IND vs PAK Updates, Asia Cup 2023: शनिवारी (2सप्टेंबर) भारत आणि पाकिस्तान यांच्यातील आशिया कपमधील तिसरा सामना अनिर्णित राहिला. कॅंडी येथील पल्लेकेले आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर भारताचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. टीम इंडिया 50 ओव्हर्सही खेळू शकली नाही. ती 48.5 षटकांत 266 धावांवर बाद झाली. यानंतर पावसामुळे पाकिस्तानचा डाव सुरू होऊ शकला नाही. बराच वेळ वाट पाहिल्यानंतर पंचांनी दोन्ही कर्णधारांशी बोलून सामना रद्द झाल्याचे घोषित केले..

Live Updates

Asia Cup 2023 Updates, IND vs PAK आशिया कप 2023 अपडेट्स, भारत विरुद्ध पाकिस्तान मॅच अपडेट्स:

14:41 (IST) 2 Sep 2023
IND vs PAK: रोहित शर्माने घेतला फलंदाजीचा निर्णय, पाहा प्लेइंग इलेव्हन

भारत: रोहित शर्मा, शुभमन गिल, विराट कोहली, इशान किशन (यष्टीरक्षक), श्रेयस अय्यर, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.

पाकिस्तान : फखर जमान, इमाम उल हक, बाबर आझम (कर्णधार), मोहम्मद रिझवान (यष्टीरक्षक), आगा सलमान, इफ्तिखार अहमद, शादाब खान, मोहम्मद नवाज, शाहीन आफ्रिदी, नसीम शाह, हरिस रौफ.

https://twitter.com/BCCI/status/1697898703020044547?s=20

14:37 (IST) 2 Sep 2023
IND vs PAK: रोहित शर्माने नाणेफेक जिंकून घेतला फलंदाजीचा निर्णय

भारताचा कर्णधार रोहित शर्माने पाकिस्तानविरुद्धच्या आशिया कपमध्ये नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. श्रेयस अय्यर आणि जसप्रीत बुमराह वनडे प्लेइंग-11 मध्ये परतले आहेत. त्याचबरोबर रवींद्र जडेजा आणि कुलदीप चहल हे दोन फिरकीपटू म्हणून संघात आहेत. जोपर्यंत पाकिस्तानचा संबंध आहे, त्याने आपल्या प्लेइंग-11 मध्ये कोणताही बदल केलेला नाही.

https://twitter.com/BCCI/status/1697898703020044547?s=20

14:31 (IST) 2 Sep 2023
IND vs PAK: पावसाने व्यत्यय आणल्यास किती षटकांचा खेळ होणे आवश्यक? DLS नियम कधी लागू होणार, जाणून घ्या सर्व काही

IND vs PAK: पावसाने व्यत्यय आणल्यास किती षटकांचा खेळ होणे आवश्यक? DLS नियम कधी लागू होणार, जाणून घ्या सर्व काही
14:29 (IST) 2 Sep 2023
IND vs PAK: इथे खूप पाऊस पडतो पण तरीही सामना होतो

इरफान पठाणने स्टार स्पोर्ट्सला सांगितले की, पल्लेकेलेतील पहिल्या सामन्यासाठी अशाच हवामानाचा अंदाज होता. पावसाची ८० टक्के शक्यता होती, पण सामना कोणत्याही अडचणीशिवाय पुढे गेला. आजही तेच होण्याची शक्यता आहे.

https://twitter.com/SharyOfficial/status/1697887201885896955?t=TS1ZmBCclgeta8YDV574WA&s=19

14:22 (IST) 2 Sep 2023
IND vs PAK: कँडीमध्ये पुन्हा सुरू झाला पाऊस

कँडीमध्ये पुन्हा पाऊस सुरू झाला आहे. ३० यार्ड सर्कल कव्हर्सने झाकलेले आहेच. नाणेफेक 2.30 वाजता होण्याची शक्यता आहे.

https://twitter.com/SharyOfficial/status/1697887201885896955?t=TS1ZmBCclgeta8YDV574WA&s=19

14:17 (IST) 2 Sep 2023
IND vs PAK: खेळाडू मैदानावर करतायत वार्मअप

कँडीमध्ये पाऊस थांबला आहे. खेळाडू मैदानावर वॉर्म अप करताना दिसत आहेत. सर्व काही सुरळीत राहिल्यास नाणेफेक दुपारी अडीच वाजता होईल. त्याच वेळी दोन्ही संघ आपापल्या प्लेइंग इलेव्हनची घोषणा करतील.

