Yashasvi Jaiswal’s chance to create history : भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेतील पाचवा आणि शेवटचा सामना ७ मार्चपासून (गुरुवार) धरमशाला येथे खेळवला जाणार आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने या मालिकेत आधीच ३-१ अशी अभेद्य आघाडी घेतली आहे. आता हा सामना जिंकून मालिका ४-१ अशी जिंकण्याचा त्याचा प्रयत्न असेल. या सामन्यात यशस्वी जैस्वालकडे इतिहास रचण्याबरोबर अनेक विक्रम मोडण्याची संधी आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

२२ वर्षीय यशस्वीने विझाग (विशाखापट्टणम) कसोटी सामन्यात २०९ धावांची इनिंग खेळली होती. त्यानंतर राजकोट कसोटीतही या युवा फलंदाजाने भारताच्या दुसऱ्या डावात २१४ धावा केल्या होत्या. यानंतर यशस्वीने रांची कसोटी सामन्यातही दमदार कामगिरी केली. यशस्वी जैस्वालने आतापर्यंत इंग्लंडविरुद्धच्या चालू कसोटी मालिकेत आठ डावात ९३.५७ च्या सरासरीने ६५५ धावा केल्या आहेत, ज्यात दोन द्विशतके आणि दोन अर्धशतकांचा समावेश आहे. या कालावधीत, यशस्वीचा स्ट्राइक-रेट ७८.६३ राहिला आहे. यशस्वीने सध्याच्या मालिकेत ६३ चौकार आणि २३ षटकार मारले आहेत.

यशस्वीला विराटला मागे टाकण्याची संधी –

यशस्वी जैस्वालने धर्मशाला कसोटी सामन्यात ९८ धावा केल्या, तर तो भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारा फलंदाज देखील बनेल. सध्या हा विक्रम इंग्लंडचा फलंदाज दिग्गज ग्रॅहम गूचच्या नावावर आहे, ज्यांनी १९९० च्या कसोटी मालिकेत ७५२ धावा केल्या होत्या. त्याचबरोबर जैस्वालने या सामन्यात एक धाव घेताच, तो विराट कोहलीला मागे टाकेल.

हेही वाचा – IRE vs AFG : आयर्लंडचा पहिलावहिला कसोटी विजय; अफगाणिस्तानवर ६ विकेट्सनी मात

भारत-इंग्लंड कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे फलंदाज –

१. ग्रॅहम गूच (१९९०) – ३ सामने, ७५२ धावा, ३ शतके
२. जो रूट (२०२१-२२) – ५ सामने, ७३७ धावा, ४ शतके
३. यशस्वी जैस्वाल (२०२४) – ४* सामने, ६५५ धावा, २ शतके
४. विराट कोहली (२०१६) – ५ सामने, ६५५ धावा, २ शतके
५. मायकेल वॉन (२००२) – ४ सामने, ६१५ धावा, ३ शतके

यशस्वीकडे गावसकरांचा ५३ वर्ष जुना विक्रम मोडण्याची संधी –

यशस्वी जैस्वाललाही माजी भारतीय कर्णधार सुनील गावसकर यांचा ५३ वर्ष जुना विक्रम मोडण्याची संधी आहे. सुनील गावसकर हे भारतीय फलंदाज आहेत, ज्यांनी कसोटी मालिकेत सर्वाधिक ७७४ धावा केल्या आहेत. म्हणजेच यशस्वीने धरमशाला कसोटी सामन्यात १२० धावा केल्या, तर तो गावसकरांना मागे टाकून कोणत्याही कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारा भारतीय फलंदाज ठरेल.सुनील गावसकरांनी १९७१ साली वेस्ट इंडिजविरुद्धच्या पदार्पणाच्या कसोटी मालिकेत संस्मरणीय कामगिरी केली होती. त्यानंतर गावसकरांनी ४ कसोटी सामन्यांमध्ये विक्रमी ७७४ धावा (४ शतके आणि ३ अर्धशतकांसह द्विशतक) केल्या होत्या. या काळात गावसकरांची सरासरी १५४.८० होती.

हेही वाचा – Kapil Dev : “काही लोकांना त्रास होईल, परंतु देशापेक्षा कोणीही…”, कपिल देव यांनी बीसीसीआयच्या ‘त्या’ निर्णयाचे केले स्वागत

कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे भारतीय फलंदाज –

सुनील गावसकर विरुद्ध वेस्ट इंडिज (१९७१) – ४ सामने, ७७४ धावा, १५४.८० सरासरी, ४ शतके
सुनील गावसकर विरुद्ध वेस्ट इंडिज (१९७८-७९) – ६ सामने, ७३२ धावा, ९१.५० सरासरी, ४ शतके
विराट कोहली विरुद्ध ऑस्ट्रेलिया (२०१४-१५) – ४ सामने, ६९२ धावा, ८६.५० सरासरी, ४ शतके
विराट कोहली विरुद्ध इंग्लंड (२०१६) – ५ सामने, ६५५ धावा, १०९.१६ सरासरी, २ शतके
दिलीप सरदेसाई विरुद्ध वेस्ट इंडीज (१९७१) – ५ सामने, ६४२ धावा, ८०.२५ सरासरी, ३ शतके
यशस्वी जैस्वाल विरुद्ध इंग्लंड (२०२४) – ४* सामने, ६५५* धावा, ९३.५७ सरासरी, २ शतके

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ind vs eng 4th test yashasvi jaiswals 45 would become the highest run scorer by an indian player in any test series vbm