आगामी टी-२० विश्वचषक स्पर्धेसाठी ऑस्ट्रेलियासह काही क्रिकेट मंडळांनी आपला संघ जाहीर केला आहे. मात्र, टी-२० विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय संघाची निवड अद्यापही झालेली नाही. दरम्यान, ही निवड १६ सप्टेंबर रोजी होण्याची शक्यता आहे. जसप्रीत बुमराहचा वैद्यकीय अहवाल प्राप्त न झाल्याने संघ जाहीर करण्यास उशीर होत असल्याची माहिती आहे.
येत्या १६ सप्टेंबर रोजी टी-२० विश्वचषकासाठी भारतीय संघ जाहीर होण्याची शक्यता आहे. जसप्रीत बुमराहच्या दुखापतीमुळे भारतीय संघ निवडीस उशीर होत असल्याची माहिती आहे. बीसीसीआयचे वैद्यकीय अधिकारी बुमराहच्या फिटनेसवर सतत लक्ष ठेवत असून बुमराह सध्या बंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमी (NCA) येथे तज्ज्ञांच्या मार्गदर्शनात सराव करतो आहे. विश्वचषकाला अद्याप महिन्याभराचा अवधी बाकी आहे. त्यामुळे जसप्रीत बुमराहचा वैद्यकीय अहवालानंतरच भारतीय संघाच्या निवडची घोषणा करणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.
हेही वाचा – ENG vs SA : राणी एलिझाबेथ यांच्या निधनानंतर इंग्लंड-दक्षिण आफ्रिका यांच्यातील तिसरा कसोटी सामना स्थगित
दरम्यान, विश्वचषकासाठी निवडले जाणारे बहुतेक खेळाडू त्यापूर्वी दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-२० मालिकेत खेळणार आहे. त्यामुळे विश्वचषकापूर्वी तो किती सामने खेळतो हे पाहणे महत्त्वाचे आहे. यावर्षी १६ ऑक्टोबर ते १३ नोव्हेंबर दरम्यान ऑस्ट्रेलियात टी-२० विश्वचषक स्पर्धा खेळवली जाणार आहे.
