आज बुधवारपासून (१६ फेब्रुवारी) भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यातील तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेला सुरुवात होत आहे. टीम इंडियाने याआधी तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका ३-० अशी जिंकली होती. पहिल्या टी-२० सामन्याच्या पूर्वसंध्येला भारतीय कर्णधार रोहित शर्माने माध्यमांशी संवाद साधला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

विराट कोहलीच्या खराब फॉर्मवर प्रश्न विचारला असता रोहित मीडियावर भडकला आणि तो म्हणाला, ”तुम्ही गप्प बसाल, तर सर्व काही ठीक होईल. तुम्ही लोक त्याला काही काळ एकटे सोडा, तो बरा होईल. विराट एक दशकाहून अधिक काळ आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळत आहे. जेव्हा कोणी एवढा वेळ क्रिकेट खेळत असेल, तेव्हा त्याला दडपण सहन करता येते. बाकी सर्व काही माध्यमांवर अवलंबून आहे. त्याला थोडा वेळ द्या, तो बरा होईल.” विराट गेल्या काही काळापासून अत्यंत खराब फॉर्ममध्ये आहे. विंडीजविरुद्धच्या तीन सामन्यांत तो ८, १८ आणि ० धावा करू शकला.

हेही वाचा – VIDEO : पाकिस्तान सुपर लीगमध्ये खेळाडूनं केले अश्लील इशारे; मैदानातच काढला ४ वर्षांपूर्वीचा राग!

टीम इंडियामध्ये उपस्थित असलेल्या सर्व खेळाडूंना संधी दिली जाईल का, असे विचारले असता रोहित म्हणाला, ”आमची योजना सर्व खेळाडूंची चाचणी घेण्याची आहे. विश्वचषक स्पर्धेत खेळणाऱ्या सर्व खेळाडूंना आम्हाला संधी द्यायची आहे. त्याला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये स्थिरावण्यासाठी थोडा वेळ द्यायचा आहे. अनेक खेळाडू दुखापतग्रस्त झाले आहेत. विश्वचषकापर्यंत कोण तंदुरुस्त असेल हे आम्हाला माहीत नाही. त्यामुळे आपल्याला कोणत्याही परिस्थितीसाठी तयार राहावे लागेल.”

वेस्ट इंडीजविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी भारतीय संघ: रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन, विराट कोहली, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, व्यंकटेश अय्यर, दीपक चहर, शार्दुल ठाकूर, रवी बिश्नोई, यजुर्वेंद्र चहल, कुलदीप यादव. सिराज, भुवनेश्वर कुमार, आवेश खान, हर्षल पटेल, ऋतुराज गायकवाड, दीपक हुडा.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ind vs wi t20 series rohit sharma backs virat kohli in press conference adn