भारत आणि बांगलादेश यांच्यातील पहिला कसोटी सामना बुधवारपासून सुरू होत आहे. चट्टोग्राम येथे होणाऱ्या या सामन्यापूर्वी यजमान बांगलादेशला मोठा धक्का बसला आहे. बांगलादेशचा कर्णधार शकीब अल हसनला सराव सत्रादरम्यान काही प्रमाणात अस्वस्थता जाणवू लागल्याने, त्याला रुग्णवाहिकेतून रुग्णालयात दाखल करावे लागले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

बांगलादेशी प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी सकाळी शाकिब अल हसन सरावासाठी मैदानावर पोहोचतला होता. त्यानंतर त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करावे लागले. त्याच्यासोबत सपोर्ट स्टाफचा एक सदस्यही रुग्णवाहिकेमध्ये गेला होता. त्यामुळे आता शाकिब अल हसन पहिला सामना खेळू शकणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

बांगलादेश क्रिकेट बोर्डाकडून असे सांगण्यात आले आहे की, शकिब अल हसनबाबत काहीही गंभीर नाही. कारण त्यावेळी मैदानावर दुसरे कोणतेही वाहन उपलब्ध नव्हते, त्यामुळे त्याला रुग्णवाहिकेने रुग्णालयात जावे लागले. शाकिबने बरगड्या आणि खांद्यांमध्ये वेदना होत असल्याची तक्रार केल्याने, त्याला हॉस्पिटलमध्ये तपासणीसाठी घेऊन जाण्यात आले होते.

हेही वाचा – FIFA WC 2022: क्रोएशियाला हरवून अर्जेंटिना सहाव्यांदा अंतिम फेरीत; उपांत्य फेरीत अल्वारेझ चमकला, तर मेस्सीची जादू कायम

काही वेळानंतर, शाकिब अल हसन मैदानात परतला, मात्र तरी त्याने सराव केला नाही. त्यामुळे बांगलादेशी कॅम्पमध्ये चिंतेचे वातावरण आहे. भारतीय वेळेनुसार, भारत-बांगलादेशचा पहिला कसोटी सामना बुधवारी सकाळी ९ वाजता सुरू होणार आहे.

हेही वाचा – IND vs BAN 1st Test: सात वर्षांनंतर बांगलादेशमध्ये भारत कसोटी खेळणार, जाणून घ्या कधी आणि कुठे पाहता येणार सामना

पहिल्या कसोटीसाठी दोन्ही संघ –

बांगलादेश: नजमुल हसन शांतो, महमुदुल हसन जॉय, मोमिनुल हक, अनामूल हक, शकीब अल हसन (कर्णधार), लिटन दास, मुशफिकुर रहीम (यष्टीरक्षक), मेहदी हसन मिराज, तैजुल इस्लाम, इबादत हुसेन, खालिद अहमद, शरीफुल इस्लाम, तस्किन अहमद , नुरुल हसन, यासिर अली, झाकीर हसन, रेझाउर रहमान राजा.

भारत: शुबमन गिल, केएल राहुल (कर्णधार), चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), अक्षर पटेल, रविचंद्रन अश्विन, शार्दुल ठाकूर, उमेश यादव, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, श्रीकर भरत, जयदेव, जयदेव नवदीप सैनी, अभिमन्यू इसवरन, सौरभ कुमार.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ind vs ban test series bangladesh captain shakib al hasan was admitted to the hospital before the first test match vbm