Women’s T20 World Cup 2023 Semifinal: भारत आणि ऑस्ट्रेलिया संघाच महिला टी-२० विश्वचषकातील उपांत्य सामना खेळला गेला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारतावर ५ धावांनी विजय मिळवला. त्याचबरोबर अंतिम फेरीत धडक मारली. दरम्यान मेग लॅनिंगने तुफानी खेळी केली साकारली. तिने २० व्या षटकात शेवटच्या चेंडूवर इतका जोरदार षटकार लगावला. ज्यामुळे क्रिकेट चाहते आवाक झाले. ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर आता व्हायरल होतोय.

तिसऱ्या क्रमांकावर उतरलेल्या लॅनिंगने धडाकेबाज फलंदाजी करत नाबाद ४९ धावा ठोकल्या. लॅनिंगने आपल्या शानदार खेळीत ३४ चेंडूत ४ चौकार आणि २ षटकार लगावले. यादरम्यान लॅनिंगने २०व्या षटकात शेवटच्या चेंडूवर लगावलेल्या षटकाराची सर्वत्र चर्चा होत आहे. लॅनिंगने शेवटच्या षटकात गोलंदाजी करायला आलेल्या रेणुका सिंगच्या पहिल्याच चेंडूवर षटकार ठोकला, आणि तिची ताकद दाखवून दिली. यानंतर मेग लॅनिंगने दुसऱ्या चेंडूवर चौकार मारला. त्यानंतर, ओव्हरच्या शेवटच्या चेंडूवर लॅनिंग स्ट्राइकवर आली, रेणुकाने शेवटचा चेंडू टाकताच लॅनिंगने फाइन लेगवर दमदार षटकार मारून डाव संपवला. लॅनिंगचा दमदार शॉट इतका उत्कृष्ट होता की चेंडू खूप उंच गेला आणि सर्वजण पाहतच राहिले.

या सामन्यात ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित २० षटकांत ४ बाद १७२ धावा केल्या. त्यामुळे भारतीय संघाला १७३ धावांचे लक्ष्य मिळाले होते. प्रत्युत्तरात भारतीय संघ २० षटकांत ८ बाद १६७ धावाच करु शकला. टीम इंडियाने मेग लॅनिंग आणि बेथ मुनी यांचे सोपे झेल गमावले. त्याचा परिणाम असा झाला की मुनी आणि लॅनिंगने मोठी खेळी खेळली. मुनीने ३७ चेंडूत ५४ धावांची खेळी केली. याशिवाय लॅनिंगने कर्णधारपदाला साजेशी खेळी करताना ३४ चेंडूत नाबाद ४९ धावा केल्या. ऍशले गार्डनरने १८ चेंडूत ३१ धावांची खेळी खेळली.

हेही वाचा – INDW vs AUSW Semifinal: ऑस्ट्रेलियाने भारताच्या आशांवर फेरले पाणी; ५ धावांनी विजय नोंदवून मिळवले फायनलचे तिकीट

एका टप्प्यावर भारताने १४ षटकांत ४ गडी गमावून १२४ धावा केल्या होत्या. त्यानंतर टीम इंडियाला ३६ चेंडूत ४९ धावांची गरज होती. भारतीय संघ हा सामना सहज जिंकेल असे वाटत होते. कर्णधार हरमनप्रीत कौर ३० चेंडूत ४३ आणि ऋचा घोषने १४ धावा केल्या. यानंतर पुढील षटकात हरमनप्रीतने आपले अर्धशतक पूर्ण केले आणि त्याच षटकात ती विचित्र पद्धतीने धावबाद झाली. हा सामन्याचा टर्निंग पॉइंट ठरला.