IND vs PAK Updates, Asia Cup 2023: शनिवारी (2सप्टेंबर) भारत आणि पाकिस्तान यांच्यातील आशिया कपमधील तिसरा सामना अनिर्णित राहिला. कॅंडी येथील पल्लेकेले आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर भारताचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. टीम इंडिया 50 ओव्हर्सही खेळू शकली नाही. ती 48.5 षटकांत 266 धावांवर बाद झाली. यानंतर पावसामुळे पाकिस्तानचा डाव सुरू होऊ शकला नाही. बराच वेळ वाट पाहिल्यानंतर पंचांनी दोन्ही कर्णधारांशी बोलून सामना रद्द झाल्याचे घोषित केले..
Asia Cup 2023 Updates, IND vs PAK आशिया कप 2023 अपडेट्स, भारत विरुद्ध पाकिस्तान मॅच अपडेट्स:
शनिवारी (२ सप्टेंबर) भारत आणि पाकिस्तान यांच्यातील आशिया कपमधील तिसरा सामना अनिर्णित राहिला. कॅंडी येथील पल्लेकेले आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर भारताचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. टीम इंडिया 50 ओव्हर्सही खेळू शकली नाही. ती 48.5 षटकांत 266 धावांवर बाद झाली. यानंतर पावसामुळे पाकिस्तानचा डाव सुरू होऊ शकला नाही. बराच वेळ वाट पाहिल्यानंतर पंचांनी दोन्ही कर्णधारांशी बोलून सामना रद्द झाल्याचे घोषित केले.
ASIA CUP 2023. India vs Pakistan – No Result https://t.co/B4XZw382cM #INDvPAK
— BCCI (@BCCI) September 2, 2023
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना पावसामुळे रद्द करण्यात आला आहे. दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण देण्यात आला आहे. यासह पाकिस्तानचा संघ तीन गुणांसह सुपर-4 मध्ये पोहोचला आहे. दुसरीकडे, भारत नेपाळकडून पराभूत झाल्यास आशिया चषकातून बाहेर पडेल. अशा परिस्थितीत सुपर-4 मध्ये पोहोचण्यासाठी टीम इंडियाला नेपाळविरुद्धचा सामना जिंकावा लागेल. भारत आणि पाकिस्तान पुन्हा एकदा सुपर-4 मध्ये भिडणार आहेत.
शाहीन आफ्रिदीचा गोल्डन इनस्विंग अन् रोहित शर्माच्या विकेटवर विराट कोहलीची रिअॅक्शन व्हायरल; पाहा Video
IND vs PAK: शाहीन आफ्रिदीचा गोल्डन इनस्विंग अन् रोहित शर्माच्या विकेटवर विराट कोहलीची रिअॅक्शन व्हायरल; पाहा Video
आत्तापर्यंत कँडीमध्ये पाऊस थांबला नाही आणि मैदानावर कव्हर्स आहेत. अशा परिस्थितीत आता षटके कापण्यास सुरुवात होईल. पाकिस्तानला २० षटकेही खेळायला मिळू शकतात. भारतीय वेळेनुसार रात्री १०.२७ पर्यंत सामना सुरू झाला नाही, तर पाकिस्तानला २० षटके खेळायला मिळतील. अशा स्थितीत त्यांना १५५ धावांचे लक्ष्य मिळेल.
भारतीय कर्णधार रोहित शर्माशिवाय विराट कोहली, शुबमन गिल आणि श्रेयस अय्यर पॅव्हेलियनमध्ये परतले होते. पण यानंतर हार्दिक पांड्या आणि इशान किशन यांच्यात चांगली भागीदारी झाली. दोन्ही खेळाडूंनी १३८ धावांची भागीदारी करून संघाला संकटातून बाहेर काढले. या भागीदारीने अनेक विक्रम मोडले. आशिया चषक वन डे फॉरमॅटमध्ये ५व्या किंवा त्यापेक्षा कमी विकेटसाठी सर्वोच्च भागीदारी त्यांनी केली.
२१४- बाबर आझम, इफ्तिखार अहमद (पाकिस्तान) विरुद्ध नेपाळ, मुलतान, २०२३
१६४- असगर अफगाण, समिउल्ला शिनवारी (अफगानिस्तान) विरुद्ध बांगलादेश, फतुल्ला, २०१४
१३८- इशान किशन, हार्दिक पांड्या (भारत) विरुद्ध पाकिस्तान, पल्लेकेले, २०२३
१३७- शाहिद आफ्रिदी, उमर अकमल (पाकिस्तान) विरुद्ध बांगलादेश, डांबुला, २०१०
१३३- राहुल द्रविड, युवराज सिंग (भारत) विरुद्ध श्रीलंका, डांबुला, २००४
1⃣0⃣0⃣ up for #TeamIndia after 20 overs! ? ?@ishankishan51 unbeaten on 32.
— BCCI (@BCCI) September 2, 2023
Vice-captain @hardikpandya7 batting on 16.
Follow the match ▶️ https://t.co/hPVV0wT83S#AsiaCup2023 | #INDvPAK pic.twitter.com/mAMhsFicQp
पावसामुळे पाकिस्तानला 40 षटके खेळायला मिळाली, तर पाकिस्तानला 239 धावांचे लक्ष्य मिळेल. त्याचबरोबर पाकिस्तानला 30 षटकात 203 धावा कराव्या लागतील. तसेच पाकिस्तानला फक्त 20 षटके मिळाली तर 155 धावांचे लक्ष्य असेल.
https://twitter.com/Rajkuma45606927/status/1698000452762378545?s=20
कँडीमध्ये पुन्हा पाऊस सुरू झाला आहे. पंच मैदानाची पाहणी करण्यासाठी आले होते, पण ते जास्त वेळ मैदानावर थांबू शकले नाहीत. त्यांना लगेच परतावे लागले. भारतीय संघातील काही खेळाडूंनी सरावही सुरू केला होता. आता सर्व कव्हर्स परतले आहेत.
#INDvsPAK #AsiaCup2023 #INDvPAK #PAKvIND #Abhiya #viralvideo
— Swetha™ (@swetha_little_) September 2, 2023
difference in Ground maintenance between srilanka board and richest board BCCI? pic.twitter.com/0qIjsxIXoC
कँडी येथील सामन्यात पावसाने व्यत्यय आणला आहे. चांगली बाब म्हणजे पाऊस थांबला असून खेळपट्टी कोरडे करण्याचे काम सुरू आहे. पंच मैदान आणि खेळपट्टीची पाहणी करण्यासाठी आले आहेत. पाकिस्तानचा डाव कधी सुरू होईल निश्चित झाले नाही. जर षटके वजा केली तर पाकिस्तानला 45 षटकांत 254, 40 षटकांत 239, 30 षटकांत 203 आणि 20 षटकांत 155 धावांचे लक्ष्य मिळेल.
Players are out now and play resumes in few minutes at Pallekele.#PAKvIND #pakvsind #AsiaCup #INDvsPAK pic.twitter.com/J5TzKU2UY7
— ? ? ? ? ? ? ❤️? (@ro45phile) September 2, 2023
पावसामुळे पाकिस्तानचा डाव अद्याप सुरू झालेला नाही. मात्र, चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. सध्या पाऊस पूर्णपणे थांबला आहे. आता 9 वाजल्या असून पंच पाहणी करण्यासाठी मैदानावर दाखल झाले आहेत.
पावसामुळे पाकिस्तानचा डाव अद्याप सुरू झालेला नाही. मात्र, चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. सध्या पाऊस पूर्णपणे थांबला आहे. 9 वाजता पंच पाहणी करतील. एसीसीच्या नियमांनुसार प्रत्येक सामन्यात एक तास अतिरिक्त वेळ दिला जातो. त्यानंतरच षटके कापली जातील. सद्यस्थितीत पंच पाहणी करतील आणि 9 वाजताच पुढील माहिती उपलब्ध होईल.
UPDATE
— BCCI (@BCCI) September 2, 2023
Inspection at 09.00 PM Local Time (Same as IST). #AsiaCup2023 | #TeamIndia | #INDvPAK https://t.co/DJlHh9D58M
पावसाने पुन्हा सामन्यात व्यत्यय आणला आहे. भारताच्या डावानंतर पाऊस सुरू झाला. मैदानावरील कर्मचाऱ्यांनी खेळपट्टी कव्हर्सने झाकली आहे. पाकिस्तानचा डाव अजून सुरू झालेला नाही. पाकिस्तानला विजयासाठी भारताकडून २६७ धावांचे लक्ष्य मिळाले आहे.
Delay in Resumption!
— BCCI (@BCCI) September 2, 2023
it's raining ?️ in Pallekele and the wait continues for resumption of play! ⌛️
Stay Tuned for more updates!
Scorecard ▶️ https://t.co/hPVV0wT83S#AsiaCup2023 | #TeamIndia | #INDvPAK pic.twitter.com/bH7UOYydJH
आशिया चषकात पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात भारतीय संघ 48.5 षटकात 266 धावांवर ऑलआऊट झाला. टीम इंडियाकडून हार्दिक पांड्याने सर्वाधिक धावा केल्या. त्याने 87 धावांची खेळी खेळली. डावखुरा यष्टिरक्षक फलंदाज इशान किशननेही भारतीय चाहत्यांची मने जिंकली आणि पाकिस्तानविरुद्धच्या आंतरराष्ट्रीय पदार्पणात ८२ धावा केल्या.
Innings Break!
— BCCI (@BCCI) September 2, 2023
A solid show with the bat from #TeamIndia! ? ?
8⃣7⃣ for vice-captain @hardikpandya7
8⃣2⃣ for @ishankishan51
Over to our bowlers now ? ?
Scorecard ▶️ https://t.co/hPVV0wT83S#AsiaCup23 | #INDvPAK pic.twitter.com/15SNzWM0k1
या दोघांशिवाय एकाही भारतीय फलंदाजाला 20 धावांचा आकडाही गाठता आला नाही. खरं तर बुमराह हा हार्दिक आणि इशाननंतर तिसरा सर्वाधिक धावा करणारा खेळाडू होता. त्याने शेवटच्या षटकात 16 धावा काढत भारताला 266 धावांपर्यंत नेले. पाकिस्तानकडून शाहीन आफ्रिदीने 10 षटकात 35 धावा देत 4 बळी घेतले. नसीम शाह आणि हरिस रौफ यांना प्रत्येकी तीन विकेट्स घेतल्या.
A fine 87-run knock from #TeamIndia vice-captain! ? ?
— BCCI (@BCCI) September 2, 2023
Well played, Hardik Pandya ? ?
Follow the match ▶️ https://t.co/hPVV0wT83S#AsiaCup23 | #INDvPAK pic.twitter.com/0ZIkQtzw40
भारतीय कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. पाकिस्तानी गोलंदाजांनी हवामान आणि खेळपट्टीचा फायदा घेत धुमाकूळ घातल्याने त्याचा निर्णय चुकीचा ठरला. भारताचे चार फलंदाज 14.1 षटकात 66 धावांवर पॅव्हेलियनमध्ये परतले. शाहीन आफ्रिदीने रोहित शर्मा आणि विराट कोहलीला बाद केले तर हरिसने श्रेयस अय्यर आणि शुबमन गिलला आपला बळी बनवले. रोहित शर्मा 11, विराट कोहली 4, श्रेयस अय्यर 14 आणि शुबमन गिल 10 धावा करून बाद झाला.
भारताने पाकिस्तानसमोर 267 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. टीम इंडिया 48.5 ओव्हरमध्ये 266 रन्सवर गडगडली आहे. भारताकडून इशान किशन आणि हार्दिक पंड्या यांनी अनुक्रमे 82 आणि 87 धावा केल्या. पाकिस्तानकडून शाहीन आफ्रिदीने 4 तर हरिस आणि नसीमने 3-3 बळी घेतले.
ASIA CUP 2023. WICKET! 48.5: Jasprit Bumrah 16(14) ct Agha Salman b Naseem Shah, India 266 all out https://t.co/B4XZw382cM #INDvPAK
— BCCI (@BCCI) September 2, 2023
47 षटकांनंतर टीम इंडियाची धावसंख्या 8 विकेटवर 258 धावा आहे. जसप्रीत बुमराहने दोन चौकार मारले आहेत. बुमराहने शाहीन आफ्रिदीवर आणि हरिस रौफच्या चेंडूवर चौकार मारले.
ASIA CUP 2023. 46.5: Haris Rauf to Jasprit Bumrah 4 runs, India 257/8 https://t.co/B4XZw382cM #INDvPAK
— BCCI (@BCCI) September 2, 2023
भारताचा डाव अचानक फसला. संघाचे तीन फलंदाज सात चेंडूंत बाद झाले. शाहीनने 44व्या षटकातील पहिल्या चेंडूवर हार्दिकला बाद केले. या षटकातील सहाव्या चेंडूवर रवींद्र जडेजा पॅव्हेलियनमध्ये परतला. त्याच्यानंतर नसीम शाहने 45व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर शार्दुल ठाकूरला बाद केले. जडेजाने 22 चेंडूत 14 धावा केल्या आणि यष्टीरक्षक मोहम्मद रिझवानकडे झेलबाद झाला. तर नसीम शाहने शार्दुलला शादाब खानकरवी झेलबाद केले. भारताने 45 षटकात आठ विकेट गमावत 246 धावा केल्या आहेत.
ASIA CUP 2023. WICKET! 44.1: Shardul Thakur 3(3) ct Shadab Khan b Naseem Shah, India 242/8 https://t.co/B4XZw382cM #INDvPAK
— BCCI (@BCCI) September 2, 2023
टीम इंडियाची आठवी विकेट २४२ धावांवर पडली. हार्दिक आणि जडेजानंतर शार्दुल ठाकूरही बाद झाला. शार्दुलला नसीम शाहने झेलबाद केले. अवघ्या तीन धावांत भारताने आपले ३ विकेट गमावले.
Triple-strike! ?@iShaheenAfridi and @iNaseemShah combine to pick up three wickets in quick succession to leave India 8️⃣ down ?#PAKvIND | #AsiaCup2023 pic.twitter.com/QfQpuJLC2L
— Pakistan Cricket (@TheRealPCB) September 2, 2023
हार्दिक पांड्यापाठोपाठ रवींद्र जडेजाही पॅव्हेलियनमध्ये परतला. शाहीन आफ्रिदीने दोघांनाही एकाच षटकात पॅव्हेलियनमध्ये पाठवले. हार्दिकने 87 आणि जडेजाने 14 धावा केल्या. शाहीन आफ्रिदीने आतापर्यंत 4 विकेट घेतल्या आहेत.
भारताची सहावी विकेट 44 व्या षटकात पडली. शानदार फलंदाजी करणाऱ्या हार्दिक पंड्याचे शतक हुकले. तो 90 चेंडूत 87 धावा करून बाद झाला. यादरम्यान त्याच्या बॅटमधून 7 चौकार आणि 1 षटकार आला.
Vice-Captain @hardikpandya7's valiant knock comes to an end on 87.
— BCCI (@BCCI) September 2, 2023
Live – https://t.co/L8YyqJF0OO…… #INDvPAK pic.twitter.com/iVfyraVx7r
अनुभवी अष्टपैलू हार्दिक पांड्या त्याच्या पहिल्या वनडे शतकाकडे वाटचाल करत आहे. पांड्या आणि इशान किशन यांनी पाचव्या विकेटसाठी १३८ धावांची भागीदारी करून संघाला संकटातून बाहेर काढले. भारताने ४३ षटकात ५ विकेट गमावत २३९ धावा केल्या आहेत. पांड्या ८९ चेंडूत ८७ धावा करत खेळत आहे तर रवींद्र जडेजा १४ धावा करत त्याला साथ देत आहे.
Vice-Captain @hardikpandya7's valiant knock comes to an end on 87.
— BCCI (@BCCI) September 2, 2023
Live – https://t.co/L8YyqJF0OO…… #INDvPAK pic.twitter.com/iVfyraVx7r
शादाब खानने 42 वे षटक टाकले. या षटकात जडेजाने आणि हार्दिकनेही एक चौकार मारला. 42 षटकांनंतर टीम इंडियाची धावसंख्या 5 विकेटवर 237 झाली आहे. हार्दिक पांड्या 86 आणि रवींद्र जडेजा 13 वर आला आहे.
Hardik Pandya is dealing in boundaries at the moment ??
— BCCI (@BCCI) September 2, 2023
Live – https://t.co/B4XZw382cM… #INDvPAK pic.twitter.com/5gCHAZhWGS
भारतीय संघाचा निम्मा संघ 204 धावांवर पॅव्हेलियनमध्ये परतला आहे. इशान किशनचे शतक हुकले आणि तो 81 चेंडूत 82 धावा करून बाद झाला. त्याने आपल्या खेळीत नऊ चौकार आणि दोन षटकार मारले. हारिस रौफच्या चेंडूवर मोठा शॉट खेळण्याच्या प्रयत्नात तो बाबर आझमकडे झेल देऊन बाद झाला. आता हार्दिक पांड्यासोबत रवींद्र जडेजा क्रीजवर आहे. 41 षटकानंतर भारताची धावसंख्या 5 बाद 226 धावा आहे.
ASIA CUP 2023. 41.1: Shadab Khan to Ravindra Jadeja 4 runs, India 230/5 https://t.co/B4XZw382cM #INDvPAK
— BCCI (@BCCI) September 2, 2023
38व्या षटकात 204 धावांवर भारताची पाचवी विकेट पडली. शानदार फलंदाजी करणारा इशान किशन 82 धावा करून बाद झाला. इशानला हरिस रौफने झेलबाद केले. इशानने 81 चेंडूत 9 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 82 धावांची खेळी केली.
Ishan Kishan departs, but only after a solid knock of 82 off 81 deliveries.
— BCCI (@BCCI) September 2, 2023
Live – https://t.co/L8YyqJF0OO… #INDvPAK pic.twitter.com/9goYe8sDO9
भारताच्या धावसंख्येने चार विकेट गमावून 200 धावा केल्या आहेत. इशान किशन आणि हार्दिक पांड्याने आपली अर्धशतके पूर्ण केली आहेत. दोघांमध्ये शतकी भागीदारी झाली आहे. किशन त्याच्या शतकाच्या जवळ पोहोचला आहे.
https://twitter.com/Chhote_Panditt/status/1697962781889507727?s=20
भारतीय संघाने ३६ षटकानंतर धावफलंकावर ४ बाद १८७ धावा लावल्या आहे. सध्या इशान किशन ७५ आणि हार्दिक पांड्या धावांवर खेळत आहे. या दोघांनी पाचव्या गड्यासाठी १२१ धावा जोडल्या आहेत. त्यामुळे भारतीय संघाने पहिल्या पडझडीनंतर शानदार कमबॅक केले आहे.
https://twitter.com/DaebakankitaF/status/1697961350717386787?s=20
इशान किशननंतर हार्दिक पांड्यानेही आपले अर्धशतक पूर्ण केले आहे. हे त्याचे वनडेतील 11 वे अर्धशतक आहे. त्याने 34व्या षटकात आगा सलमानच्या शेवटच्या चेंडूवर चौकार मारून आपले अर्धशतक पूर्ण केले. भारताने 34 षटकात 4 विकेट गमावत 178 धावा केल्या आहेत. इशान किशन नाबाद 72आणि हार्दिक पांड्या नाबाद 50 धावांवर खेळत आहेत. दोघांनी पाचव्या विकेटसाठी शतकी भागीदारी रचली आहे.
Hardik Pandya joins the party with a fine half-century ??
— BCCI (@BCCI) September 2, 2023
Live – https://t.co/B4XZw382cM… #INDvPAK pic.twitter.com/CDsjyzbAeq
भारताने पाकिस्तानविरुद्ध 32 षटकांत चार विकेट गमावत 160 धावा केल्या आहेत. इशान किशन 59 आणि हार्दिक पंड्या 45 धावांवर नाबाद आहे.
Jeetega toh india hi , RT if you support team india ?? #INDvsPAK pic.twitter.com/vb3QmCnOz1
— Newshub (@ViralSh77697534) September 2, 2023
31 षटकांनंतर भारताची धावसंख्या 4 गड्यांच्या मोबदल्यात 156 धावा आहे. हार्दिक पांड्या 43 आणि इशान किशन 58 धावांवर खेळत आहेत. दोघांमध्ये 102 चेंडूत 90 धावांची भागीदारी झाली आहे.
ASIA CUP 2023. 28.5: Shadab Khan to Ishan Kishan 4 runs, India 146/4 https://t.co/B4XZw382cM #INDvPAK
— BCCI (@BCCI) September 2, 2023
इशान किशनने शानदार अर्धशतक झळकावत भारताला संकटातून बाहेर काढले. 29व्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर त्याने आपले अर्धशतक पूर्ण केले. हा त्याचा पाकिस्तानविरुद्धचा पहिला एकदिवसीय सामना होता आणि त्याने तो संस्मरणीय बनवला. एवढेच नाही तर त्याने प्रथमच वनडेमध्ये पाचव्या क्रमांकावर फलंदाजी केली आहे. हार्दिक पांड्यासोबत त्याने टीम इंडियाचे कमबॅक केले. भारताने 29 षटकांत 4 गडी गमावून 141 धावा केल्या आहेत.
FIFTY!
— BCCI (@BCCI) September 2, 2023
A well made half-century by @ishankishan51 off 54 deliveries ??
His 7th in ODIs!
Live – https://t.co/B4XZw382cM… #INDvPAK pic.twitter.com/6FII0XRTRu
25 व्या षटकात शाहीन आफ्रिदीला पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी आणण्यात आले. या षटकात हार्दिक पंड्याने शानदार चौकार लगावला. 25 षटकांनंतर टीम इंडियाची धावसंख्या 4 गडी बाद 127 झाली आहे.
ASIA CUP 2023. 25.2: Mohammad Nawaz to Ishan Kishan 4 runs, India 132/4 https://t.co/B4XZw382cM #INDvPAK
— BCCI (@BCCI) September 2, 2023
Asia Cup 2023 Updates, IND vs PAK आशिया कप 2023 अपडेट्स, भारत विरुद्ध पाकिस्तान मॅच अपडेट्स:
Asia Cup 2023, India vs Pakistan Updates: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना पावसामुळे रद्द करण्यात आला आहे. दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण देण्यात आला आहे. यासह पाकिस्तानचा संघ तीन गुणांसह सुपर-4 मध्ये पोहोचला आहे. दुसरीकडे, भारत नेपाळकडून पराभूत झाल्यास आशिया चषकातून बाहेर पडेल. अशा परिस्थितीत सुपर-4 मध्ये पोहोचण्यासाठी टीम इंडियाला नेपाळविरुद्धचा सामना जिंकावा लागेल. भारत आणि पाकिस्तान पुन्हा एकदा सुपर-4 मध्ये भिडणार आहेत.