India vs New Zealand ICC Cricket World Cup 2023 Match Updates: भारत आणि न्यूझीलंड संघात एकदिवसीय विश्वचषकातील २१वा सामना खेळला जात आहे. धरमशाला येथील हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर दोन्ही संघ आमनेसामने आहेत. या सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला. हा रोहित शर्माचा निर्णय मोहम्मद सिराजने चौथ्या षटकांत डेव्हॉन कॉनवेला झेलबाद करुन योग्य ठरवला. श्रेयस अय्यरनो डेव्हॉन कॉनवेचा अप्रतिम झेल घेतला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

चौथ्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर न्यूझीलंड संघाला पहिला धक्का बसला. संघाच्या ९ धावसंख्येवर सिराजने डेव्हॉन कॉनवेला स्क्वेअर लेगवर श्रेयस अय्यरकरवी झेलबाद केले. हा झेल खूपच कठीण होता आणि श्रेयसने तो उत्कृष्ट शैलीत पकडला. डेव्हॉन कॉनवेला आपल्या धावांचे खातेही उघडता आले नाही. चार षटकांनंतर न्यूझीलंडची धावसंख्या १ विकेटवर ९ धावा आहे. सिराजचे चौथे षटक विकेट निर्धाव ठरले. यानंतर १९ धावांवर न्यूझीलंडची दुसरी विकेट पडली. मोहम्मद शमीने विल यंगला बोल्ड केले. यंगने २७ चेंडूत १७ धावा केल्या. डॅरिल मिशेल रचिन रवींद्रसोबत क्रीजवर आहे.

२० वर्षांपासून न्यूझीलंडविरुद्ध आयसीसी स्पर्धेत भारताला विजयाची प्रतीक्षेत –

टीम इंडियाला गेल्या २० वर्षांपासून न्यूझीलंडविरुद्ध आयसीसी स्पर्धेत सामना जिंकता आलेला नाही. २००३ च्या विश्वचषक स्पर्धेत भारताने न्यूझीलंडचा शेवटचा पराभव केला होता. त्यावेळी सौरव गांगुलीच्या नेतृत्वाखाली भारताने ७ विकेटने विजयी मिळवला होता. यानंतर न्यूझीलंडने टी-२० विश्वचषक २००७ आणि टी-२० विश्वचषक २०१६ सह एकदिवसीय विश्वचषक २०१९ च्या उपांत्य फेरीत भारताचा पराभव केला. आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप २०२१ आणि टी-२० वर्ल्ड कप २०२१ च्या अंतिम फेरीत भारताचा न्यूझीलंडकडून पराभव झाला होता.

भारत विरुद्ध न्यूझीलंड सामन्यासाठी दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन –

भारत: रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, लोकेश राहुल (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.

न्यूझीलंड: डेव्हॉन कॉनवे, विल यंग, ​​रचिन रवींद्र, डॅरिल मिशेल, टॉम लॅथम (कर्णधार आणि यष्टिरक्षक), ग्लेन फिलिप्स, मार्क चॅपमन, मिचेल सँटनर, मॅट हेन्री, लॉकी फर्ग्युसन, ट्रेंट बोल्ट.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ind vs nz match updates shreyas iyer took a brilliant catch from devon conway off the bowling of mohammed siraj vbm