उमेश यादव भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज आहे. त्याचा २५ ऑक्टोबरला वाढदिवस असतो. उमेशचे यादव हा मूळचा यूपीच्या देवरिया जिल्ह्यातील आहे, पण त्याचे वडील कोळसा खाणीत कामाला असल्यामुळे ते उत्तर प्रदेशातून नागपूरला आले. विदर्भाकडून खेळणाऱ्या उमेश यादवला २००८ मध्ये रणजी ट्रॉफी खेळण्याची संधी मिळाली. त्यानंतर त्याला आयपीएलमध्ये दिल्ली डेअरडेव्हिल्सकडून खेळण्याची संधी मिळाली, तर २०१० मध्ये त्याने भारतीय संघात पदार्पण केले.
भारत-ऑस्ट्रेलिया तिसऱ्या कसोटी सामन्यात उमेश-अश्विनच्या धारदार गोलंदाजीने कांगारूंचा सुपडा साफ केला. पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाने केवळ ८८ धावांची आघाडी घेतली.