IND vs BAN Match Highlight: भारत आणि बांग्लादेश यांच्यात बुधवारी अॅडलेड ओव्हल येथे अगदी अटीतटीचा सामना रंगला होता. मेन इन ब्लूने बांग्लादेशला पाच धावांनी पराभूत करून T20 विश्वचषक स्पर्धेतील उपांत्य फेरीतील आपले स्थान जवळपास निश्चित केले आहे. या सामन्यात भारताचा विजय हा माजी भारतीय स्टार फलंदाज सुनील गावस्कर यांना मात्र फारसा आवडलेला दिसत नाही. विश्वचषकाच्या समालोचकांपैकी एक असलेल्या सुनील गावस्कर यांनी भारत विरुद्ध बांग्लादेश हा सामना लक्षात राहण्यासाठी भारताच्या विजयापेक्षा वेगळेच कारण महत्त्वाचे ठरणार असल्याचे म्हंटले आहे.

सुनील गावस्कर म्हणतात, “भारत जिंकला यापेक्षा बांग्लादेश… “

सुनील गावस्कर यांनी इंडिया टुडेशी संवाद साधताना सांगितले की, जेव्हा पाऊस पडला त्याआधी सात षटकात बांग्लादेशने ६६ धावा केल्या होत्या, जर सामना थांबला नसता तर प्रत्येक षटकात ९ धावांचे जरी टार्गेट धरले आणि हातात १० विकेट शिल्लक असताना बांग्लादेशचा विजय सहज शक्य होता. जेव्हा पावसांनंतर अचानक १६ षटकात कमी लक्ष्य देण्यात आले तेव्हा त्यांचा गोंधळ झाला, खरंतर त्यांना आवश्यक रनरेट त्यावेळी बदलला नव्हताच मात्र ते षटक कमी झाल्याने गडबडले.

गावस्कर म्हणाले की, बांग्लादेशने स्मार्ट क्रिकेट खेळण्याऐवजी, त्यांनी प्रत्येक चेंडूवर षटकार चौकार मारण्याचा प्रयत्न केला, भारतीयांनी हुशारीने गोलंदाजी केली, लाँग ऑन आणि डीप मिड-विकेटवर षटकार झेलले गेले व भारताची बाजू आणखी मजबूत झाली. त्यामुळे कालचा सामना हा भारत जिंकला असे म्हणण्यापेक्षा बांग्लादेश हरला असे म्हणणे योग्य ठरेल.

IND vs BAN Highlight

दरम्यान, भारत विरुद्ध बांग्लादेश सामना अत्यंत रंजक ठरला होता. शकीब अल हसनने प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केलेल्या भारताने तुफान फटकेबाजी करत १८४ धावांचे मोठे लक्ष्य दिले होते मात्र भारताची गोलंदाजी सुरु होताच पावसाने हजेरी लावली आणि सगळा खेळ बदलला. पावसामुळे जवळपास तासभर थांबलेल्या मॅचची पुन्हा सुरुवात झाली अन यावेळेस बांग्लादेशला १६ षटकात १५१ धावांचे टार्गेट देण्यात आले.

IND vs BAN: कोहली, रिझवानला मागे टाकून सूर्यकुमार यादवची मोठ्या विक्रमाला गवसणी; टी २० मध्ये मिळवला ‘हा’ मान

तर भारत विरुद्ध बांग्लादेश सामन्यातील या विजयासह भारताने ग्रुप २ च्या गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावले आहे. चार सामन्यांतून भारताचे सहा गुण झाले आहेत. भारताचा पुढील सामना झिम्बाब्वेशी रविवारी मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर खेळला जाईल.