राजस्थानने दिलेल्या छोटेखानी लक्ष्याचा यशस्वीपणे पाठलाग करत, दिल्लीने गुणतालिकेत पुन्हा एकदा दुसऱ्या स्थानावर झेप घेतली आहे. घरच्या मैदानावर खेळताना राजस्थान रॉयल्सवर ५ गडी राखून मात करत दिल्लीने साखळी फेरीचा अखेर विजयाने केला आहे. याचसोबत राजस्थान रॉयल्सचं या पर्वातलं आव्हान संपुष्टात आलं आहे. राजस्थानच्या गोलंदाजांनी दिल्लीला चांगली झुंज दिली, मात्र त्यांच्यावर अंकुश ठेवण्यात ते अपयशी ठरले. ऋषभ पंतने अर्धशतक करत पुन्हा एकदा आपली छाप पाडली.

राजस्थानकडून इश सोधीने दिल्लीच्या सलामीच्या फलंदाजांना माघारी धाडत चांगली सुरुवात केली होती. त्याला श्रेयस गोपाळनेही चांगली साथ दिली. मात्र मधल्या फळीत ऋषभ पंतने फटकेबाजी करत दिल्लीच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. त्याआधी, रियान परागच्या झुंजार अर्धशतकी खेळाच्या जोरावर राजस्थानने दिल्लीविरुद्धच्या सामन्यात ११५ धावांपर्यंत मजल मारली आहे. आयपीएलच्या इतिहासात अर्धशतक झळकावणारा रियान सर्वात तरुण खेळाडू ठरला आहे. त्याच्या खेळीच्या जोरावर राजस्थानने ९ बाद ११५ पर्यंत मजल मारली.

सामन्यात रहाणेने नाणेफेक जिकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. राजस्थानच्या डावाची सुरुवात खराब झाली. कर्णधार अजिंक्य रहाणे मोठा फटका खेळताना स्वस्तात माघारी परतला. सलामीवीर लिआम लिव्हिंगस्टोन याने चांगली सुरुवात केली होती, पण १ चौकार आणि १ षटकार खेचत १४ धावांवर तो त्रिफळाचीत झाला आणि राजस्थानला दुसरा धक्का बसला. लगेचच संजू सॅमसनही धावचीत झाला. महिपाल लोमरोर आणि संजू सॅमसन यांच्यात काहीसा गोंधळ झाला आणि त्यामुळे त्याला माघारी परतावे लागले. त्याने ५ धावा काढल्या. नव्या दमाचा महिपाल लोमरोर याला मोठी खेळी करण्याची चांगली संधी होती, पण तो बाहेरच्या चेंडूला बॅट लागल्याने झेलबाद झाला. त्याने ८ धावा केल्या.

त्याआधी दिल्लीचा अनुभवी फिरकीपटू अमित मिश्राची हॅटट्रीक घेण्याची संधी हुकली. श्रेयस गोपाल आणि पाठोपाठ स्टुअर्ट बिन्नी असे २ चेंडूत अमित मिश्राने २ बळी टिपले. गोपालने १२ धावा केल्या, तर बिन्नी पाहिल्याचे चेंडूवर बाद झाला. त्याला हॅटट्रिकची संधी होती. तिसऱ्या चेंडूवरदेखील मिश्राने टाकलेला चेंडू हवेत उंच उडाला, पण ट्रेंट बोल्टने झेल सोडला. कृष्णप्पा गौतम मोठा फटका खेळताना माघारी परतला. त्याने एका चौकारासह ६ धावा केल्या. आजच्या सामन्यात संधी मिळालेला ईश सोधी ६ धावा करून बाद झाला. रियान परागने मात्र एकतर्फी खिंड लढवून ४९ चेंडूत ५० धावा केल्या.

Live Blog

Highlights

  • 18:17 (IST)

    इश सोधीचे एकाच षटकात दिल्लीला दोन धक्के

    ???? ??? ??? ?????? ???? ??????????? ??????? ????? ??????

  • 17:47 (IST)

    रियान परागचं झुंजार अर्धशतक; दिल्लीपुढे ११६ धावांचे आव्हान

    ????? ?????? ?????? ???????? ???? ????. IPL ???????? ??????? ????????? ?? ?????? ???? ?????????? ????. ???????? ???????? ?????? ?????????? ? ??? ??? ???? ?????? ??? ???????? ??? ??????? ?????? ????.

  • 16:55 (IST)

    गोपाल, स्टुअर्ट बिन्नी बाद; अमित मिश्राची हॅटट्रिक मात्र हुकली

    ?????? ????? ??? ??????? ???????? ?????? ??? ? ?????? ???? ???????? ? ??? ?????. ??????? ?? ???? ??????, ?? ?????? ?????????? ??????? ??? ????.  ?????? ?????????? ???? ????. ??????? ???????????? ???????? ??????? ????? ???? ??? ?????, ?? ?????? ??????? ??? ?????.

  • 15:46 (IST)

    नाणेफेक जिंकून राजस्थानची प्रथम फलंदाजी

    ??????? ????? ??????? ????? ???????? ?????????? ????????? ?????? ???? ??????? ???????? ????????? ??? ???. ???????? ??????? ??????? ????? ????? ????????? ?????? ????? ???. ????? ??????? ??? ??? ???? ????. ???????? ????? ????? ??? ???? ??? ????? ????? ????? ???? ????? ??? ????? ????? ????? ????????? ???? ??? ???. ?? ?????????? ??????? ????? ??? ????? ?????? ????? ????????? ???? ???? ?? ???? ??? ????????? ???? ????? ????? ????? ???? ???. .

