Kevin Pietersen advises Rahul Dravid to spend time with Shubman Gil : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिली कसोटी हैदराबादमध्ये खेळली जात आहे. या सामन्यात भारताचा युवा सलामीवीर शुबमन पहिल्या डावानंतर दुसऱ्या डावातही धावा करण्यात अपयशी ठरला. त्यामुळे सोशल मीडियावर शुबमन गिलवर मोठ्या प्रमाणात टीका होत आहे. आता सततच्या खराब कामगिरीमुळे राहुल द्रविडने गिलबरोबर वेळ घालवावा, असे इंग्लंडचा महान गोलंदाज केविन पीटरसनने म्हटले आहे.

जिओ सिनेमावर बोलताना केविन पीटरसन म्हणाला, “मी राहुल द्रविडला इतकेच सांगेन की त्यांनी शुबमन गिलबरोबर वेळ घालवायला हवा. तो किती ब्रॉडकास्ट पाहतो हे मला माहीत नाही. पण मी म्हणेन की राहुलने गिलबरोबर वेळ घालवावा आणि माझ्याशी जशी चर्चा केली, तशीच त्याच्याशीही चर्चा केली पाहिजे. त्याच्याकडून ऑफ साइडकडे जाणाऱ्या चेंडूचा सराव करुन घ्यावा. त्याचबरोबर स्ट्राइक रोटेट करण्याबद्दल शिकवावे.”

Gus Atkinson Hits First Century at No 8 and Broke Ajit Agarkar Record
Gus Atkinson Century: इंग्लंडच्या गस अ‍ॅटकिन्सने अजित आगरकरचा कित्ता गिरवला, पहिलं शतक झळकावत मोडला २२ वर्षे जुना विक्रम
31st August Panchang & Marathi Rashi Bhavishya
श्रावणी शनिवार, ३१ ऑगस्ट पंचांग: महिन्याचा शेवटच्या दिवशी ‘या’ राशींवर होईल महादेव, शनिदेवाची कृपा; अचानक धनलाभ तर कलेला मिळेल कौतुकाची थाप; वाचा तुमचे राशीभविष्य
Icc test rankings updates in marathi
Test Rankings : ICC ची ताजी कसोटी क्रमवारी जाहीर! यशस्वी जैस्वालला फायदा तर बाबर आझमला बसला मोठा फटका
PAK vs BAN Mohammed Rizwan Broke Rishabh Pant and Andy Flower Record
PAK vs BAN: मोहम्मद रिझवानने मोडला ऋषभ पंतचा विक्रम, पराभूत कसोटी सामन्यात ‘ही’ कामगिरी करणारा ठरला पहिला पाकिस्तानी यष्टिरक्षक
PAK vs BAN Shakib Al Hasan Throw Ball on Mohammed Rizwan
PAK vs BAN: शकिब अल हसनने रागाच्या भरात मोहम्मद रिझवानला फेकून मारला चेंडू, पंचांनीही घेतला आक्षेप; पाहा VIDEO
Joe Root most test fifty record
ENG vs SL : जो रूटने एकाच डावात मोडले दोन मोठे रेकॉर्ड, राहुल द्रविड आणि ॲलन बॉर्डरला टाकले मागे
Australia Mitchell Starc Statement on the Border Gavaskar Trophy sport news
अॅशेसइतकेच महत्त्व! बॉर्डर-गावस्कर करंडकाबाबत ऑस्ट्रेलियाच्या मिचेल स्टार्कचे विधान
Ben Stokes Hamstring Injury Walking With Help of Crutches Photo Viral
Ben Stokes: कुबड्यांचा आधार घेऊन चालतोय बेन स्टोक्स, इंग्लंडच्या कर्णधाराला नेमकं झालं तरी काय?

वेस्ट इंडिजविरुद्ध तिसऱ्या क्रमांकावर सलामी सोडून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेल्या शुबमन गिलला या मालिकेपासूनच धावा करण्याची तळमळ आहे. त्याने २०२३ मध्ये वेस्ट इंडिज संघाविरुद्धच्या तीन डावात ६, १० आणि नाबाद २९ धावा केल्या होत्या. यानंतर त्याने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध २, २६, ३६ आणि १० धावांची इनिंग खेळल्या होत्या. आता इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात त्याला २३ धावा करता आल्या. त्यानंतर दुसऱ्या डावात मात्र त्याला खातेही उघडता आले नाही.

हेही वाचा – AUS vs WI 2nd Test : वेस्ट इंडिजचा ऑस्ट्रेलियावर ८ धावांनी ऐतिहासिक विजय, शमर जोसेफला ठरला विजयाचा शिल्पकार

गिलने आतापर्यंत भारतासाठी २१ कसोटी सामन्यांच्या ३८ डावांमध्ये भाग घेतला आहे. या कालावधीत त्याच्या बॅटमधून १०६३ धावा केल्या आहेत. त्याची सरासरी ३० च्या आसपास असून स्ट्राइक रेट ५८ आहे. त्याची सर्वोच्च धावसंख्या १२८ धावा आहे, त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध लगावला होता. गिलने आतापर्यंत दोन शतके आणि चार अर्धशतके केली आहेत.