Mohammed Shami out of IPL 2024 due to ankle injury : आयपीएल २०२४ चा हंगाम सुरू होण्यासाठी अजून एक महिना बाकी आहे. त्याआधी २०२२ चा चॅम्पियन संघ आणि २०२३ च्या उपविजेत्या गुजरात टायटन्सला मोठा धक्का बसला आहे. वृत्तसंस्था पीटीआयने बीसीसीआयच्या सूत्राचा हवाला देत सांगितले की, डाव्या घोट्याच्या दुखापतीमुळे मोहम्मद शमी संपूर्ण आयपीएल हंगामातून बाहेर पडला आहे. त्याच्यावर ब्रिटनमध्ये शस्त्रक्रियाही होणार आहे.

गेल्या वर्षीच्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेनंतर मोहम्मद शमी खेळताना दिसत नाही. दुखापतीमुळे त्याची दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठीही निवड झाली नाही. त्यानंतर तो सध्याच्या इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतूनही बाहेर झाला होता. शमीची अनुपस्थिती गुजरातसाठी अत्यंत मोठा झटका ठरू शकते. हार्दिक पंड्या गुजरात सोडून मुंबई इंडियन्समध्ये गेल्याने संघाचे आधीच एक धक्का बसला होता. गुजरातचा कर्णधार असलेल्या हार्दिकला गेल्या वर्षी लिलावापूर्वी मुंबई संघात सामील झाला आहे.

Suresh Raina Helps Limping ms dhoni Viral Video
IPL 2024: चालताना त्रास होणाऱ्या धोनीला सुरेश रैन्नाने दिला आधार, व्हीडिओ होतोय तुफान व्हायरल
Sunil Gavaskar and Kevin Pietersen criticizes Hardik
IPL 2024: मुंबईच्या पराभवानंतर सुनील गावसकर हार्दिकवर संतापले; म्हणाले, ‘मी खूप दिवसांनी इतकी वाईट…’
Rajasthan Royals Vs Gujarat Titans Match Highlights in Marathi
RR vs GT : गुजरातने राजस्थानचा विजयरथ रोखला, राशिद खानच्या खेळीच्या जोरावर ३ विकेट्सनी नोंदवला शानदार विजय
IPL Match 2024 Chennai Super Kings vs Sunrisers Hyderabad sport news
Ipl 2024, CSK vs SRH: चेन्नईचा विजयी पुनरागमनाचा प्रयत्न! सनरायजर्स हैदराबादशी आज गाठ

विश्वचषकादरम्यानच मोहम्मद शमीला दुखापत झाली होती. दुखापतग्रस्त घोट्याने तो वर्ल्ड कपमध्ये खेळला होता. त्या स्पर्धेत त्याने चमकदार कामगिरी केली आणि सात सामन्यांत २४ बळी घेतले. तो सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज होता. मात्र, त्यानंतर तो सतत क्रिकेट ॲक्शनपासून दूर आहे. आता त्याच्या दुखापतीवर योग्य उपचार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अशा स्थितीत शमीला सावरण्यासाठी अनेक महिने लागू शकतात. आयपीएलनंतर लगेचच टी-२० विश्वचषक होणार आहे आणि आता त्यात शमीच्या खेळण्याबाबत साशंकता आहे. मात्र, त्यासाठी अजून तीन महिने बाकी आहेत.

हेही वाचा – Paris Olympics : भारतीय टेबल टेनिस संघांनी रचला इतिहास, पॅरिस ऑलिम्पिकसाठी ठरले पात्र

मोहम्मद शमी २०२२ पासून गुजरात टायटन्सकडून खेळत आहे आणि दोन्ही हंगामात संघाला अंतिम फेरीत पोहोचवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. आयपीएल २०२२ मध्ये, शमीने १४ सामन्यांमध्ये २० विकेट्स घेतल्या आणि सर्वाधिक विकेट्स घेणारा सहाव्या गोलंदाज होता. तर २०२३ मध्ये शमीने १७ सामन्यात २८ विकेट्स घेतल्या होत्या. गेल्या मोसमात तो सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज ठरला होता. शमीच्या गैरहजेरीमुळे गुजरातला यंदा खूप त्रास सहन करावा लागणार आहे. या हंगामात संघाचे दोन सर्वात अनुभवी खेळाडू त्यांच्यासोबत नसतील. हार्दिकच्या जागी शुबमन गिलची या मोसमासाठी कर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्याचवेळी, टीम लवकरच शमीच्या बदलीची घोषणा करू शकते.

हेही वाचा – IND vs ENG : चौथ्या कसोटीसाठी इंग्लंडची प्लेइंग इलेव्हन जाहीर! वूड-अहमदच्या जागी ‘या’ दोन खेळाडूंना मिळाली संधी

गुजरातकडे शमीशिवाय मोहित शर्मा आणि उमेश यादव यांच्या रूपाने दोन अनुभवी गोलंदाज आहेत. त्याचबरोबर दर्शन नळकांडे, सुशांत मिश्रा आणि कार्तिक त्यागीच्या रूपाने तीन युवा गोलंदाज आहेत. जोश लिटलने गेल्या वर्षी चांगली कामगिरी केली होती आणि तो संघासाठी उपयुक्तही ठरू शकतो. याशिवाय संघाने ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज स्पेन्सर जॉन्सनलाही लिलावात विकत घेतले. हार्दिकच्या बदली म्हणून गुजरातने अफगाणिस्तानचा तेजस्वी अष्टपैलू अजमतुल्ला ओमरझाई याला विकत घेतले होते. तो वेगवान गोलंदाजीही करू शकतो.