IND vs NZ 3rd Test New Zealand opt to bat against India : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळला जात आहे. या सामन्यात न्यूझीलंडचा कर्णधार टॉम लॅथमने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. कर्णधार लॅथमने प्लेइंग इलेव्हनमध्ये दोन बदल केले आहेत. त्याचवेळी भारतीय कर्णधार रोहित शर्माने पण आपल्या प्लेइंग इलेव्हनमध्ये एक बदल केला आहे. जसप्रीत बुमराहची तब्येत ठीक नाही. अशा परिस्थितीत मोहम्मद सिराजला संधी देण्यात आली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

जसप्रीत बुमराहला का वगळले?

गेल्या सामन्यात भारताला अडचणीत आणणारा मिचेल सँटनर या सामन्यात खेळत नाहीये. त्याच्या जागी इश सोधीचा प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश करण्यात आला आहे. त्याचबरोबर टिम साऊदीच्या जागी मॅट हेन्रीला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान देण्यात आले आहे. किवी संघाने याआधीच मालिकेत २-० अशी अभेद्य आघाडी घेतली आहे. अशा स्थितीत टीम इंडिया क्लीन स्वीपपासून स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करेल. न्यूझीलंडने बंगळुरू येथे खेळली गेलेली पहिली कसोटी आठ गडी राखून आणि पुण्यात खेळलेली दुसरी कसोटी ११३ धावांनी जिंकली होती.

तिसऱ्या कसोटी सामन्यासाठी दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन :

भारत: रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, शुबमन गिल, विराट कोहली, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), सर्फराझ खान, रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, रविचंद्रन अश्विन, आकाश दीप, मोहम्मद सिराज.

हेही वाचा – Virat Kohli : ‘मला या संघाबरोबर २० वर्ष…’, RCB ने रिटेन केल्यानंतर विराटने व्यक्त केल्या भावना; म्हणाला, ‘मी इतकी वर्षे…’

न्यूझीलंडः टॉम लॅथम (कर्णधार), डेव्हॉन कॉनवे, केन विल्यमसन, रचिन रवींद्र, डॅरिल मिशेल, टॉम ब्लंडेल (यष्टीरक्षक), ग्लेन फिलिप्स, ईश सोधी, मॅट हेन्री, एजाज पटेल, विल्यम ओ’रुर्के.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ind vs nz 3rd test new zealand opt to bat against india mohammad siraj replaced jasprit bumrah at mumbai vbm