Smriti Mandhana Record, India Womens vs Australia Womens: आयसीसी महिला वनडे वर्ल्डकप २०२५ स्पर्धेत भारतीय संघाचा सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध पार पडला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारतीय संघाला प्रथम फलंदाजी करण्याचं आमंत्रण दिलं होतं. प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने ३३१ धावांचा डोंगर उभारला. या डावात स्मृती मान्धनाने ६६ चेंडूत ८८ धावांची खेळी केली. या खेळीसह तिने वनडे क्रिकेटमध्ये ५००० धावांचा पल्ला गाठला आहे. यासह तिच्या नावे मोठ्या विक्रमाची नोंद झाली आहे.

स्मृती मान्धनाने मोडला विराट कोहलीचा विक्रम

स्मृती मान्धनाने वनडे क्रिकेटमधील ११२ व्या डावात ५००० धावांचा पल्ला गाठला आहे. यासह तिने मोठ्या विक्रमात विराट कोहलीला मागे टाकलं आहे. याआधी हा विक्रम विराट कोहलीच्या नावावर होता. विराट कोहलीने वनडे क्रिकेटमधील ११४ व्या डावात ५००० धावांचा पल्ला गाठला होता. आता सर्वात जलद ५००० धावा करण्याचा विक्रम हा स्मृती मान्धनाच्या नावावर नोंदवला गेला आहे. या यादीत भारताचा माजी फलंदाज शिखर धवन तिसऱ्या स्थानी आहे. शिखर धवनने वनडे क्रिकेटमधील ११८ व्या डावात ५००० धावा करण्याचा विक्रम आपल्या नावावर केला होता. या विक्रमासह स्मृती मान्धनाच्या नावे आणखी एका मोठ्या विक्रमाची नोंद झाली आहे. स्मृती मान्धनाने हे झळकावलेलं अर्धशतक हे ऑस्ट्रेलियाविरूद्ध खेळताना झळकावलेले सलग ५ वे अर्धशतक ठरले आहे. यासह तिने सलग ५ अर्धशतकं झळकावण्या विक्रम आपल्या नावावर केला आहे.

वनडे क्रिकेटमध्ये सर्वात जलद ५००० धावा करणारे भारतीय फलंदाज

स्मृती मान्धना- ११२ डावात
विराट कोहली- ११४ डावात
शिखर धवन- ११८ डावात
सौरव गांगुली- १२६ डावात
एमएस धोनी- १३५ डावात
गौतम गंभीर- १३५ डावात

यासह स्मृती मान्धनाच्या नावे आणखी एका मोठ्या विक्रमाची नोंद झाली आहे. स्मृती मान्धना ही महिलांच्या वनडे क्रिकेटमध्ये ५००० धावांचा पल्ला गाठणारी दुसरी भारतीय फलंदाज ठरली आहे. तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील पाचवी फलंदाज ठरली आहे. ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या सामन्यात ५८ धावा करताच तिने हा विक्रम आपल्या नावावर केला. यासह तिच्या नावाने आणखी एका मोठ्या विक्रमाची नोंद झाली आहे. महिलांच्या वनडे क्रिकेटमध्ये सर्वात जलद ५००० धावांचा पल्ला गाठणारी महिला क्रिकेटपटू ठरली आहे.