IND vs ENG 1st Test 2nd Day Last Over Drama: भारत-इंग्लंड पहिल्या कसोटीत दुसऱ्या दिवशी इंग्लंडने बाजी मारली. भारताकडून ऋषभ पंतने शतक झळकावलं आणि बुमराहने ३ विकेट्स घेतले असले तरी इंग्लंडचा संघ सामन्यात बरोबरीत आहेत. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत इंग्लंडने २०९ धावा केल्या आहेत. शतकवीर ऑली पोप हॅरी ब्रुकसह तिसऱ्या दिवशी संघाच्या डावाची सुरूवात करेल. भारताकडून जसप्रीत बुमराहने एकट्याने ३ विकेट्स घेतल्या. पण अखेरच्या षटकात मात्र बुमराहला आणि भारताला मोठा धक्का बसला.
जसप्रीत बुमराहने इंग्लंडविरूद्ध पहिल्या कसोटीत उत्कृष्ट गोलंदाजी करत संघाला ३ विकेट्स मिळवून दिले. इंग्लंडने पहिल्या दिवशी गमावलेले तिन्ही विकेट्स बुमराहच्या खात्यात आहेत. तर बुमराहच्या गोलंदाजीवर करूण नायरने परफेक्ट ३ झेल टिपले आहेत. बुमराहने पहिल्याच षटकात झॅक क्रॉलीला झेलबाद केलं आणि संघाला ब्रेकथ्रू मिळवून दिला.

या बातमीसह विशेष लेख आणि इतर दर्जेदार मजकूर मोफत वाचा

लंच ब्रेकपर्यंत बेन डकेट आणि ऑली पोप या दोघांनी चांगली फलंदाजी करत संघाचा डाव सावरला. लंच ब्रेकनंतर बुमराह गोलंदाजीला आला आणि त्याने बेन डकेटला क्लीन बोल्ड करत मोठी विकेट मिळवून दिली. यानंतर बुमराहने जो रूटला बाद करत इंग्लंडला मोठा धक्का दिला. बुमराहने जो रूटला आतापर्यंत १०वेळा आऊट केलं आहे.

जो रूट बाद झाल्यानंतर हॅरी ब्रुक फलंदाजीला आला आणि बुमराह सामन्याचे शेवटच षटक टाकण्यासाठी आला. या षटकात बुमराहने ३ नो बॉल टाकले पण तरीही एकही धाव घेण्याची हॅरी ब्रुकला संधी दिली नाही आणि एकापेक्षा एक कमालीच्या चेंडूंवर त्याने ब्रुकची त्याने परिक्षा घेतली. पहिले दोन्ही चेंडू डॉट बॉल गेल्यानंतर तिसरा चेंडू बुमराहने नो बॉल टाकला. परत चौथा चेंडूही नो बॉल टाकला. पण बुमराहच्या भेदक चेंडूंनी ब्रुकला जागा सोडायला दिली नाही.

शेवटी बुमराहने हॅरी ब्रुकला चौथा चेंडू बाऊन्सर टाकला आणि काही कळण्याच्या आता त्याने तो फिरवला आणि चेंडू हवेत उडाला. मोहम्मद सिराजने कमालीची डाईव्ह करत चेंडू सुरक्षितपणे टिपला. संघ विकेटचा आनंद साजरा करणार तोच पंचांनी नो बॉलचा इशारा केला आणि सर्वांनाच धक्का बसला. बुमराहसारखा उत्कृष्ट गोलंदाज आणि त्याच्या विकेटवर नो बॉल झाल्याचे पाहून कोणालाच विश्वास बसला नाही. बुमराहसह संपूर्ण संघ निराश होत आपआपल्या जागेवर परतला.

बुमराहने यानंतर पुढचे तिन्ही चेंडू त्याचप्रमाणे एकदम कमालीचे टाकले आणि ब्रुकला एकही धाव घेऊ दिली नाही. अखेरच्या चेंडूवरही ब्रुक गडबडला होता. पण कसाबसा त्याने बाऊन्सरवर आपली विकेट वाचवली. जसप्रीत बुमराहच्या गोलंदाजीवर आधीच सामन्यात ३ झेल सोडले होते आणि आता बुमराहच्या ओव्हर स्टेपिंगच्या चुकीमुळे भारताला अजून एका विकेटला मुकावं लागलं.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ind vs eng jasprit bumrah takes wicket of harry brook but it gives no ball mohammed siraj catch goes in vain video bdg