India vs England, World Cup 2023: आयसीसी विश्वचषक स्पर्धेत इंग्लंडचा सामना करण्यासाठी भारतीय संघ बुधवारी रात्री लखनऊला पोहोचला. न्यूझीलंडवरील विजयानंतर भारतीय संघाची दोन दिवसांची विश्रांती संपली आहे. आता हे खेळाडू २९ ऑक्टोबर रोजी एकना स्टेडियमवर भारत विरुद्ध इंग्लंड सामन्यात भाग घेतील. धरमशाला येथे झालेल्या रोमहर्षक सामन्यात न्यूझीलंडचा पराभव केल्यानंतर भारतीय संघाने हिमाचलच्या खोऱ्यात दोन दिवसांची सुट्टी साजरी केली. दरम्यान, प्रशिक्षक द्रविडसह खेळाडूही मजामस्ती करताना दिसले. आता विश्वचषक २०२३चा अजिंक्य संघ आपल्या पुढील सामन्याच्या तयारीला सुरुवात करेल.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

बीसीसीआयने सोशल मीडियावर बुधवारी रात्री लखनऊमध्ये भारताच्या आगमनाबाबत अपडेट दिले. ट्वीट करून बोर्डाने खेळाडू हॉटेलमध्ये पोहोचल्याचा व्हिडीओ जारी केला आहे. ज्यामध्ये कर्णधार रोहित शर्मा, मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड, विराट कोहली आणि के.एल. राहुलसह सर्व खेळाडू दिसत आहेत. याआधी विराट कोहलीनेही विमानाचा फोटो इन्स्टाग्रामवर अपलोड करून संघ लखनऊला रवाना झाल्याचे अपडेट दिले होते. विराटने फोटोवर ‘ऑफ टू लखनऊ’ असे कॅप्शनही दिले होते.

भारत आणि इंग्लंडची आतापर्यंतची कामगिरी कशी आहे?

भारत २०२३ च्या विश्वचषक स्पर्धेत शेवटचे पाच सामने जिंकून अपराजित आहे. हा संघ सध्या गुणतालिकेत अव्वल स्थानावर आहे. त्याचबरोबर इंग्लंडचा फॉर्म अद्याप प्रभावी दिसत नाही. विश्वचषकातील त्यांच्या शेवटच्या ५ सामन्यांपैकी त्यांना फक्त एक सामना जिंकता आला आहे. याआधी २६ ऑक्टोबरला इंग्लंडच्या संघाचा श्रीलंकेकडून आठ गडी राखून दारूण पराभव झाला.

वैद्यकीय पथक हार्दिकवर लक्ष ठेवून आहे

मीडिया रिपोर्ट्सनुसार, हार्दिकच्या घोट्यात ग्रेड 1 लिगामेंट फाटले आहे. सूज खूप वाढली असून त्यामुळे त्याला वेदनाही होत आहेत. मात्र, चांगली गोष्ट म्हणजे हार्दिकला फ्रॅक्चर झालेले नाही. एनसीएच्या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, पांड्याची दुखापत गंभीर असू शकते. एनसीएमधील नितीन पटेल यांच्या नेतृत्वाखालील वैद्यकीय पथक त्याच्यावर लक्ष ठेवून आहे. हार्दिकला बरे होण्यासाठी दोन आठवडे लागू शकतात. तो पूर्णपणे तंदुरुस्त झाल्यानंतरच एनसीए त्याला सोडणार आहे.

हेही वाचा: ENG vs SL:गतविजेते विश्वचषकातून जवळपास बाहेर! श्रीलंकेचा इंग्लंडवर आठ गडी राखून दणदणीत विजय

हार्दिकच्या बदलीचा विचार केला जात नाही

भारतीय संघ व्यवस्थापनाला एनसीएच्या वैद्यकीय पथकाकडून सांगण्यात आले आहे की त्याला लवकरच मैदानात परत येण्याची इच्छा आहे. हार्दिकच्या जागी संघात अन्य कोणत्याही खेळाडूचा समावेश करण्याचा विचार सध्या संघ करत नाही. कर्णधार रोहित शर्मा आणि प्रशिक्षक राहुल द्रविड त्याची वाट पाहत आहेत.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ind vs eng rohit sharma and company reached lucknow for the clash with england practice video viral avw