19:21 (IST)04 May 2019
ऋषभ पंतकडून दिल्लीच्या विजयावर शिक्कामोर्तब

राजस्थानच्या बाद फेरीतील प्रवेशाच्या आशा संपुष्टात

19:11 (IST)04 May 2019
रुदरफोर्ड माघारी, दिल्लीचा निम्मा संघ माघारी

गोपाळने घेतला बळी, मात्र दिल्ली विजयाच्या जवळ

19:03 (IST)04 May 2019
कॉलिन इन्ग्राम माघारी, दिल्लीला चौथा धक्का

इश सोधीला मिळाला बळी

18:40 (IST)04 May 2019
दिल्लीला तिसरा धक्का, श्रेयस अय्यर माघारी

श्रेयस गोपाळने घेतला बळी

18:17 (IST)04 May 2019
इश सोधीचे एकाच षटकात दिल्लीला दोन धक्के

शिखर धवन आणि पृथ्वी शॉला लागोपाठच्या चेंडूवर धाडलं माघारी

17:47 (IST)04 May 2019
रियान परागचं झुंजार अर्धशतक; दिल्लीपुढे ११६ धावांचे आव्हान

रियान परागने झुंजार अर्धशतकी खेळी केली. IPL इतिहासात अर्धशतक झळकावणारा तो सर्वात तरुण क्रिकेटपटू ठरला. त्याच्या खेळीच्या जोरावर राजस्थानने ९ बाद ११५ धावा केल्या आणि दिल्लीला ११६ धावांचे आव्हान दिले.

17:27 (IST)04 May 2019
ईश सोधी बाद; राजस्थानला आठवा धक्का

आजच्या सामन्यात संधी मिळालेला ईश सोधी ६ धावा करून बाद झाला.

17:06 (IST)04 May 2019
गौतम माघारी; राजस्थानला सातवा धक्का

कृष्णप्पा गौतम मोठा फटका खेळताना माघारी परतला. त्याने एका चौकारासह ६ धावा केल्या.

16:55 (IST)04 May 2019
गोपाल, स्टुअर्ट बिन्नी बाद; अमित मिश्राची हॅटट्रिक मात्र हुकली

श्रेयस गोपाल आणि पाठोपाठ स्टुअर्ट बिन्नी असे २ चेंडूत अमित मिश्राने २ बळी टिपले. गोपालने १२ धावा केल्या, तर बिन्नी पाहिल्याचे चेंडूवर बाद झाला.  त्याला हॅटट्रिकची संधी होती. तिसऱ्या चेंडूवरदेखील मिश्राने टाकलेला चेंडू हवेत उंच उडाला, पण ट्रेंट बोल्टने झेल सोडला.

16:28 (IST)04 May 2019
महिपाल झेलबाद; राजस्थानला चौथा धक्का

नव्या दमाचा महिपाल लोमरोर याला मोठी खेळी करण्याची चांगली संधी होती, पण तो बाहेरच्या चेंडूला बॅट लागल्याने झेलबाद झाला. त्याने ८ धावा केल्या.

16:24 (IST)04 May 2019
संजू सॅमसन धावचीत; राजस्थानला तिसरा धक्का

लगेचच संजू सॅमसनही धावचीत झाला. महिपाल लोमरोर आणि संजू सॅमसन यांच्यात काहीसा गोंधळ झाला आणि त्यामुळे त्याला माघारी परतावे लागले. त्याने ५ धावा काढल्या.

16:20 (IST)04 May 2019
लिव्हिंगस्टोन त्रिफळाचीत; राजस्थानला दुसरा धक्का

सलामीवीर लिआम लिव्हिंगस्टोन याने चांगली सुरुवात केली होती, पण १ चौकार आणि १ षटकार खेचत १४ धावांवर तो त्रिफळाचीत झाला आणि राजस्थानला दुसरा धक्का बसला.

16:10 (IST)04 May 2019
कर्णधार अजिंक्य माघारी; राजस्थानला पहिला धक्का

राजस्थानच्या डावाची सुरुवात खराब झाली. कर्णधार अजिंक्य रहाणे मोठा फटका खेळताना स्वस्तात माघारी परतला.

15:46 (IST)04 May 2019
नाणेफेक जिंकून राजस्थानची प्रथम फलंदाजी

स्टीव्ह स्मिथ मायदेशी परतला असल्याने राजस्थानचे कर्णधारपद पुन्हा एकदा अजिंक्य रहाणेकडे सोपवण्यात आले आहे. सामन्यात रहाणेने नाणेफेक जिकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. दोनही संघांनी दोन बदल केले आहेत. दिल्लीने इशांत शर्मा आणि किमो पॉल यांना संघात घेतले असून सुचित आणि ख्रिस मॉरिस यांना संघाबाहेर केले आले आहे. तर राजस्थानने स्टीव्ह स्मिथ आणि जयदेव उनाडकट यांना संघाबाहेर केले असून ईश सोधी आणि कृष्णप्पा गौतम यांना संघात स्थान दिले आहे. .