Indian Women’s Cricket Team Sets New Global Record: चक दे इंडिया’ चित्रपटातील एक संवाद आजही आठवतो. ‘खेल कर क्या करोगे? घर ही तो संभालना है…’ असे महिला खेळाडूशी लग्न ठरलेला पुरुष खेळाडू सांगत असतो.मात्र, आता महिलाच्या खेळांमध्ये हे चित्र कमी होताना दिसत आहे. कारकीर्द म्हणून महिलाही या खेळाकडे गांभीर्याने पाहात आहेत. याचे उत्तम उदाहरण म्हणजे भारतीय महिला क्रिकेट संघ. वनडे वर्ल्डकप स्पर्धेच्या जेतेपदावर भारताच्या लेकींनी नाव कोरलं आहे. भारताने दक्षिण अफ्रिकेसमोर विजयासाठी २९९ धावांचं आव्हान ठेवलं होतं. पण दक्षिण अफ्रिकेचा संघ २४६ धावा करू शकला. यासह भारताने ५२ धावांनी पहिल्यांदाच जेतेपद नावावर केलं आहे. भारताने वनडे वर्ल्डकप स्पर्धेच्या इतिहासात पहिल्यांदाच जेतेपदावर नाव कोरलंं आहे. अशातच महिला क्रिकेटसाठी एका ऐतिहासिक क्षणी, भारतीय महिला राष्ट्रीय क्रिकेट संघाने विश्वचषक अंतिम सामन्यासाठी आतापर्यंतची सर्वाधिक प्रेक्षकसंख्या मिळवून या खेळाला अभूतपूर्व उंचीवर नेले आहे.

२ नोव्हेंबर २०२५ रोजी नवी मुंबईतील डीवाय पाटील स्पोर्ट्स अकादमी येथे २०२५ आयसीसी महिला क्रिकेट विश्वचषक त्याच्या कळस गाठत असताना, लाखो लोकांनी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारताचा सामना पाहण्यासाठी गर्दी केली होती. या सामन्यात केवळ अपवादात्मक प्रतिभेचे प्रदर्शनच झाले नाही तर महिला क्रिकेटचे वाढते जागतिक आकर्षणही अधोरेखित झाले. डिजिटल प्लॅटफॉर्म आणि ब्रॉडकास्टर्सच्या अहवालांवरून असे दिसून येते की थेट प्रेक्षकसंख्या १९ कोटींहून अधिक झाली आहे, ज्यामुळे मागील विक्रम मोडले गेले आहेत. हा क्रिकेटच्या नव्या अध्यायाचा आरंभ असून वर्ल्ड कप जिंकण्याआधीच सर्वात मोठ्या रेकॉर्डची नोंद याठिकाणी झाली आहे. आणि भारत आणि त्यापलीकडे महिला खेळांबद्दलच्या धारणा आणि वापरात एक महत्त्वाचा बदल झाला आहे.

विश्वचषक स्पर्धेत सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडू

  • लॉरा वोल्वाडने ५८४ धावा – २०२५ विश्वचषक
  • एलिसा हिली ५०९ धावा २०२२ विश्वचषक
  • रॅचेल हेन्स ४९७ धावा २०२२ विश्वचषक
  • डेबी हॉकले ४५६ धावा १९९७ विश्वचषक

डीवाय आहे बालेकिल्ला

२०२२ मध्ये भारतीय संघाने या मैदानावर दोन सामने खेळले होते. गेल्या वर्षी जानेवारी महिन्यात भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्धची मालिका याच मैदानात खेळली होती. भारतीय संघाला पराभवाला सामोरं जावं लागलं होतं. गेल्या वर्षअखेरीस याच मैदानावर भारतीय संघाने वेस्ट इंडिजविरुद्ध मालिका खेळली होती. भारताने या मालिकेत विजय मिळवला होता.याच मैदानावर भारतीय संघाने ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडिजविरुद्ध टी२० मालिकाही खेळली होती. दोन वर्षांपूर्वी याच मैदानावर भारत आणि इंग्लंड यांच्यात एकमेव कसोटी सामना झाला होता. भारतीय संघाने तब्बल ३४७ धावांनी हा सामना जिंकला होता. या मैदानाची, खेळपट्टीची, वातावरणाची भारतीय संघाला चोख माहिती आहे.