भारत आणि न्यूझीलंड यांच्यात माऊंट मौनगानुई येथे रविवारी दुसरा टी-२० सामना खेळला गेला. या सामन्यात भारताने यजमानांचा ६५ धावांनी पराभव केला. या विजयासह भारताने तीन सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. या सामन्यात टीम इंडियातील सूर्यकुमार यादव आपल्या शानदार शतकी खेळीने प्रेक्षकांचे खूप मनोरंजन केले. दुसरीकडे, श्रेयस अय्यर मात्र कमनशिबी ठरला आणि तो लवकर बाद झाला. त्याच्या या खेळीवर आता बॉलिवूड अभिनेत्री अश्विनी अहेरने मोठे वक्तव्य केले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

वास्तविक, टीम इंडियाच्या फलंदाजीच्या १३व्या षटकात अय्यरला लॉकी फर्ग्युसनच्या चेंडूवर एक चोरटी धाव घ्यायची होती, पण त्याचा पाय विकेटला लागला. त्यानंतर अंपायरने त्याला हिट-विकेट बाद घोषित केले. अय्यरने १३ धावांच्या खेळीत एक चौकार आणि एक षटकार ठोकला. अय्यरच्या या निराशाजनक खेळीवर बॉलीवूड अभिनेत्री आणि मॉडेल अश्विनी अहेरने आपली प्रतिक्रिया दिली आहे. तिने अय्यरला टॅग करत इंस्टाग्रामवर एक स्टोरी शेअर केली आहे, जी खव्हायरल होत आहे.

इन्स्टावर स्टोरी शेअर करताना अश्विनीने कॅप्शनमध्ये लिहिले, ”सामन्यापूर्वी श्रेयसने माझ्यासोबत कॉफी घेतली असती, तर त्यानेही स्काय (सुर्यकुमार यादव) प्रमाणे सामन्यात शतक झळकावले असते.”

विशेष म्हणजे, हा उजव्या हाताचा फलंदाज टी-20 फॉरमॅटमध्ये भारताकडून हिट विकेट होणारा चौथा खेळाडू ठरला आहे. अय्यरच्या आधी केएल राहुल, हर्षल पटेल आणि हार्दिक पंड्या यांनीही हिट विकेट्स बाद झाले आहेत.

हेही वाचा – IND vs NZ: टी-२० क्रिकेटमध्ये हिट विकेट होणारा श्रेयस अय्यर ठरला २५वा फलंदाज, पाहा संपूर्ण यादी

भारताने एकतर्फी विजय मिळवला –

या सामन्यात भारतीय संघाची फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्ही अप्रतिम होती. प्रथम खेळताना टीम इंडियाने निर्धारित २० षटकांत ६ गडी गमावून १९१ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात किवी संघ १८.५ षटकांत १२६ धावांवर गारद झाला. या मालिकेतील शेवटचा सामना २२ नोव्हेंबरला नेपियरमध्ये खेळवला जाणार आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ind vs nz bollywood actress ashweenee aher gave her reaction to shreyas iyers innings shared insta story vbm