IND vs ENG 5th Test : ‘हा युवराज आहे की बुमराह?’, ब्रॉडची धुलाई केल्याने सचिन तेंडुलकरला पडला प्रश्न

भारतीय फलंदाजांविरुद्ध गोलंदाजी करताना स्टुअर्ट ब्रॉडच्या नावावर अनेक नकोशा विक्रमांची नोंद झाली आहे.

Jasprit Bumrah and Yuvraj Singh
फोटो सौजन्य – ट्वीटर

भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या एजबस्टन कसोटीचा आज दुसरा दिवस आहे. या दिवसाच्या पहिल्या सत्रात भारतीय संघाचा कर्णधार जसप्रित बुमराहने तुफान फटकेबाजी केली. त्याने केवळ स्टुअर्ट ब्रॉडच्या एका षटकात ३५ धावा फटकावल्या. कसोटी क्रिकेटमध्ये त्याची ही तुफान फटकेबाजी बघून मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरलाही आश्चर्य वाटले आहे. सचिनने ट्वीट करून बुमराहचे कौतुक केले आहे.

एजबस्टन कसोटीतील दुसऱ्या दिवशी भारताच्या डावातील ८४वे षटक स्टुअर्ट ब्रॉड फेकत होता. या षटकामध्ये भारतीय कर्णधार जसप्रित बुमराहने ब्रॉडच्या जुन्या जखमेवरील खपली काढण्याचे काम केले. बुमराहने ब्रॉडच्या एका षटकामध्ये ४, ५, ७, ४, ४, ४, ६, १ अशी फटकेबाजी करत तब्बल ३५ धावा फटकावल्या. २००७मध्ये माजी भारतीय अष्टपैलू युवराज सिंगने अशीच कामगिरी केली होती. त्याने स्टुअर्ट ब्रॉडच्या एका षटकामध्ये ३६ धावा कुटल्या होत्या. आज बुमराहची कामगिरी बघून सचिन तेंडुलकरला युवराजची आठवण आली. त्याने ट्वीट करत, ‘हा युवराज आहे की बुमराह?’ अशा प्रश्न विचारला आहे.

भारतीय फलंदाजांविरुद्ध गोलंदाजी करताना स्टुअर्ट ब्रॉडच्या नावावर अनेक नकोशा विक्रमांची नोंद झाली आहे. त्याच्याविरुद्ध युवराज सिंगने ६ षटकार मारले होते. आता कर्णधार जसप्रीत बुमराहने एका षटकात ३५ धावा जमा केल्या आहेत. एजबस्टन कसोटीतील ब्रॉडचे हे षटक कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात महागडे षटक ठरले आहे.

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Ind vs eng edgbaston test sachin tendulkar compare jasprit bumrah with yuvraj singh vkk

Next Story
IND vs ENG Test: बुमराहने ब्रॉडच्या एकाच षटकात कुटल्या ३५ धावा; रचला विश्वविक्रम, फलंदाजीचा Video पाहून थक्क व्हाल
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी