India vs Ireland, 1st T20 Match Updates: भारत आणि आयर्लंड यांच्यातील तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेतील पहिला सामना भारताने डकवर्थ लुईस पद्धतीने दोन धावांनी जिंकला आहे. भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि प्रथम फलंदाजी करताना आयर्लंडने सात विकेट गमावत १३९ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात टीम इंडियाने ६.५ षटकांत दोन गडी गमावून ४७ धावा केल्या. यानंतर पावसामुळे खेळ होऊ शकला नाही आणि भारताने डकवर्थ लुईस पद्धतीने दोन धावांनी विजय मिळवला.
आयर्लंडकडून बॅरी मॅकार्थीने शानदार फलंदाजी केली. त्याने नाबाद ५१ धावा केल्या. कर्टिस कॅम्फरने ३९ धावांचे योगदान दिले. या दोघांशिवाय केवळ पॉल स्टर्लिंग आणि मार्क अॅडायर यांना दुहेरी आकडा पार करता आला. भारताकडून प्रसिद्ध कृष्णा, जसप्रीत बुमराह आणि रवी बिश्नोई यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. त्याचवेळी अर्शदीपला एक विकेट मिळाली. मात्र, अर्शदीप त्याच्या अखेरच्या षटकात चांगलाच महागात पडला. भारताकडून यशस्वीने २४ धावा केल्या. तिलक वर्मा खाते उघडू शकला नाही. नाहीत आणि संजू एक आणि ऋतुराज गायकवाड १९ धावांवर नाबाद राहिले.
India VS Ireland 1st T20 Match Updates भारत विरुद्ध आयर्लंड पहिला टी-२० अपडेट्स
भारतीय संघ : यशस्वी जैस्वाल, ऋतुराज गायकवाड, तिलक वर्मा, संजू सॅमसन (विकेटकीपर), शिवम दुबे, रिंकू सिंग, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह (कर्णधार), मुकेश कुमार, आवेश खान, जितेश शर्मा, प्रसिद्ध कृष्णा , शाहबाज अहमद.
भारताची संभाव्य प्लेइंग इलेव्हन: ऋतुराज गायकवाड, यशस्वी जैस्वाल, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), तिलक वर्मा, रिंकू सिंग, शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह (कर्णधार), रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग आणि मुकेश कुमार.
आयर्लंडची संभाव्य प्लेइंग इलेव्हन: अँड्र्यू बालबर्नी, पॉल स्टर्लिंग (कर्णधार), लॉर्कन टकर, हॅरी टेक्टर, जॉर्ज डॉकरेल, गॅरेथ डेलेनी, कर्टिस कॅम्फर, मार्क अॅडायर, जोशुआ लिटल, बॅरी मॅककार्थी आणि बेंजामिन व्हाइट.
Inching closer to the first #IREvIND T20I ⌛️
— BCCI (@BCCI) August 18, 2023
ARE YOU READY❓#TeamIndia pic.twitter.com/XcglKH49XT
सामना स्थानिक वेळेनुसार दुपारी ३:०० वाजता (भारतीय वेळेनुसार ७:३० वाजता) सुरू होणार आहे. AccuWeather वेबसाइटवरील हवामान अहवालानुसार, खेळाच्या सुरुवातीला पावसाची ६७ टक्के शक्यता आहे. डब्लिनमध्ये १८ ऑगस्टला पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे, त्यामुळे सामना लांबणीवर पडू शकतो. जर मुसळधार पाऊस पडला तर सामना वाया जाऊ शकतो.
Our first team huddle in Dublin as we kickstart our preparations for the T20I series against Ireland. #TeamIndia pic.twitter.com/s7gVfp8fop
— BCCI (@BCCI) August 16, 2023
सामन्यादरम्यान हवामान कसे असेल –
वेळ शक्यता
संध्याकाळी ७:३० ६७%
रात्री ८:३० ६७%
रात्री ९:३० ४९%
रात्री १०:३० ४९%
हे डब्लिन मैदान प्रचंड धावसंख्येसाठी ओळखले जाते. भारतीय संघाने स्वतः येथे तीन वेळा २०० हून अधिक धावा केल्या आहेत. आयर्लंडचा संघही येथे सहज धावा करतो. खेळपट्टी फलंदाजांसाठी अनुकूल आहे. उच्च स्कोअरिंग सामना येथे पाहता येईल.
The moment we have all been waiting for. @Jaspritbumrah93 like we have always known him. ?? #TeamIndia pic.twitter.com/uyIzm2lcI9
— BCCI (@BCCI) August 16, 2023
भारत आणि आयर्लंड यांच्यात आतापर्यंत एकूण पाच टी-२० सामने खेळले गेले आहेत, ज्यामध्ये भारताने पाचही सामने जिंकले आहेत. शेवटचे दोन्ही संघ २०२२ मध्ये आमनेसामने आले होते. त्यानंतर दोन सामन्यांच्या टी-२० मालिकेत भारताने आयर्लंडचा अनुक्रमे सात गडी आणि चार धावांनी पराभव केला होता.
आयर्लंडविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी टीम इंडिया अनेक युवा खेळाडूंनी सज्ज आहे. या मालिकेत एक वेगळा संघ पाठवण्यात आला आहे, कारण मुख्य संघ ३० ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या आशिया कपसाठी तयारी करत आहे. आयपीएल स्टार रिंकू सिंग आयर्लंडविरुद्धच्या पहिल्या टी-२० मध्ये पदार्पण करू शकते. यासोबतच शिवम दुबेही दीर्घ कालावधीनंतर संघात पुनरागमन करू शकतो.
Doublin’ the intensity in Dublin ft. #TeamIndia ?#IREvIND pic.twitter.com/xcOzf2e0oO
— BCCI (@BCCI) August 16, 2023
India VS Ireland 1st T20 Match Updates भारत विरुद्ध आयर्लंड पहिला टी-२० अपडेट्स:</dd>
</p>
<dd class="wp-caption-dd">पहिल्या टी-२० सामन्यात भारताने आयर्लंडचा २ धावांनी पराभव केला आहे. अशाप्रकारे भारतीय संघाने ३ टी-२० सामन्यांच्या मालिकेत १-० ने आघाडी घेतली आहे.</dd>
</p>
<dd>