत विराट कोहलीने ६९ चेंडूंचा सामना करत केवळ १७ धावा केल्या. ६९ चेंडूत विराटने एकही चौकार मारला नाही आणि एकही षटकार त्याच्या बॅटमधून आला नाही. ही खेळी त्याच्या कसोटी कारकिर्दीतील एकही चौकार नसलेली सर्वात मोठी खेळी ठरली. यापूर्वी २०२१ मध्ये इंग्लंडविरुद्ध ४८ चेंडू खेळताना विराटने एकही चौकार मारला नव्हता. तेव्हा विराटने केवळ ११ धावा केल्या होत्या.

विराटने सिडनीत नोंदवला लाजिरवाणा विक्रम –

बॉर्डर गावस्कर ट्रॉफीमध्ये विराट कोहली ऑफ स्टंपच्या बाहेर जाणाऱ्या चेंडूंवर सतत बाद होत आहे. विराट आतापर्यंत या दौऱ्यातील आठपैकी सात डावांमध्ये असाच बाद झाला आहे. सिडनी कसोटीतही असेच दृश्य पाहायला मिळाले. स्कॉट बोलंडचा ‘आउटगोइंग बॉल’ विराटच्या बॅटची कड घेऊन नवोदित ब्यू वेबस्टरच्या हातात विसावला आणि विराट वर्षाच्या पहिल्या डावात अपयशी ठरला. अशा प्रकारे २०२४ मध्ये झालेल्या चुका २०२५ मध्येही त्याला सुधारता आल्या नाहीत.

हेही वाचा – IND vs AUS : मिचेल स्टार्कच्या वेगवान माऱ्याने ऋषभ पंत घायाळ, पट्टी बांधून खेळतानाचा VIDEO व्हायरल

कोहली मालिकेत सपशेल अपयशी –

ऑस्ट्रेलिया दौरा विराटसाठी अजिबात चांगला राहिला. पहिल्या कसोटीतील पहिल्या डावात फ्लॉप ठरल्यानंतर दुसऱ्या डावात त्याने नाबाद शतक झळकावले होते. मात्र यानंतर विराट कोहलीने ॲडलेड, ब्रिस्बेन आणि मेलबर्न येथील कसोटी सामन्यात साफ निराशा केली आहे. हा क्रम सिडनीतही खंडित झालेला नाही. सध्याच्या मालिकेत विराटला पाच सामन्यांच्या ९ डावात केवळ १८४ धावा करता आल्या आहेत. एका शतकाशिवाय त्याच्या बॅटमधून एक अर्धशतकही आले नाही.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ind vs aus virat kohli did not hit a single four in his first tine 69 ball innings in test cricket career in sydney vbm