https://twitter.com/BCCI/status/1697894001427554791?s=20

14:16 (IST) 2 Sep 2023
IND vs PAK: शोएब अख्तरने वर्तवली भारत-पाक सामन्याची भविष्यवाणी

IND vs PAK: कोण होणार टॉस ठरणार बॉस? शोएब अख्तरने वर्तवली भारत-पाक सामन्याची भविष्यवाणी; म्हणाला, “भारत जिंकेल तर…”

IND vs PAK: कोण होणार टॉस ठरणार बॉस? शोएब अख्तरने वर्तवली भारत-पाक सामन्याची भविष्यवाणी; म्हणाला, “भारत जिंकेल तर…”
14:14 (IST) 2 Sep 2023
IND vs PAK: इशान की सॅमसन, कोण असेल यष्टिरक्षक? कशी असेल टीम इंडियाची संभाव्य प्लेइंग इलेव्हन, जाणून घ्या

IND vs PAK: इशान की सॅमसन, कोण असेल यष्टिरक्षक? कशी असेल टीम इंडियाची संभाव्य प्लेइंग इलेव्हन, जाणून घ्या
14:05 (IST) 2 Sep 2023
IND vs PAK: पाकिस्तान विरुद्ध भारतातील शानदार सामना कोणत्या टीव्ही चॅनलवर तुम्ही पाहू शकता?

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील मेगा मॅचचे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स चॅनलवर होणार आहे. हा सामना तुम्ही वेगवेगळ्या भाषांमध्ये वेगवेगळ्या चॅनेलवर पाहू शकता. त्याच वेळी, तुम्ही डिस्ने + हॉटस्टार अॅपवर हा सामना ऑनलाइन पाहू शकता. तुम्ही Disney+Hotstar अॅपवर सामना विनामूल्य पाहू शकाल.

https://twitter.com/BCCI/status/1697225379591991383?s=20

13:59 (IST) 2 Sep 2023
IND vs PAK: मैदानावर वॉर्म अप करण्यासाठी खेळाडू सज्ज

भारत-पाकिस्तान यांच्यातील सामना म्हणजे देशाच्या आणि जगाच्या सर्व सीमा ओलांडून एक वेगळाच रोमांच आणणारा क्रीडाक्षेत्रावरील असा सामना आहे. कॅँडीमध्ये पाऊस थांबला आहे. खेळाडू मैदानावर वॉर्म अप करताना दिसत आहेत. सर्व काही ठीक राहिल्यास नाणेफेक दुपारी 2.30 वाजता होईल. त्याच वेळी भारतीय संघ आपल्या प्लेइंग इलेव्हनची घोषणा करेल. बघूया हा सामना रोहित विरुद्ध शाहीन आहे की बाबर विरुद्ध कोहली?

https://twitter.com/ICC/status/1697829399708454932?s=20

13:55 (IST) 2 Sep 2023
IND vs PAK: कँडीतून आली चांगली बातमी; पाऊस थांबला, टॉस कधी होणार?

भारत-पाकिस्तान सामन्यासंदर्भात कँडीमधून एक चांगली बातमी आली आहे. पाऊस थांबला आहे. आकाश पूर्णपणे निरभ्र आहे. नाणेफेक वेळेवर होण्याची शक्यता आहे.

https://twitter.com/SharyOfficial/status/1697887201885896955?t=RBUT_Zi_mCDE0xcdPPBizQ&s=19

13:50 (IST) 2 Sep 2023
IND vs PAK: सामन्यात नाणेफेक बजावणार महत्वाची भूमिका

पल्लेकेलेमध्ये सध्या पाऊस पडत आहे. अशा स्थितीत नाणेफेक होण्यास विलंब होऊ शकतो. नाणेफेक जिंकणारा संघ प्रथम गोलंदाजी करू शकतो. मधूनमधून पडणारा पाऊस सामन्यादरम्यान त्रास देऊ शकतो. अशा स्थितीत लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या संघाला डकवर्थ लुईस नियम पाहून लक्ष्याचा पाठलाग करायला आवडेल.

https://twitter.com/CrictipsIndia/status/1697886863712022645?t=qBBdNltLhQ2ykkZxIIQ7hQ&s=19

13:44 (IST) 2 Sep 2023
IND vs PAK: टॉसच्या तासाभरापूर्वी पाऊस झाला सुरू

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना कँडीच्या पल्लेक्कल मैदानावर होणार आहे. नाणेफेक दुपारी अडीच वाजता होणार आहे. पण चांगली बातमी येत नाही. पाऊस सुरू झाला असून खेळपट्टी कव्हरने झाकली गेली आहे.

