West Indies to defeat Australia by 8 runs in the Gabba Test match : २४ वर्षीय वेस्ट इंडिजचा वेगवान गोलंदाज शमर जोसेफच्या शानदार गोलंदाजीच्या जोरावर वेस्ट इंडिजने ऑस्ट्रेलियाचा ८ धावांनी पराभव केला. वेस्ट इंडिजने ऑस्ट्रेलियात २७ वर्षांनंतर कसोटी क्रिकेटमध्ये विजय मिळवला. या विजयानंतर वेस्ट इंडिजचा महान खेळाडू ब्रायन लारालाही आपले अश्रू आवरता आले नाहीत. वेस्ट इंडिजने दुसरी कसोटी जिंकत मालिका १-१ ने बरोबरीत राखली. तसेच टीकाकारांनाही चोख प्रत्युत्तर दिले. कर्णधार क्रेग ब्रॅथवेटने विशेषत: माजी ऑस्ट्रेलियन खेळाडू रॉडनी हॉजला लक्ष्य केले, ज्याने या संघाच्या क्षमतेवर प्रश्न उपस्थित केले होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

रॉडनी हॉजने वेस्ट इंडिजबद्दल काय वक्तव्य केले होते?

सामन्यानंतर वेस्ट इंडिज संघाचा कर्णधार क्रेग ब्रॅथवेट म्हणाला की रॉडनी हॉजने आमच्या संघांसाठी जे शब्द वापरले होते, ते शब्द त्यांचे प्रेरणास्थान बनले. ब्रॅथवेट म्हणाला, ‘मला सांगायचे आहे की असे दोन शब्द होते, ज्यामुळे आम्हाला प्रेरणा मिळाली. मिस्टर रॉडनी हॉज यांनी आम्हाला दयनीय आणि हताश म्हटले होते. हेच शब्द आमच्यासाठी प्रेरणादायी ठरले. आम्ही तसे नाहीत हे जगाला दाखवायचे होते.’ यानंतर ब्रॅथवेटने आपले दंड दाखवले आणि म्हणाला, ‘मला त्यांना विचारायचे आहे की माझे हे स्नायू त्यांच्यासाठी पुरेसे आहेत का.’ हे ऐकून प्रश्न विचारणारी अँकरही हसायला लागली. ब्रॅथवेटच्या संघाने केवळ रॉडनी हॉजलाच नाही तर प्रत्येक टीकाकाराला उत्तर दिले आहे.

ब्रॅथवेटने शमरचे केले कौतुक –

वेस्ट इंडिजच्या दुसऱ्या डावात मिचेल स्टार्कच्या यॉर्करने जोसेफला दुखापत झाल्याने त्याला मैदान सोडावे लागले होते. त्याने गोलंदाजीत चमकदार कामगिरी करत ६८ धावांत सात विकेट्स घेतल्या आणि ऑस्ट्रेलियाला २०७ धावांत गुंडाळले. युवा खेळाडूचे कौतुक करताना ब्रॅथवेट म्हणाला, ‘तो सुपरस्टार आहे. मला माहित आहे की तो वेस्ट इंडिजसाठी खूप काही करेल. त्याने मला सांगितले की जोपर्यंत आम्ही जिंकत नाही तोपर्यंत तो गोलंदाजी करणे थांबवणार नाही. त्यामुळे मला माझ्या संघाचा खूप अभिमान आहे. त्याने खूप हिंमत दाखवली.’

हेही वाचा – IND vs ENG 1st Test : “द्रविडने शुबमनबरोबर…”, गिलच्या खराब कामगिरीनंतर केविन पीटरसनने दिला महत्त्वाचा सल्ला

वेस्ट इंडिजच्या विजयानंतर शमर जोसेफने ब्रॉडकास्टरला सांगितले की, ‘आज सकाळी मी मैदानात येणार नव्हतो. मी डॉक्टरांचे कौतुक केले पाहिजे. कारण ते माझ्यासाठी एक अद्भुत व्यक्ती आहेत. त्यांनी मला एका कारणासाठी मैदानात येण्यास सांगितले, भले ते फक्त लोकांना पाठिंबा देण्यासाठी असेल. पण मी आलो आणि त्यांनी माझ्या पायाच्या बोटावर काही उपचार केले. मला माहित नाही त्यांनी काय केले पण त्याचा फायदा झाला. त्यामुळे मला मैदानात उतरून गोलंदाजी करण्याची आणि हा सामना माझ्या संघाच्या बाजूने झुकवण्याची संधी मिळाली.’

हेही वाचा – IND vs ENG : टीम इंडियाच्या फलंदाजांनी टॉम हार्टलीसमोर टेकले गुडघे, इंग्लंडचा भारतावर २८ धावांनी दणदणीत विजय

सामन्याबद्दल बोलायचे तर, या सामन्याच्या पहिल्या डावात वेस्ट इंडिजने ३११ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाने नऊ विकेट्सवर २८९ धावा करून पहिला डाव घोषित केला. दुसऱ्या डावात वेस्ट इंडिजचा संघ अवघ्या १९३ धावांत गारद झाला आणि ऑस्ट्रेलियासमोर विजयासाठी २१६ धावांचे लक्ष्य ठेवले. प्रत्युत्तरात कांगारू संघ केवळ २०७ धावा करू शकला. अशा प्रकारे वेस्ट इंडिजने दुसरा सामना आठ धावांनी जिंकला.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ind vs eng 1st test england defeated india by 8 runs in the first test match in hyderabad vbm 97
First published on: 28-01-2024 at 19:05 IST