वृत्तसंस्था, मुंबई : जगातील सर्वात लोकप्रिय आणि श्रीमंत ट्वेन्टी-२० क्रिकेट लीग अशी ओळख असलेल्या इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) आगामी हंगामापूर्वी होणाऱ्या लिलावाआधी दहाही फ्रेंचायझींनी संघमुक्त केलेल्या आणि संघात कायम ठेवलेल्या खेळाडूंची यादी जाहीर केली. सनरायझर्स हैदराबादने केन विल्यम्सन आणि निकोलस पूरन, चेन्नई सुपर किंग्जने ड्वेन ब्रावो, तसेच पंजाब किंग्सने सलामीवीर मयांक अगरवाल यांसारख्या आघाडीच्या खेळाडूंना संघमुक्त केले आहे.
संघात कायम ठेवण्यात आलेल्या खेळाडूंची यादी जाहीर करण्यासाठी फ्रेंचायझींकडे मंगळवार (१५ नोव्हेंबर) सायंकाळपर्यंतचा वेळ होता. दिवसाची सुरुवात मुंबई इंडियन्सचा तडाखेबंद अष्टपैलू किरॉन पोलार्डच्या ‘आयपीएल’मधील निवृत्तीने झाली. त्यानंतर अन्य संघांनी काही दिग्गज खेळाडूंना संघाबाहेर केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या. मात्र, संघमुक्त करण्यात आलेल्या खेळाडूंना आगामी लिलावात चांगली बोली लागण्याची शक्यता आहे. ‘आयपीएल’ खेळाडू लिलाव प्रक्रिया २३ डिसेंबरला पार पाडणार आहे.
संघमुक्त करण्यात आलेले खेळाडू
मुंबई इंडियन्स
किरॉन पोलार्ड, अनमोलप्रीत सिंग, आर्यन जुयाल, बसिल थंपी, डॅनियल सॅम्स, फॅबियन अॅलन, जयदेव उनाडकट, मयंक मरकडे, मुरुगन अश्विन, राहुल बुद्धी, रायली मेरेडिच, संजय यादव, टायमल मिल्स
शिल्लक रक्कम : २०.५५ कोटी
दिल्ली कॅपिटल्स
टीम सेइफर्ट (न्यूझीलंड), अश्विन हेब्बर, श्रीकर भरत, मनदीप सिंग
शिल्लक रक्कम : १९.४५ कोटी
राजस्थान रॉयल्स
करुण नायर, कॉर्बिन बॉश, रासी व्हॅन डर डसेन, डॅरेल मिचेल, जेम्स नीशम, नेथन कुल्टर-नाईल, शुभम गरवाल, तेजस बरोका, अनुनय सिंग.
शिल्लक रक्कम : १३.२ कोटी
रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु
अनिश्वर गौतम, चामा मिलिंद, लवनीथ सिसोदिया, शर्फेन रुदरफोर्ड, जेसन बेहरनडॉर्फ</p>
शिल्लक रक्कम : ८.७५ कोटी
लखनऊ सुपर जायंट्स
जेसन होल्डर, अँड्रयू टाय, अंकित राजपूत, दुष्मंथा चमीरा, एव्हिन लुईस, मनीष पांडे, शाहबाज नदीम
शिल्लक रक्कम : २३.३५ कोटी
गुजरात टायटन्स
रहमनुल्ला गुरबाझ, लॉकी फग्र्युसन, डॉमिनिक ड्रेक्स, गुरकीरत सिंग, जेसन रॉय, वरुण आरोन
शिल्लक रक्कम : १९.२५ कोटी
कोलकाता नाइट रायडर्स
पॅट कमिन्स, सॅम बिलिंग्ज, शिवम मावी, मोहम्मद नबी, चमिका करुणारत्ने, आरोन फिंच, अॅलेक्स हेल्स, अभिजीत तोमर, अजिंक्य रहाणे, अशोक शर्मा, बाबा इंद्रजीत, प्रथम सिंग, रमेश कुमार, रसिक सलाम, शेल्डन जॅक्सन
शिल्लक रक्कम : ७.०५ कोटी
पंजाब किंग्स
मयांक अगरवाल, ओडियन स्मिथ, वैभव अरोरा, बेनी हॉवेल, इशान पोरेल, अंश पटेल, प्रेरक मंकड, संदीप शर्मा, वृतिक चॅटर्जी
शिल्लक रक्कम : ३२.२ कोटी
.चेन्नई सुपर किंग्ज
ड्वेन ब्राव्हो, रॉबिन उथप्पा, अॅडम मिल्ने, हरी निशांत, ख्रिस जॉर्डन, भगत वर्मा, केएम आसिफ, नारायण जगदीशन
शिल्लक रक्कम : २०.४५ कोटी
सनरायजर्स हैदराबाद
केन विल्यम्सन, निकोलस पूरन, जगदीश सुचिथ, प्रियम गर्ग, रविकुमार समर्थ, रोमारियो शेफर्ड, सौरभ दुबे, शॉन अॅबट, शशांक सिंग, श्रेयस गोपाल, सुशांत मिश्रा, विष्णू विनोद
शिल्लक रक्कम : ४२.२५ कोटी