Indian players and Nepalese cricketer being honored with medals: गेल्या सोमवारी, आशिया कप २०२३ चा पाचवा सामना भारत आणि नेपाळ यांच्यात खेळला गेला. टीम इंडियाने हा सामना १० विकेटने जिंकला. या विजयासह भारताने सुपर फोरमध्ये आपले स्थान निश्चित केले आहे. त्याचबरबर नेपाळ संघाला या स्पर्धेत दुसऱ्यांदा पराभवाला सामोरे जावे लागले. दरम्यान, भारतीय संघाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

व्हायरल असलेल्या व्हिडीओमध्ये मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड, विराट कोहली आणि उपकर्णधार हार्दिक पांड्या दिसत आहेत. त्याचबरोबर या व्हिडिओमध्ये नेपाळचे खेळाडूही दिसत आहेत. या व्हिडीओत भारताचे खेळाडू नेपाळच्या खेळाडूंना एसीसी स्पर्धेत पदार्पण केल्याबद्दल पदक देऊन सन्मानित करताना दिसले. ज्याचा व्हिडीओ आता जोरदार व्हायरल होत आहे. या व्हिडीओच्या माध्यामातून टीम इंडियाने चाहत्यांची मनं पुन्हा एकदा जिंकली आहेत.

टीम इंडियाच्या खेळाडूंनी सामन्यानंतर नेपाळच्या खेळाडूंसोबत घालवला वेळ –

इतकंच नाही तर भारतीय खेळाडूंनी नेपाळच्या संघाच्या खेळाडूंसोबत काही वेळ घालवला. सामना संपल्यानंतर नेपाळच्या ड्रेसिंग रूममध्ये जाऊन त्यांच्या खेळाडूंसोबत फोटोही काढले. याशिवाय भारताचा माजी कर्णधार नेपाळचा वेगवान गोलंदाज सोमपाल कामीला त्याच्या शूजवर ऑटोग्राफ देताना दिसला, यामुळे सोमपाल खूप भावूक झाला.

हेही वाचा – World Cup 2023: संजू सॅमसनला विश्वचषकाच्या संघातून वगळल्याने चाहते भडकले, सोशल मीडियावर व्यक्त केला संताप

विशेष म्हणजे सोमपाल भारताविरुद्ध आठव्या क्रमांकावर फलंदाजीला आला होता. त्याने ५६ चेंडूत ४८ धावांची खेळी खेळली, ज्यात दोन षटकार आणि एका चौकाराचा समावेश होता. याशिवाय शेखने ९७ चेंडूत ५८ धावा केल्या होत्या. त्यामुळे नेपाळला २३० धावा करता आल्या. तथापि, पल्लेकेले आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर संततधार पावसामुळे, भारताला डीएलएस पद्धतीनुसार विजयासाठी १४५ धावांचे लक्ष्य देण्यात आले होते. जे भारतीय संघाने अगदी सहज पूर्ण केले.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Indian players and nepalese cricketer being honored with medals video viral in asia cup 2023 vbm