https://twitter.com/BCCI/status/1697884465702592831?s=20

13:37 (IST) 2 Sep 2023
IND vs PAK: चार वर्षांनंतर दोन्ही संघ वनडेत आमनेसामने

भारत आणि पाकिस्तानचे संघ चार वर्षांनंतर एकदिवसीय फॉर्मेटमध्ये आणि पाच वर्षांनंतर आशिया कप वनडेमध्ये भिडतील. २०१८ मध्ये आशिया चषक एकदिवसीय सामन्यात भारत-पाकिस्तान आमनेसामने आले होते, तर २०१९ विश्वचषकादरम्यान दोघेही एकदिवसीय सामन्यात आमनेसामने आले होते.

https://twitter.com/BCCI/status/1697459866888278151?s=20

13:35 (IST) 2 Sep 2023
IND vs PAK: भारत आपले सर्व सामने श्रीलंकेत खेळणार

यावेळी आशिया कप हा हायब्रीड फॉर्म्युला अंतर्गत खेळवला जात आहे. या स्पर्धेतील १३ पैकी चार सामने पाकिस्तान आपल्या घरच्या मैदानावर खेळवणार आहे, तर सुपर फोर आणि अंतिम फेरीसह नऊ सामने श्रीलंकेत खेळवले जातील. बीसीसीआयने आपला संघ पाकिस्तानला पाठवण्यास नकार दिल्यानंतर पीसीबीने श्रीलंकेसोबत संयुक्तपणे यजमानपदाचा निर्णय घेतला. स्पर्धेचा अंतिम सामना १७ सप्टेंबर रोजी कोलंबो येथे खेळवला जाईल.

https://twitter.com/BCCI/status/1697599056732897614?s=20

13:32 (IST) 2 Sep 2023
IND vs PAK: सामन्यादरम्यान हवामान कसे असेल?

वेदर डॉट कॉमच्या मते, पावसाच्या शक्यतांमध्ये बदल झाला आहे. सामन्यादरम्यान ढगाळ वातावरण असेल, परंतु पावसाचे कोणतेही चिन्ह नाही. आकाश ६४ टक्के ढगांनी झाकले जाईल असा अंदाज आहे, मात्र रिमझिम पावसाचा अंदाज केवळ १५-१९ टक्के आहे.

https://twitter.com/BCCI/status/1697831460135477297?s=20

13:27 (IST) 2 Sep 2023
IND vs PAK: पाकिस्तान संघात कोणताही बदल झालेला नाही

पाकिस्तानने दुसऱ्या सामन्यासाठी आपल्या संघात कोणताही बदल केलेला नाही. तीन वेगवान गोलंदाजांव्यतिरिक्त पाकिस्तानी संघ व्यवस्थापनाने तीन फिरकी गोलंदाजी अष्टपैलू खेळाडूंना प्लेइंग-11 मध्ये ठेवले आहे. याशिवाय संघाची फलंदाजीही जोरदार दिसत आहे. फखर जमान आणि इमाम उल हक सलामीला दिसणार आहेत. त्याचबरोबर बाबर आझम, मोहम्मद रिझवान, इफ्तिखार अहमद, सलमान आगा हे मधल्या फळीत दिसणार आहेत. शादाब खान आणि मोहम्मद नवाज हेही खालच्या फळीत फलंदाजी करू शकतात. नसीम व्यतिरिक्त शाहीन आफ्रिदी आणि हरिस रौफ वेगवान आक्रमणात दिसणार आहेत.

https://twitter.com/TheRealPCB/status/1697611637375824298?s=20

Asia Cup 2023 Updates, IND vs PAK आशिया कप 2023 अपडेट्स, भारत विरुद्ध पाकिस्तान मॅच अपडेट्स:

Asia Cup 2023, India vs Pakistan Updates: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना पावसामुळे रद्द करण्यात आला आहे. दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण देण्यात आला आहे. यासह पाकिस्तानचा संघ तीन गुणांसह सुपर-4 मध्ये पोहोचला आहे. दुसरीकडे, भारत नेपाळकडून पराभूत झाल्यास आशिया चषकातून बाहेर पडेल. अशा परिस्थितीत सुपर-4 मध्ये पोहोचण्यासाठी टीम इंडियाला नेपाळविरुद्धचा सामना जिंकावा लागेल. भारत आणि पाकिस्तान पुन्हा एकदा सुपर-4 मध्ये भिडणार आहेत.