IND vs ENG 5th Test Day 5 Live Score Updates: भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाचवा कसोटी सामना ओव्हलच्या मैदानावर पार पडला. या सामन्यात भारतीय संघाने इंग्लंडसमोर विजयासाठी ३७४ धावांचं आव्हान ठेवलं होतं. या धावांचा पाठलाग करताना इंग्लंडने चौथ्या दिवशी ६ गडी बाद ३३९ धावा केल्या आहेत. पाचव्या दिवशी इंग्लंडला हा सामना जिंकण्यासाठी ३५ धावा करायच्या होत्या. तर भारतीय संघाला हा सामना जिंकण्यासाठी ४ गडी बाद करायचे होते. सिराजने ५ गडी बाद करून भारतीय संघाला हा सामना ६ धावांनी जिंकून दिला.
India vs England 5th Test Day 5 Live Match Score Updates: भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाचव्या कसोटी सामन्याचे लाईव्ह अपडेट्स
मोहम्मद सिराजने गस एटकिन्सनला क्लीन बोल्ड करत भारताला इंग्लंडवर थरारक विजय मिळवून दिला आहे. यासह भारताने ओव्हल कसोटी सामना अवघ्या ६ धावांनी जिंकला आहे. तर ५ सामन्यांच्या कसोटी मालिकेत २-२ अशी बरोबरी साधली आहे.
IND vs ENG Live: भारतीय संघाला विजयासाठी १ विकेटची गरज
प्रसिध कृष्णाने इंग्लंडला नववा धक्का दिला आहे. जोश टंग बाद होऊन माघारी परतला आहे. भारतीय संघाला विजयासाठी १ विकेटची गरज आहे.
IND vs ENG Live: इंग्लंडचे ८ फलंदाज तंबूत! टीम इंडियाला विजयासाठी २ विकेट्सची गरज
मोहम्मद सिराजने पाचव्या दिवसाच्या सुरूवातीला चांगली सुरूवात करून दिली आहे. आधी त्याने जेमी स्मिथ आणि त्यानंतर ओव्हरटनला बाद करत माघारी धाडलं आहे. भारतीय संघाला विजयासाठी २ गडी बाद करायचे आहेत. तर इंग्लंडला विजयासाठी २० धावांची गरज आहे.
IND vs ENG Live: इंग्लंडला मोठा धक्का! सिराजच्या गोलंदाजीवर जेमी स्मिथ बाद
पाचव्या दिवशी सुरूवातीलाच इंग्लंडला मोठा धक्का बसला आहे. संघातील प्रमुख फलंदाज जेमी स्मिथ बाद होऊन माघारी परतला आहे.