IND vs SA: भारतीय संघाचा आज दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दुसरा टी२० सामना होणार आहे. गुवाहाटीमध्ये हा सामना होणार आहे. या सामन्याआधी रोहित शर्माची चर्चा होती. कारण रोहित शर्मा संघासोबत आला नव्हता. अखेर सामन्याच्या काहीतास आधी रोहित शर्मा गुवाहाटीमध्ये पोहोचला आहे. भारतीय संघ गुरुवारीच गुवाहाटीमध्ये दाखल झाला होता. रोहित शर्मा संघाच्या दोन्ही सराव सत्राला देखील हजर नव्हता.
नक्की कुठे होता रोहित?
जसप्रीत बुमराहने मालिकेतून माघार घेतल्याने भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. त्याच्याजागी मोहम्मद सिराजची निवड केली गेली. मागील दोन दिवस भारतीय खेळाडू गुवाहाटी येथे कसून सराव करत आहेत. पण, कर्णधार रोहितला सराव सत्रासह सामन्यापूर्वीची पत्रकार परिषदेतही हजर राहता आलेले नाही. त्याने दोन्ही सराव सत्र चुकवले आणि आज सामना सुरू होण्याच्या काही तासांपूर्वी तो गुवाहाटीत दाखल झाला. त्याने काही वैयक्तिक कारणामुळे भारतीय संघासोबत प्रवास केला नाही. सुदैवाने दुखापत किंवा अन्य काही वादाचा मुद्दा रोहितच्या या उशीरा येण्यामागे नाही.
शनिवारी रात्री उशिरा रोहित गुवाहाटीमध्ये दाखल झाला. काही व्यक्तीगत कारणांमुळे रोहित संघासोबत गुवाहाटीमध्ये आला नाही, असं भारतीय संघामधील सूत्रांच्या हवाल्याने इनसाइड स्पोर्ट्ने म्हटलं आहे. रोहित शर्माला कुठलीही दुखापत झालेली नाही किंवा दुसरा कुठलाही मुद्दा नाही.
तो आजचा सामना खेळेल, असं सूत्रांनी सांगितलं. त्यामुळेच मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडने कर्णधार रोहित शर्माऐवजी सामन्याच्या पूर्वसंध्येला पत्रकार परिषदेत भाग घेतला.