scorecardresearch

जयदेव उनाडकट

जयदेव उनाडकट (Jaydev Unadkat) हा भारतीय क्रिकेटपटू (गोलंदाज) आहे. त्याचा जन्म १८ ऑक्टोबर १९९१ रोजी गुजरातमधील पोरबंदर येथे झाला. २०१० च्या अंडर-१९ क्रिकेट विश्वचषकामध्ये भारतीय संघामध्ये त्याचा समावेश करण्यात आला होता. तेव्हापासून आत्तापर्यंत उनाडकट हा देशांतर्गत स्तरावर सौराष्ट्रच्या संघाचे प्रतिनिधित्त्व करतो आहे. रणजी ट्रॉफी, दुलीप ट्रॉफी, देवधर ट्रॉफीसह अन्य काही स्पर्धांही तो खेळला आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर क्रिकेट खेळण्याचा अनुभवही त्याच्यापाशी आहे. २०१९ मध्ये जयदेव उनाडकटवर राजस्थान रॉयल्सच्या संघाने सर्वाधिक ८.४ कोटी रुपयांची बोली लावली होती. या प्रकरणामुळे तो प्रकाशझोतात आला होता.


२०१० च्या अंडर-१९ विश्वचषकामध्ये उत्कृष्ट कामगिरी केल्याने जयदेव उनाडकटने सर्वांचे लक्ष वेधले होते. वेस्ट इंडिज विरुद्धच्या सामन्यामध्ये त्याने १३ गडी बाद केले होते. भारताच्या श्रीलंका दौऱ्यामध्ये त्याचा समावेश नेट बॉलर म्हणून करण्यात आला होता. पुढे डिसेंबर २०१० मध्ये दक्षिण आफ्रिकेच्या संघाविरुद्ध कसोटी सामन्यामध्ये त्याला खेळण्याची संधी देण्यात आली. जयदेव उनाडकटसाठी हा त्याचा पदार्पणाचा सामना होता. पण दुर्देवाने त्याला पुढील ११-१२ वर्षांमध्ये कसोटी संघामध्ये सहभागी करण्यात आले नव्हते. २२ डिसेंबर २०२२ मध्ये बांगलादेश विरुद्ध भारत हा त्याच्या आयुष्यातला दुसरा आंतरराष्ट्रीय कसोटी सामना ठरला. २०१३ मध्ये त्याने एकदिवसीय फॉरमॅटमध्ये पदार्पण केले. तसेच २०१६-२०१८ या काळात तो भारताकडून टी-२० सामने खेळला.


इंडियन प्रीमियर लीग (IPL) म्हणजेच आयपीएलमध्ये जयदेव २०१० पासून खेळत आहे. २०१०-२०१२ मध्ये तो केकेआरमध्ये होता. २०१३ मध्ये रॉयल चॅलेन्जर्स बंगळुरुच्या संघामध्ये (RCB) त्याला सामील करण्यात आले. पुढे तो बंगळुरु, दिल्ली आणि पुणे संघामध्ये होता. २०१९ च्या आयपीएल लिलावामध्ये राजस्थान व अन्य दोन संघ जयदेव उनाडकटवर नजर ठेवून होते. तेव्हा राजस्थानने सर्वात जास्त बोली लावून जयदेव उनाडकटला आपल्या चमूमध्ये घेतले. २०२१ पर्यंत तो राजस्थान रॉयल्समध्येच होता. पुढे २०२२ मध्ये तो मुंबई इंडियन्सकडून आयपीएलमध्ये सामने खेळला. सध्या तो लखनौच्या संघामध्ये आहे.


Read More
Virat Kohli creates unique record
SRH vs RCB : विराट कोहलीने केला अनोखा विक्रम, IPL इतिहासात ‘हा’ पराक्रम करणारा ठरला पहिलाच खेळाडू

SRH vs RCB Match Updates : सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध खेळला जाणारा सामना विराट कोहलीसाठी खूप खास आहे. हा सामना सुरू…

Jaydev Unadkat Returns to Team India
IND vs WI 3rd ODI: १० वर्षांनंतर ‘या’ स्टार खेळाडूचे वनडेत पुनरागमन, प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाले स्थान

IND vs WI 3rd ODI Updates: वेस्ट इंडिजविरुद्धच्या तिसऱ्या वनडेत जयदेव उनाडकटला संधी मिळाली आहे. उमरान मलिकच्या जागी त्याचा प्लेइंग…

