ICC T20 World Cup 2024, IND vs BAN Live Score : टी-२० विश्वचषक २०२४ च्या सुपर ८ फेरीत आज भारत आणि बांगलादेश आमनेसामने होते. अँटिगा येथील नॉर्थ साऊंड येथील सर व्हिव्हियन रिचर्ड्स स्टेडियमवर झालेल्या सामन्यात भारताने बांगलादेशचा ५० धावांनी धुव्वा उडवला. त्याचबरोबर सुपर ८ फेरीतील टीम इंडियाचा हा सलग दुसरा विजय आहे. यासह भारतीय संघाने उपांत्य फेरीतील आपले स्थान जवळपास निश्चित केले आहे. भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना उपकर्णधार हार्दिक पंड्याच्या नाबाद अर्धशतकाच्या जोरावार ५ बाद १९६ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात बांगलादेशचा संघ केवळ १४६ धावा करू शकला. भारताकडून धावांचा बचाव करताना फिरकीपटू कुलदीप यादवने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या.
ICC T20 World Cup 2024 IND vs BAN Highlights : भारत आणि बांगलादेश टी-२० विश्वचषक स्पर्धेत आतापर्यंत पाच वेळा आमनेसामने आले आहेत. या पाचही सामन्यात भारताने बांगलादेशवर मात केली आहे. त्याचबरोबर टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये हे दोन्ही १३ वेळा आमनेसामने आले आहेत, ज्यापैकी १२ सामन्यात भारताने तर एका सामन्यात बांगलादेशने विजय मिळवला आहे.
विश्वचषक स्पर्धेतील आतापर्यंतच्या खराब फॉर्मनंतर राजस्थान रॉयल्सच्या कर्णधारपदाची जागा भरण्यासाठी शिवम दुबे हा सर्वोत्तम पर्याय आहे. दुबेने आतापर्यंत चार सामन्यांत 83 च्या स्ट्राइक रेटने केवळ 44 धावा केल्या आहेत, ज्यात न्यूयॉर्कमधील कठीण खेळपट्टीवर अमेरिकेविरुद्ध नाबाद 31 धावांची त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे. चिंतेची बाब म्हणजे दुबेची संघात निवड केवळ त्याच्या सहा मारण्याच्या क्षमतेमुळे झाली. 2024 च्या टी-20 विश्वचषकात आतापर्यंत त्याला 53 चेंडूत केवळ दोन षटकार मारण्यात यश आले आहे. एवढेच नाही तर कर्णधार रोहितने दुबेचा गोलंदाज म्हणून फार कमी वापर केला आहे.
पावसामुळे सामन्यात येऊ शकतो व्यत्यय
या मैदानावर शेवटचा सामना ऑस्ट्रेलिया आणि बांगलादेश यांच्यात झाला होता. या सामन्यादरम्यान पावसाचा व्यत्यय आला होता. भारत आणि बांगलादेश यांच्यातील सामन्यातही हे दिसून येईल. भारत आणि बांगलादेश यांच्यातील सामना अँटिग्वा वेळेनुसार सकाळी १०.३० वाजता सुरू होईल. वेदर डॉच नुसार, अँटिग्वा वेळेनुसार सकाळी १० ते दुपारी २ दरम्यान तापमान ३० अंश असेल. यावेळी १८ ते २४ टक्के पावसाची शक्यता आहे. याचा अर्थ सामन्यादरम्यान पावसाचा व्यत्यय येऊ शकतो, परंतु सामना पूर्णपणे पावसाने रद्द जाणार नाही.
भारत आणि बांगलादेश टी-२० विश्वचषक स्पर्धेत आतापर्यंत चार वेळा आमनेसामने आले आहेत. या चारही सामन्यात भारताने बांगलादेशवर मात केली आहे. त्याचबरोबर टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये हे दोन्ही १३ वेळा आमनेसामने आले आहेत, ज्यापैकी १२ सामन्यात भारताने तर एका सामन्यात बांगलादेशने विजय मिळवला आहे. त्यामुळे आजच्या सामन्यातही भारत विजयाचा प्रबळ दावेदार आहे.
Barbados ✈️ Antigua #TeamIndia have arrived for today's Super 8 clash against Bangladesh ??#T20WorldCup pic.twitter.com/RM54kEWP3W
— BCCI (@BCCI) June 22, 2024