IND vs ENG 4th Test Match weather Report : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील चौथा सामना २३ फेब्रुवारीपासून रांचीच्या मैदानावर खेळवला जाणार आहे. रांचीच्या जेएससीए स्टेडियमवर बऱ्याच दिवसांनंतर कसोटी सामना खेळवला जात आहे. यापूर्वी २०१९ मध्ये येथे खेळला गेला होता. आता तब्बल ५ वर्षांनंतर भारतीय संघ कसोटी सामना खेळण्यासाठी या स्टेडियमवर पोहोचला आहे. त्याचवेळी २३ ते २७ फेब्रुवारी दरम्यान होणाऱ्या या सामन्यात पावसामुळे व्यत्यय येऊ शकतो का? जाणून घेऊया.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

रांची कसोटीत पाच दिवसांचे हवामान कसे असेल?

रांची येथे खेळल्या जाणाऱ्या या कसोटी सामन्याच्या पाच दिवसांच्या हवामानाबद्दल बोलायचे झाले तर, Accuweather च्या अहवालानुसार, २३ ते २६ फेब्रुवारी या कालावधीत तापमान २६ ते ३० अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ज्यामध्ये पावसाची कोणतीही आशा नाही. या कसोटी सामन्याच्या शेवटच्या दिवशी २७ फेब्रुवारीला पावसाची शक्यता आहे. अशा स्थितीत हा कसोटी सामना पाचव्या दिवशी पोहोचला तर हवामानही महत्त्वाची भूमिका बजावू शकते. २७ फेब्रुवारीला रांचीमध्ये २८ ते ३० अंश सेल्सिअस तापमान राहण्याची शक्यता असून पावसाची ६७ टक्के शक्यता आहे.

मालिकेत अजेय आघाडीवर घेण्यावर भारताचे लक्ष –

या मालिकेतील पहिल्या सामन्यातील पराभवानंतर रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने पुढचे दोन सामने जिंकून शानदार पुनरागमन केले. आता टीम इंडियाची नजर रांची कसोटी सामना जिंकण्यावर असेल, जेणेकरून ते मालिकेत अभेद्य आघाडी घेऊ शकतील. या मैदानावर आतापर्यंत झालेल्या दोन कसोटी सामन्यांपैकी एक सामना अनिर्णित राहिला आणि दुसरा सामना भारतीय संघाने जिंकला. या सामन्यात पुन्हा सर्वांच्या नजरा यशस्वी जयस्वाल आणि सर्फराझ खान यांच्या कामगिरीवर असतील, या दोघांनी राजकोट कसोटीत शानदार कामगिरी केली होती.

हेही वाचा – Ranji Trophy 2024 : रणजीपासून दूर राहण्यासाठी श्रेयसची पाठदुखीची खोटी तक्रार? एनसीएकडून पूर्णपणे तंदुरुस्त घोषित

चौथ्या कसोटीसाठी इंग्लंडची प्लेइंग इलेव्हन जाहीर –

इंग्लंडने भारताविरुद्धच्या चौथ्या कसोटीसाठी प्लेइंग इलेव्हन जाहीर केली आहे. संघ व्यवस्थापनाने रांचीच्या खेळपट्टीचा विचार करून संघात दोन बदल केले आहेत. वेगवान गोलंदाज मार्क वुड आणि लेगस्पिनर रेहान अहमद यांना वगळण्यात आले आहे. त्यांच्या जागी वेगवान गोलंदाज ऑली रॉबिन्सन आणि फिरकी गोलंदाज शोएब बशीर यांनी संघात प्रवेश केला आहे. मात्र भारतीय संघ आपली प्लेइंग इलेव्हन नाणेफेकीच्या वेळी जाहीर करेल.

हेही वाचा – IPL 2024 : गुजरात टायटन्सला मोठा धक्का! आयपीएलमधून ‘हा’ स्टार वेगवान गोलंदाज बाहेर

चौथ्या कसोटीसाठी इंग्लंडची प्लेइंग इलेव्हन: झॅक क्राउली, बेन डकेट, ऑली पोप, जो रूट, जॉनी बेअरस्टो, बेन स्टोक्स (कर्णधार), बेन फॉक्स, टॉम हार्टले, ऑली रॉबिन्सन, जेम्स अँडरसन आणि शोएब बशीर.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ind vs eng 4th test find out what the weather will be like for five days during the ranchi test match vbm
First published on: 22-02-2024 at 18:33 IST