Lucknow Super Giants Team Updates
LSG Team: लखनऊ सुपर जायंट्स संघात नवीन खेळाडूची एन्ट्री! जयदेव उनाडकटच्या जागी मुंबईच्या युवा खेळाडूला मिळाली संधी

Lucknow Super Giants Team: लखनऊ सुपर जायंट्स संघाने शेवच्या साखळी सामन्यापूर्वी संघात एक मोठा बदल केला आहे. लखनऊने दुखापतग्रस्त जयदेव…

Jaydev Unadkat Out Of IPL 2023
IPL 2023: लखनऊ सुपर जायंट्सला मोठा धक्का! दुखापतीमुळे ‘हा’ प्रमुख गोलंदाज झाला बाहेर

Jaydev Unadkat Left Shoulder Injury: लखनऊ सुपर जायंट्सचा गोलंदाज जयदेव उनाडकट आयपीएल २०२३ मधून बाहेर पडला आहे. उनाडकटच्या खांद्याला दुखापत…

Saurashtra defeated Bengal by 9 wickets in the Ranji Trophy 2023 final to win the trophy for the second time
Ranji Trophy 2023 Final: सौराष्ट्र संघ पुन्हा ठरला रणजी चॅम्पियन; जयदेवच्या नेतृत्वाखाली बंगालचा ९ विकेट्सने उडवला धुव्वा

Saurashtra vs Bengal Final: सौराष्ट्र संघ पुन्हा एकदा रणजी चॅम्पियन ठरला आहे. कर्णधार जयदेव उनाडकटने बंगालविरुद्ध घातक गोलंदाजी करताना आपल्या…

IND vs AUS 2nd Test Jaydev Unadkat has been released from Team India
IND vs AUS 2nd Test सामन्यापूर्वी टीम इंडियाचा मोठा निर्णय; जयदेव उनाडकट संघातून बाहेर, जाणून घ्या कारण

Jaydev Unadkat Released: जयदेव उनाडकटला टीम इंडियातून मुक्त करण्यात आले आहे. रणजी ट्रॉफी २०२२-२३ च्या अंतिम सामन्यासाठी तो भारतीय संघातून…

Saurashtra vs Delhi match Jaydev Unadkat has created history in the Ranji Trophy
Saurashtra vs Delhi: रणजी ट्रॉफीत जयदेव उनाडकटने रचला इतिहास, ‘हा’ विक्रम करणारा ठरला पहिला खेळाडू

Jaydev Unadkat New Record: रणजी ट्रॉफीमध्ये सौराष्ट्रचा कर्णधार जयदेव उनाडकटने दिल्लीविरुद्ध शानदार गोलंदाजी केली. त्याने दिल्लीविरुद्ध आठ विकेट्स घेताना एक…

sp jaydev unadkat
देशांतर्गत क्रिकेट स्पर्धेत खेळण्याचा फायदा; वेगवान गोलंदाज जयदेव उनाडकटचे मत

तब्बल एक तप म्हणजे १२ वर्षे वाट पाहिल्यानंतर भारतीय संघाकडून कसोटी क्रिकेट खेळण्याची संधी मिळालेल्या वेगवान गोलंदाज जयदेव उनाडकटने देशांतर्गत…

Why was Kuldeep Yadav targeted Sunil Gavaskar furious over dropping man of the match
IND vs BAN 2nd Test: “दरवेळी कुलदीप यादवलाच बळीचा बकरा…” मॅन ऑफ द मॅच खेळाडूला डावलल्याने दिग्गज ‘लिटल मास्टर’ भडकले

भारत-बांगलादेश यांच्यातील दुसरा कसोटी सामना मीरपूर येथे खेळवला जात असून केएल राहुलने संघाचा स्टार फिरकीपटू कुलदीप यादवला वगळण्याचा निर्णय घेतला.…

IND vs BAN 2nd Test
IND vs BAN 2nd Test: सामन्यात उतरताच जयदेव उनाडकटने रचला मोठा विक्रम; प्रमुख खेळाडूंच्या यादीत झाला समाविष्ट

जयदेव उनाडकटने बांगलादेशविरद्धच्या सामन्यात उतरताच एक मोठा विक्रम केला आहे. तो असा विक्रम करणारा जगातील दुसरा खेळाडू ठरला आहे.

संबंधित बातम्या