भारत आणि बांगलादेश यांच्यातील दुसरा कसोटी सामना गुरुवारी (२२ डिसेंबर) मिरपूरमध्ये सुरू झाला. बांगलादेश संघाने या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. पण त्यांचे फलंदाज अपेक्षित कामगिरी करू शकले नाहीत. भारताच्या भेगत गोलंदाजीपुठे बांगलादेशचा संपूर्ण संघ अवघ्या २२७ धावांवर गुंडाळला गेला. उमेस यादव आणि रविचंद्रन अश्विन यांनी सामन्याच्या पहिल्या डावात सर्वोत्कृष्ट गोलंदाजी करत विरोधकांना स्वस्तात गुंडाळले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

याच दुसऱ्या कसोटी दरम्यान भारताची विदर्भ एक्स्प्रेस अशी ओळख असणाऱ्या वेगवान गोलंदाज उमेश यादवने महान खेळाडू विनू मांकड यांचा विक्रम मोडला. बांगलादेशविरुद्ध मिरपूर येथे सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी वेगवान गोलंदाज उमेश यादवने शानदार गोलंदाजी करत इतिहास रचला. उमेशने महान विनू मांकड यांना मागे टाकून कसोटी क्रिकेटमध्ये भारतासाठी सर्वाधिक बळी घेणाऱ्या खेळाडूंच्या यादीत तेराव्या स्थानावर पोहोचला आहे.

हेही वाचा: Team India: टीम इंडियाच्या जर्सीवरून लवकरच हटणार BYJU’S आणि MPL चे नाव, समोर आले ‘हे’ धक्कादायक कारण

नुरुल हसनला एलबीडब्ल्यू बाद करून हा विक्रम केला. याशिवाय त्याने शबील अल हसन, मेहदी हसन आणि तस्कीन अहमद यांना आपला शिकार बनवले आहे. त्याने पहिल्या डावात अवघ्या २५ धावांत ४ बळी घेतले. उमेशच्या नावावर आता ५४ कसोटी सामन्यांमध्ये एकूण १६३ बळी आहेत. तर मंकडच्या नावावर ४४ सामन्यांत १६२ विकेट्स आहेत.

‘द ग्रेट’ विनू मांकड यांचा विक्रम मोडल्यानंतर उमेश यादवने सोनी स्पोर्ट्सच्या कार्यक्रमात बोलताना आपल्या भावना व्यक्त केल्या, तो म्हणाला की, “एका वेगवान गोलंदाजासाठी ही फार मोठी गोष्ट आहे. भारतीय उपखंडात खास करून असा विक्रम तोही एका भारतीय दिग्ग्जाचा मोडणे ही फार मोठी माझ्यासाठी अभिमानाची बाब आहे. इंग्लंड, दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या देशांमध्ये हे लवकर घडते कारण तेथील वातावरण आणि खेळपट्ट्या वेगवान गोलंदाजांना अनुसरून तयार करण्यात येतात.”

पुढे सामन्याविषयी बोलताना तो म्हणाला की, “ वेगवान गोलंदाजांसाठी गोलंदाजी करताना त्यात थोडाफार होता आणि तो त्यावेळच्या परिस्थितीनुसार करावा लागतो. काही चेंडू वर येत होते. योग्य भागात गोलंदाजी करणे महत्त्वाचे होते आणि मी तेच करण्याचा प्रयत्न केला. कोरडे गवत आहे त्यामुळे तिथे थोडा स्पंजी चेंडू बाऊन्स होत होता. आम्ही चेंडू स्विंग करून विकेट टू विकेट टाकण्याचा प्रयत्न करत होतो, त्यामुळे आम्हाला विकेट मिळाल्या.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ind vs ban indias vidarbha express umesh yadav team record broken by indias great cricketer vinoo mankad avw