India Under 19 squad announced against Australia series : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील मालिकेची तमाम क्रिकेट चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. दरम्यान, बीसीसीआयने मोठी घोषणा करत भारताच्या अंडर १९ संघाची घोषणा केली आहे. जो ऑस्ट्रेलियाच्या अंडर-१९ संघाविरुद्ध मायदेशात एकदिवसीय आणि चार दिवसीय सामने खेळणार आहे. भारताचे माजी मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांचा मुलगा समित द्रविड यालाही या मालिकेसाठी घोषित करण्यात आलेल्या संघात संधी मिळाली आहे.

राहुल द्रविडच्या मुलाची भारतीय संघात निवड –

अलीकडेच, भारताच्या पुरुष वरिष्ठ संघाने राहुल द्रविडच्या नेतृत्वाखाली टी-२० विश्वचषक जिंकत आयसीसी ट्रॉफीचा दुष्काळ संपुष्टात आणला होता. याशिवाय बीसीसीआयनेही वेळापत्रक जाहीर केले आहे. भारत दौऱ्यावर आलेला अंडर-१९ ऑस्ट्रेलियन संघ प्रथम भारतात तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळणार आहे. ही मालिका २१ सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. यानंतर चार दिवसांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना ३ ऑक्टोबरपासून खेळवला जाणार आहे. जिथे दोन चार दिवसीय कसोटी सामने खेळवले जातील. ज्या अनुक्रमे पुद्दुचेरी आणि चेन्नई येथे खेळला जाईल. वनडे मालिका आणि चार दिवसीय कसोटी मालिकेसाठी प्रत्येकी १५ खेळाडूंचा संघ जाहीर करण्यात आला आहे.

समित द्रविड देशांतर्गत क्रिकेटमधील कामगिरी –

भारताचा महान फलंदाज आणि माजी कर्णधार राहुल द्रविडचा मुलगा देखील क्रिकेटचा शौकीन आहे आणि तो स्व:ला अष्टपैलू खेळाडू सिद्ध करण्याच्या मार्गावर आहे. समित द्रविड देशांतर्गत स्तरावर धावा करत आहे. अलीकडेच, महाराजा केएससीए टी-२० ट्रॉफीमधील त्याच्या काही मोठ्या शॉट्सचे व्हिडीओ व्हायरल झाले होते. समितने म्हैसूर वॉरियर्सकडून ७ डावात अनुक्रमे ७, ७, ३३, १६, २, १२ आणि ५ धावा केल्या आहेत. एकदिवसीय मालिकेसाठी मोहम्मद अमान आणि चार दिवसीय कसोटीसाठी सोहम पटवर्धनला कर्णधार बनवण्यात आले आहे.

हेही वाचा – Gus Atkinson Century: इंग्लंडच्या गस अ‍ॅटकिन्सने अजित आगरकरचा कित्ता गिरवला, पहिलं शतक झळकावत मोडला २२ वर्षे जुना विक्रम

एकदिवसीय मालिकेसाठी संघ : रुद्र पटेल (उपकर्णधार), साहिल पारख, कार्तिकेय केपी, मोहम्मद अमन (कर्णधार), किरण चोरमले, अभिज्ञान कुंडू (डब्ल्यूके), हरवंशसिंग पनगालिया (यष्टीरक्षक), समित द्रविड, युधाजित गुहा, समर्थ एन. निखिल कुमार, चेतन शर्मा, हार्दिक राज, रोहित राजावत, मोहम्मद अनन

हेही वाचा – Manish Narwal Won Silver: पॅरालिम्पिकमध्ये रौप्यपदक जिंकणारा मनिष नरवाल आहे तरी कोण? भारताने लागोपाठ जिंकली ४ पदकं

चार दिवसीय कसोटी मालिकेसाठी संघ : वैभव सूर्यवंशी, नित्या पंड्या, विहान मल्होत्रा ​​(उपकर्णधार), सोहम पटवर्धन (कर्णधार), कार्तिकेय केपी, समित द्रविड, अभिज्ञान कुंडू (यष्टीरक्षक), हरवंशसिंग पानगालिया (यष्टीरक्षक), चेतन शर्मा, समर्थ एन, आदित्य रावत, निखिल कुमार, अनमोलजीत सिंग, आदित्य सिंग, मोहम्मद अनन